एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पुढील आठवडाभर महाराष्ट्र कोरडाच राहणार ; हवामान विभाग
आता मात्र महाराष्ट्रातील बहुतांश भागात पावसाने उसंत घेतली असल्याचे चित्र आहे. त्यामुळे पेरणीच्या तयारीत असलेल्या बळीराजाच्या चिंतेत वाढ झाली आहे.
पुणे : चांगल्या पावसासाठी महाराष्ट्राला अजून आठवडाभर वाट पाहावी लागेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. या आठवड्यातही महाराष्ट्रातील अनेक भागात पावसाने हजेरी लावलेली नाही.
महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन झाल्यानंतर कोकणासह दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागामध्ये पावसाने हजेरी लावली होती. मात्र यंदा मान्सून वेळेत दाखल झाला तरी त्याचा जोर आठवडाभरही टिकला नाही.
आता महाराष्ट्रातील बहुतांश भागात पावसाने उसंत घेतली असल्याचे चित्र आहे. त्यामुळे पेरणीच्या तयारीत असलेल्या बळीराजाच्या चिंतेत वाढ झाली आहे. सामान्यत: 15 जूनपर्यंत पश्चिम आणि मध्य भारतात मान्सून दाखल झालेला असतो. परंतु 11 जून पासून मान्सूनच्या वाऱ्यांचा प्रभाव कमी झाला आहे.
"कोकण आणि गोव्यात तुरळक पाऊस होऊ शकतो. मात्र पुढील आठवडाभर महाराष्ट्रातील अन्य भागात पावसाची कोणतीही शक्यता नाही," असं हवामान खात्याच्या पुणे विभागाकडून सांगण्यात आले आहे.
मध्य महाराष्ट्र, विदर्भ तसेच मराठवाड्यात ढगाळ वातावरण कायम राहणार असल्याचंही हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
राजकारण
राजकारण
मुंबई
Advertisement