एक्स्प्लोर

तिकीट न दिल्यास नाराज होणाऱ्या कार्यकर्त्यांना गडकरींनी झापलं, 'हे' उदाहरण सांगितलं

हा प्रसंग मी कधीच विसरू शकत नाही. पण हल्ली सुशिक्षित कार्यकर्ते मात्र लगेच नाराज होऊन, जाहीरपणे व्यक्त ही होतात. असं म्हणत नाराज होणाऱ्यांचे गडकरींनी कान टोचले.

  पिंपरी चिंचवड : आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी चांगलेच प्रसिद्ध आहेत. यामुळे काहीवेळा ते वादात देखील सापडले. मात्र आपल्या कार्यकर्त्यांचे कान टोचायला ते कधीच मागेपुढे बघत नाहीत. आज पिंपरी चिंचवडमध्येही त्यांनी  तिकीट न दिल्यास नाराज होणाऱ्या कार्यकर्त्यांचे गडकरींनी चांगलेच कान टोचले. पिंपरी चिंचवड येथे पुनरुत्थान समरसता गुरुकुलमच्या कार्यक्रमात बोलताना तिकीट न दिल्यास नाराज होणाऱ्या कार्यकर्त्यांचे गडकरींनी कान टोचले. यावेळी त्यांनी एक प्रसंगही  सांगितला. वंचित समाजातल्या एका महिलेला तीस हजार रुपये देऊन, निवडणुकीची तयारी करण्याचे आदेश दिले. सहसा तर मी स्थानिकांना विश्वासात घेऊनच तिकीट वाटपाचे निर्णय घेत असतो, पण यावेळी मी तस केलं नाही. पण नंतर ती महिला निवडून येणार नसल्याचे मला अनेकांनी पटवून दिलं. मग मी त्या महिलेची माफी मागून, तुम्ही निवडून येणार नाही, असा अंदाज वर्तवला आहे. तेंव्हा त्या महिलेने मग निवडून येणाऱ्या उमेदवारालाच तिकीट द्या, असं खुल्या मनाने सांगितले. बरं पर्स मधून अठरा हजार रुपये परत केले आणि उर्वरित खर्च झालेली रक्कम परत देईन असं ही अाश्वासित केलं. हा प्रसंग मी कधीच विसरू शकत नाही. पण हल्ली सुशिक्षित कार्यकर्ते मात्र लगेच नाराज होऊन, जाहीरपणे व्यक्त ही होतात. असं म्हणत नाराज होणाऱ्यांचे गडकरींनी कान टोचले. जातीचं नाव काढेल त्यांना मी ठोकून काढेल जो जातीचं नाव काढेल त्यांना मी ठोकून काढेल, असं वक्तव्य यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं.  जातीयवाद आणि सांप्रदायिक मुक्त, आर्थिक-सामाजिक समता, एकता या आधारावर संपूर्ण समाजाचं संघटन झालं पाहिजे. सोबतच गरीब-श्रीमंत ही दुफळी संपायला हवी, असंही गडकरी यावेळी म्हणाले. यावेळी बोलताना गडकरी म्हणाले की, तुमच्याकडे किती जात आहे याची मला कल्पना नाही. पण आमच्या पाच जिल्ह्यातून जात हद्दपार झाली आहे. मी सर्वांना सांगूनच ठेवलंय, जो जातीचं नाव काढेल त्यांना ठोकून काढेन. जातीय वाद आणि सांप्रदायिक मुक्त, आर्थिक-सामाजिक समता एकता या आधारावर संपूर्ण समाजाचं संघटन झालं पाहिजे. गरीब-श्रीमंत ही दुफळी संपायला हवी. कोणी छोट्या जातीचा, कोणी मोठया जातीचा असता कामा नये. एकात्मता, पूर्ण खंड असा समाज व्हायला हवं हीच संकल्पना आहे, असंही गडकरी यावेळी म्हणाले. टिळक आणि आगरकरांचे विचार मांडताना स्वराज्य आणि सुराज्य महत्वाचं असल्याचं गडकरी म्हणाले. स्वराज्य तर मिळालं पण आपल्याला सुराज्य निर्माण करायचंय. आपल्या देशाला आर्थिक दृष्ट्या जगातील महाशक्ती बनवायचं आहे. गरिबी, भूकमारी, बेरोजगारी संपवायची आहे. सोशीत आणि वंचितांचे जीवन बदलवून, सामर्थ्य राष्ट्र निर्माण करायचं आहे. अशी अपेक्षा ही गडकरींनी व्यक्त केली.

महत्त्वाच्या बातम्या

उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?
Manoj Jarange Patil: 'मराठ्यांपुढे सत्तेचं शहाणपण जमत नाहीत, आता आमच्या बाया चपला काढतील'; मनोज जरांगेंचा इशारा
'मराठ्यांपुढे सत्तेचं शहाणपण जमत नाहीत, आता आमच्या बाया चपला काढतील'; मनोज जरांगेंचा इशारा

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला

Embed widget