'देवाचा आशीर्वाद म्हणून लग्न झाल्यानंतर तुम्ही काहीच नाही केलं तर पोर कसं होणार' : नितीन गडकरी
Nitin Gadkari News: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आपल्या रोखठोक वक्तव्यांमुळं चर्चेत असतात. त्यांनी अमरावतीमध्येही असंच एक वक्तव्य केलं आहे, ज्याची सध्या चर्चा सुरु आहे.
Nitin Gadkari News: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आपल्या रोखठोक वक्तव्यांमुळं चर्चेत असतात. त्यांनी अमरावतीमध्येही असंच एक वक्तव्य केलं आहे, ज्याची सध्या चर्चा सुरु आहे. यावेळी नितीन गडकरी म्हणाले की, देवाचा आशीर्वाद आहे आणि लग्न झाल्यानंतर तुम्ही काहीच नाही केलं तर पोरगं कसं होणार, तुम्हालाही काही पुढाकार घ्यावं लागेल, नितीन गडकरी यांच्या या वक्तव्याने उपस्थितामध्ये एकच हशा पिकला. शेतमालाची पॅकिंग आणि उत्पादन करण्यावरुन बोलताना ते म्हणाले की, तुम्ही जर उत्पादन आणि पॅकिंग चांगलं करायला हवं. एकतर परमेश्वर किंवा सरकार असं नको व्हायला. देवानं दिलं अन् देवानं नेलं असं जमत नाही. देवाचा आशीर्वाद जरुर पाहिजे. पण देवाचा आशीर्वाद आहे, लग्न झाल्यानंतर तुम्ही काहीच नाही केलं तर पोरगं कसं होणार, तुम्हालाही काही पुढाकार घ्यावं लागेल, असं नितीन गडकरी म्हणाले अन् एकच हशा पिकला. हे उदाहरण लगेच कळतं, असा टोलाही त्यांनी नंतर लगावला.
अमरावती शहरात ‘अपेडा’ आणि ॲग्रोव्हिजन फाऊंडेशनतर्फे तर्फे विदर्भातील कृषी उत्पादने, फळे आणि भाजीपाला निर्यातीची संधी या विषयावर मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमात अमरावती विभागातील पाच जिल्ह्यातील शेतकरी उपस्थित होते. या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मार्गदर्शन केले.
संत्र्यांची क्वॉलिटी ही आपली समस्या
नितीन गडकरी म्हणाले की, विदर्भातील शेतकऱ्यांना संत्राच्या कलमा मिळत नव्हत्या तेव्हा मी नाराज होतो. मी घोष साहेबांना सांगितल्यानंतर अनेक नर्सरी उघडण्यात आल्या.डॉ घोष यांना बोललो अमरावती, वर्धा, नागपूरमध्ये संत्राच संत्रा आहे. त्यामुळे आणखी नर्सरी वाढवा. भविष्यात आपल्याला पाच हजार कोटी रुपयांचा संत्रा निर्यात करायच्या आहेत. काही अडचणी सरकारच्या आहेत, काही तुमच्या पण आहे. त्या दूर करायच्या आहेत. मी पण एक निर्यातदार आहे. संत्राची क्वॉलिटी ही आपली समस्या आहे. 100 टक्के संत्राची क्वॉलिटी कसी मिळेल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असं ते म्हणाले.
वरुड मोर्शी भागात संत्रा वर प्रक्रिया करणारे प्रकल्प झाले. संत्राला उत्तम क्वॉलिटीसाठी नैसर्गिकरित्या उपाय योजना केल्या पाहिजेत. वरुड मोर्शी मधील नर्सरीवाल्यांनी चांगल्या दर्जाच्या संत्रा कलम तयार कराव्या. 20 वर्षांपूर्वी मी 500 कलमा लावल्या होत्या..पण त्याला संत्रीच आले नाही त्यामुळे मी कलमात फसलो, असंही गडकरींनी सांगितलं.
खोटेपणा केला तर जेलमध्ये टाकू
संत्रा प्रक्रिया प्रकल्पात यायचे असेल या पण त्यांना खोटेपणा करायचा असेल तर त्यांनी यात येऊ नये नाही, खोटेपणा केला तर जेल मध्ये टाकू, असा इशाराही गडकरी यांनी दिला.
गावगावात तरुणांनी शेतकऱ्यांनी ड्रोन प्रशिक्षण घ्यावं
शेतकऱ्यांना फवारणीसाठी ड्रोन भाड्याने मिळेल. मी अशी व्यवस्था करणार असून आता गावगावात तरुणांनी शेतकऱ्यांनी ड्रोन प्रशिक्षण घ्यावं. याची किंमत 7-8 लाख रुपये आहे. आम्ही 4-5 लाखात मिळेल अशी व्यवस्था करतो.पाच वर्षात पेट्रोल डिझेल हद्दपार होईल. एक लिटर पेट्रोलमध्ये जेवढं अॅव्हरेज मिळतो. तेवढं अॅव्हरेज वर एक लिटर इथेनॉल वर मिळेल. अर्ध्या किमतीत इथेनॉल मिळतं. आगामी काळात इथेनॉलवर ड्रोन चालेल, असंही ते म्हणाले. शेतकऱ्यांचा विकास म्हणजे विदर्भाचा विकास. माझी पत्नी शेती करते. माझ्याकडे 60 एकर शेतीपैकी 22 एकर वर भाजीपाला आहे. मी नैसर्गिक शेती करतो, असंही गडकरी म्हणाले.