एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
नितेश राणेंच्या अटकेनंतर तुरुंगात पुस्तक वाचतानाचा फोटो व्हायरल, जाणून घ्या व्हायरल फोटो मागचं सत्य
Sindhudurg News : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीमधील शिवसैनिक संतोष परब यांच्यावर हल्ला प्रकरणातील संशयित आरोपी आमदार नितेश राणे यांना बुधवारी रात्री उशिरा सावंतवाडी पोलीस ठाण्यात आणण्यात आले.
Sindhudurg News : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीमधील शिवसैनिक संतोष परब (Santosh Parab) यांच्यावर हल्ला प्रकरणातील संशयित आरोपी आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांना बुधवारी रात्री उशिरा सावंतवाडी पोलीस ठाण्यात आणण्यात आले. यावेळी सावंतवाडी पोलीस ठाण्याला छावणीचे स्वरूप आले होते. आमदार नितेश राणे यांना कणकवली पोलिसांनी अटक केल्यानंतर अटकेची प्रक्रिया पूर्ण होताच त्यांना सावंतवाडी पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आले. त्यानंतर नितेश राणेंचा तुरुंगात पुस्तक वाचतानाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र हा फोटो जुना असल्याची माहिती समोर आली आहे.
आमदार नितेश राणेंना अटक केल्यानंतर सावंतवाडी पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांनी पोलीस कोठडीतील सर्व व्यवस्थेची पाहणी केली. न्यायालयीन निर्णयाप्रमाणे जेवण व्यवस्था केली जाईल अशीही माहिती दिली. तसेच आमदार नीतेश राणेंसोबत जिल्हा मुख्यालयातील पोलीस पथक सावंतवाडी पोलीस स्टेशन परिसरात ठाण मांडून आहे. आमदार नितेश राणे यांना सावंतवाडी पोलीस स्टेशन मध्ये आणणार असे समजताच भाजपा कार्यकर्त्यांनी सावंतवाडीत गर्दी केली. मोठ्या संख्येने कार्यकर्ते सावंतवाडी पोलीस स्टेशन परिसरात उपस्थित होते.
नितेश राणे यांच्या अटकेनंतर सध्या त्यांचा पुस्तक वाचतानाचा एक जुना फोटो व्हायरल होत आहे. त्या फोटोबद्दल खरी माहिती समोर आली आहे. हा फोटो साधारणपणे पाच वर्षांपूर्वीचा असल्याची माहिती समोर आली आहे. नितेश राणे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात वाळू प्रश्नावर राडा केला होता. त्याप्रकरणी त्यांना पाच वर्षांपूर्वी अटक करण्यात आली होती. मात्र सध्या अटक झाल्यानंतर त्यांचा हा जुना फोटो पुन्हा व्हायरल होत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
- Coronavirus Cases Today : देशातील कोरोनाचा आलेख पुन्हा वाढता, गेल्या 24 तासांत 1 लाख 72 हजार 433 कोरोनाबाधित
- शाळेत मुलांची हजेरी आवश्यक आहे की नाही हा निर्णय राज्यांचा : केंद्र सरकार
- INS Vagir : भारतीय नौदलाची ताकद वाढणार, आयएनएस वागीर पानबुडीची समुद्री चाचणी सुरु
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement