Nitesh Rane : नाशिकमधील ठाकरे गटाची सभा म्हणजे 'श्रद्धांजली सभा'; नितेश राणेंचा टोला
Nashik News : ठाकरे गटाच्या राज्यस्तरीय अधिवेशनाची भाजप आमदार नितेश राणे यांनी खिल्ली उडवली आहे. ठाकरे गटाची सभा म्हणजे 'श्रद्धांजली सभा' आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
Nitesh Rane : शिवसेना ठाकरे गटाचे (Shivsena UBT) राज्यस्तरीय अधिवेशन 22 आणि 23 जानेवारीला नाशिकमध्ये (Nashik News) होणार आहे, अशी माहिती शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) दिली. ठाकरे गटाच्या राज्यस्तरीय अधिवेशनाची भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी खिल्ली उडवली आहे. ठाकरे गटाची सभा म्हणजे श्रद्धांजली सभा आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
नितेश राणे म्हणाले की, निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांनी खरी शिवसेना एकनाथ शिंदेंचीच असल्याचे जाहीर केले आहे. २२ आणि २३ तारखेला नाशिकमध्ये राज्यस्तरीय अधिवेशन होणार असल्याचे संजय राऊत म्हणाले. ती खरी म्हटलं तर श्रद्धांजली सभा आहे. मातम मनवण्यासाठी हे सगळे एकत्र येत आहेत.
अधिवेशनाकडे कोणी ढुंकूनही पाहणार नाही
जी संघटनाच जिवंत नाही, जिचे अस्तित्वच नाही, तिचे चिन्ह असलेले मशाल राहील की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. या दोन दिवसांच्या अधिवेशनाकडे कुणी ढूमकूनही पाहणार नाही, अशी टीका यावेळी नितेश राणे यांनी केली.
काय म्हणाले संजय राऊत?
संजय राऊत म्हणाले की, पंतप्रधान मोदी नाशिकमध्ये येऊन काळाराम मंदिरात गेले. पूजा केली भव्य रॅली पण काढली. राजकीय आरती केली पण त्यांना भगूरच्या सावरकरांच्या स्मारकावर जावं वाटलं नाही. त्यांना सावरकरांची आठवण झाली नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची आठवण झाली नाही पण उद्धव ठाकरे जातील. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या निवासस्थानी जाऊन अभिवादन करतील. आमच्यासाठी तो दिवस अत्यंत महत्वाचा आहे. नाशिकमध्ये येऊन सावरकरांना अभिवादन केलं नाही असे होऊ शकत नाही.
उद्धव ठाकरे घेणार नाशिकमध्ये प्रभू श्रीरामाचे दर्शन
शिवसेनेच राज्यव्यापी अधिवेशन 22 आणि 23 तारखेला नाशिकमध्ये सुरु होत आहे. 22 तारखेला काळाराम मंदिरात दर्शन पूजा आणि रामकुंडावर पूजा असा कार्यक्रम असेल. प्रत्यक्षात 23 तारखेला अधिवेशन असेल. साधारण 5.30 वाजता उद्धव ठाकरे काळाराम मंदिरात जातील. पावणेसात वाजता उद्धव ठाकरे गोदातीरावर जातील आणि आरती होईल. याआधी अनेकदा आम्ही शरयू तीरावर आरती केलीय पण यावेळी नाशिकमध्ये करू. अयोध्येनंतर रामायणात पंचवटीला महत्व आहे. म्हणून आम्ही नाशिक निवडले आहे, असे संजय राऊत म्हणाले.
आणखी वाचा