एक्स्प्लोर

Nirjala Ekadashi : भगवंताची प्राप्ती करून देणारी ज्येष्ठ शुद्ध अर्थात निर्जला एकादशी, काय आहे महिमा...

Nirjala Ekadashi: वर्षभरात एकूण शुद्ध आणि वाद्य अशा 24 एकादशी असतात यातील प्रत्येक एकादशीचे महत्व वेगळे आहे. जेष्ठ शुद्ध अर्थात निर्जला एकादशीची उपासना थोडी अवघड असली तरी या एकादशीच्या व्रताने वर्षभराच्या सर्व एकादशीचे पुण्य लाभते अशी वारकरी संप्रदायात मान्यता आहे. 

पंढरपूर : वर्षभरात एकूण शुद्ध आणि वाद्य अशा 24 एकादशी असतात यातील प्रत्येक एकादशीचे महत्व वेगळे आहे. जेष्ठ शुद्ध अर्थात निर्जला एकादशीची उपासना थोडी अवघड असली तरी या एकादशीच्या व्रताने वर्षभराच्या सर्व एकादशीचे पुण्य लाभते अशी वारकरी संप्रदायात मान्यता आहे. 

'पंढरीचे वारकरी!ते अधिकारी मोक्षाचे!!' संत तुकाराम महाराज यांच्या वचनामध्ये वारी आणि वारकऱ्यांचे महत्व आणि महिमा दिसून येतो. खरेतर वारकरी हा मोक्षाचा अधिकारी हा जरी याचा वाच्यार्थ असला तरी हा मोक्ष घेण्यासाठी वारकऱ्याला फारसे स्वारस्य नाही कारण विठ्ठल भक्तीमुळे मोक्ष हा आधीच त्यांचे सोबत असतो आणि मोक्ष देण्याचा तो अधिकारी असतो अशा पद्धतीचा गूढार्थ तुकोबारायांनी सांगितलं आहे. 

निर्जला म्हणजे जलविना केलेली उपासना आणि म्हणूनच निर्जलचे व्रत थोडेसे कठीण असले तरी सर्वात जास्त फळ देणारे असते. महाभारतात महाशक्तीशाली अशा भीमाला उपवास करणे हे अशक्यप्राय गोष्ट होती. एकदा महर्षी व्यास यांनी भीमाला एकादशीचे व्रत करण्यास सांगितले. आपल्याला भूक सहन होत नसल्याने आपण वर्षातील 24 एकादशी कशी करणार असा प्रश्न केल्यावर महर्षींनी भीमाला निर्जला एकादशीचे व्रत करताना संपूर्ण एकादशीचा दिवस जलाविना उपवास केल्यास तुला 24 एकादशीचे फळ प्राप्त होईल असे सांगितल्याचे पौराणिक कथांमध्ये सांगितले आहे. 

एकादशी म्हणजे एक दिवसाचे लंघन, शरीर सत्रात देखील अशा लंघनाचे महत्व सांगताना उपवासामुळे शरीरचक्र व्यवस्थित काम करते असे सांगण्यात आले आहे. खरे तर उप-वास या शब्दाची फोड करताना उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे होय. देवाच्या जवळ चिंतनात राहणे म्हणजे उपवास अशी वारकरी संप्रदायाची मान्यता आहे . माणूस अखंड चिंता करीत राहतो मात्र एकादशीचा एक दिवस चिंतन केल्यास सर्व चिंतांचे हरण होते . निर्जला एकादशी म्हणजे भगवंताचे चिंतन करण्याचा दिवस..

चिंतने चिंतितां तद्रूपता म्हणजेच भगवंताचे चिंतन करता करता भगवंत स्वरूप होण्याचा दिवस होय. चिंतनाच्याही तीन पद्धती आहेत. यातील विषय चिंतन हा संसारी मनुष्य करतो, ब्रह्म चिंतन हे साधक किंवा मुमुक्षु करतात तर नामचिंतन वारकरी करतो. येणाऱ्या सर्व चिंतांवर प्रभावी असते नामचिंतन जे वारकरी संप्रदाय अवलोकित करतो . चिंता मध्येही तीन पद्धतीच्या चिंता आहेत . यातील गरीबीची चिंता पैशाने जाते , रोगाची चिंता औषधाने जाते आणि जन्ममरणाच्या अर्थात गर्भवासाची चिंता नामचिंतनाने जाते . नामचिंतन तसे कायमचा सुरु असावे पण चिंतामुक्त होण्यासाठी किमान निर्जला एकादशी दिवशी हे नामचिंतन केल्यास निर्जला एकादशीचे पुण्य लाभते . उपासनेच्या अनेक पद्धती आहेत . योग ,ज्ञानप्राप्ती या उपासनेत क्लेश , कष्ट जास्त असतात मात्रेकादशीचे व्रत हे इतर उपासनेपेक्षा सोपे आणि सुखदायक असून भागवत प्राप्तीसाठी यशदायी असल्याने वारकरी संप्रदाय या उपासनेचा प्रभावी साधन म्हणून वापर करतो . म्हणूनच वारकरी संप्रदायात एकादशीला अनन्यसाधारण महत्व आहे आणि त्यात निर्जला एकादशी हि सर्व एकादशीमध्ये खास आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मंत्रीपदाच्या कार्यकाळात वाढली एवढी संपत्ती; शिंदेंचे संदीपान भुमरे कोट्यवधींचे धनी
मंत्रीपदाच्या कार्यकाळात वाढली एवढी संपत्ती; शिंदेंचे संदीपान भुमरे कोट्यवधींचे धनी
Raigad Lok Sabha : रायगड लोकसभेत मतदारांना चकवा; तीन गीते, दोन तटकरे रिंगणात
रायगड लोकसभेत मतदारांना चकवा; तीन गीते, दोन तटकरे रिंगणात
IPL 2024 Hardik Pandya Video: हार्दिक पांड्याकडून खराब क्षेत्ररक्षण, पदापर्ण करणारा गोलंदाज रागाने पाहतच राहिला, पाहा Video
हार्दिक पांड्याकडून खराब क्षेत्ररक्षण, पदापर्ण करणारा गोलंदाज रागाने पाहतच राहिला, पाहा Video
Tutari Symbol: निवडणूक आयोगाकडून ट्रम्पेटचं भाषांतर तुतारी, चिन्हाच्या चुकीच्या भाषांतरामुळे बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंना टेन्शन!
निवडणूक आयोगाकडून ट्रम्पेटचं भाषांतर तुतारी, चिन्हाच्या चुकीच्या भाषांतरामुळे बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंना टेन्शन!
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Sanjay Shirsat :   महायुतीच्या मेळाव्यात बोलताना संजय शिरसाट यांची जीभ घसरलीVinod Patil Exclusive : मी कुठलाही बालहट्ट करत नाहीये; ही निवडणूक विकासाठी लढवायची आहे - विनोद पाटीलChanda Te Banda : चांदा ते बांदा बातम्यांचे अपडेट्स : 2 PM :  23 एप्रिल 2024 : ABP MajhaWashim Loksabha Election :वाशिमच्या जिल्हाधिकारी मतदार रॅलीत सहभागी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मंत्रीपदाच्या कार्यकाळात वाढली एवढी संपत्ती; शिंदेंचे संदीपान भुमरे कोट्यवधींचे धनी
मंत्रीपदाच्या कार्यकाळात वाढली एवढी संपत्ती; शिंदेंचे संदीपान भुमरे कोट्यवधींचे धनी
Raigad Lok Sabha : रायगड लोकसभेत मतदारांना चकवा; तीन गीते, दोन तटकरे रिंगणात
रायगड लोकसभेत मतदारांना चकवा; तीन गीते, दोन तटकरे रिंगणात
IPL 2024 Hardik Pandya Video: हार्दिक पांड्याकडून खराब क्षेत्ररक्षण, पदापर्ण करणारा गोलंदाज रागाने पाहतच राहिला, पाहा Video
हार्दिक पांड्याकडून खराब क्षेत्ररक्षण, पदापर्ण करणारा गोलंदाज रागाने पाहतच राहिला, पाहा Video
Tutari Symbol: निवडणूक आयोगाकडून ट्रम्पेटचं भाषांतर तुतारी, चिन्हाच्या चुकीच्या भाषांतरामुळे बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंना टेन्शन!
निवडणूक आयोगाकडून ट्रम्पेटचं भाषांतर तुतारी, चिन्हाच्या चुकीच्या भाषांतरामुळे बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंना टेन्शन!
Nashik Lok Sabha : हेमंत गोडसेंना उमेदवारी मिळणार का? छगन भुजबळ हसत हसत म्हणतात, 'त्यांनी गोड बातमी द्यावी'
हेमंत गोडसेंना उमेदवारी मिळणार का? छगन भुजबळ हसत हसत म्हणतात, 'त्यांनी गोड बातमी द्यावी'
Salman Khan House Firing : सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणी मुंबई पोलिसांना मिळाले मोठं यश
सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणी मुंबई पोलिसांना मिळाले मोठं यश
Nagpur News : मोदीजी तुम्हाला सहा भाऊ, योगी आदित्यनाथांना सात भावंडं, मग फक्त मुस्लिमांवरच टीका का? काँग्रेस नेत्याचा बिनतोड सवाल
मोदीजी तुम्हाला सहा भाऊ, योगी आदित्यनाथांना सात भावंडं, मग फक्त मुस्लिमांवरच टीका का? काँग्रेस नेत्याचा बिनतोड सवाल
Solapur Lok Sabha: शरद पवारांचा जबरा डाव, भाजपमध्ये हयात घालवलेल्या फडणवीसांच्या मर्जीतील नेत्याला अलगद गळाला लावलं
शरद पवारांचा जबरा डाव, भाजपमध्ये हयात घालवलेल्या फडणवीसांच्या मर्जीतील नेत्याला अलगद गळाला लावलं
Embed widget