एक्स्प्लोर

खासदार उदयनराजेंचा पाण्याशी संबंध फक्त मिक्स करण्यापुरता, रामराजे निंबाळकरांची टीका

आमदार खिशात आणि हे दोन खासदार मी माझ्या काखेत घेऊन फिरतो असा टोलाही त्यांनी लगावला. साताऱ्याच्या राजकीय क्षितीजावर जोवर हे तीन पिसाळलेली कुत्री असतील तोपर्यंत मीही पिसाळलेलाच राहणार असल्याचं रामराजेंनी म्हटलं.

सातारा : बारामतीकडे वळवलेल्या नीरा देवाघरच्या पाण्यावरुन सुरु झालेला संघर्ष आता दोन राजघराण्यांपर्यंत येऊन पोचला आहे. पिसाळलेली कुत्री असतील तोपर्यंत मीही पिसाळलेलाच राहणार, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते रामराजे निंबाळकर यांनी राष्ट्रवादीचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह खासदार रणजित निंबाळकर आणि आमदार जयकुमार गोरे यांच्यावर टीका केली आहे.

नीरा देवघरचे पाणी बारामतीकडे वळवण्यात रामराजे निंबाळकर यांनी पवारांना साथ दिली. तसेच त्या भागातील अनेक जमिनी लाटल्या, असा गंभीर आरोप उदयनराजे आणि खासदार रणजित निंबाळकर यांनी केले होते. या सर्व टीकेला रामराजे निंबाळकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

उदयनराजेंचा पाण्याशी संबंध फक्त मिक्स करण्यापुरताच असल्याचा टोला रामराजे निंबाळकरांनी लगावला. आपल्यावर जमीन लाटण्याचा आरोप करणाऱ्यांनी जवळीमध्ये काय केले हे आम्हाला माहित नाही का? असा सवाल उपस्थित केला. तसेच एक टन पुराव्याची कागदे आपल्याकडे असल्याचा इशाराही त्यांनी उदयनराजेंना दिला.

आम्हाला बांडगुळ म्हणणाऱ्यांनी त्यांच्या आधीच्या छत्रपतींची पिढी आमच्या पिढीनेच सांभाळली याची जाणीव ठेवा. तुमचा आणि माझा दोघांचाही राज्याभिषेक घरातच झाल्याने आपण दोघेही स्वयंघोषित राजे असल्याचे उत्तर रामराजेंनी दिले. मी लाल दिव्याच्या गाडीतून फिरलो तर तुमच्या पोटात का दुखतंय, तुम्हीही दोन वर्षे लाल दिव्याच्या गाडीत फिरुन काय केले, असा सवाल रामराजेंनी विचारला.

मी असे अनेक आमदार, खासदार अंगावर घेतले आहेत, त्यामुळे माजी ऊर्जा वाढतच गेली. आमदार खिशात आणि हे दोन खासदार मी माझ्या काखेत घेऊन फिरतो असा टोलाही त्यांनी लगावला. साताऱ्याच्या राजकीय क्षितीजावर जोवर हे तीन पिसाळलेली कुत्री असतील तोपर्यंत मीही पिसाळलेलाच राहणार असल्याचं रामराजेंनी म्हटलं. त्यामुळे दुष्काळी भागाचे बारामतीकडे वळवलेले पाणी पुन्हा दुष्काळी भागाला देण्याच्या भाजप सरकारने घेतलेल्या निर्णयानंतर आता राजघराण्यात उडालेला भडका अधिकच टोकाला जाऊ लागला आहे.

उदयनराजेंनी काय आरोप केले होते?

नीरा देवघर धरणाच्या पाण्यावरुन राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजेंनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीला घरचा आहेर दिला होता. त्यांनी राष्ट्रवादीचे नेते रामराजे निंबाळकर यांच्यावर नाव न घेता टीका केली होती. स्वतःच्या स्वार्थासाठी 14 वर्ष पाणी बारामतीला पळवलं. जमिनी लाटण्यासाठी काहींनी लोकांना पाण्यापासून दूर ठेवलं, असा गंभीर आरोप त्यांनी केले होते. या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि गुन्हेगारांवर कारवाई झालीच पाहिजे असंही उदयनराजेंनी म्हटलं होतं.

काय आहे वाद? 

माढ्याचे नवनिर्वाचित खासदार रणजित निंबाळकर यांनी निवडून येताच सांगोला येथील दुष्काळी बैठकीत नीर देवघर धरणाच्या पाण्याबाबत आवाज उठवत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे पाण्याची मागणी केली होती. त्यानंतर बारामतीकडे वळवलेले पाणी पुन्हा उजव्या कालव्यातील दुष्काळी भागात वळवण्याच्या निर्णय घेण्यात आला होता. या दुष्काळी भागात सांगोला, माळशिरस, पंढरपूर फलटणला या भागांचा समावेश येतो. आता पुन्हा एकदा 1954च्या कायद्यानुसार हे पाणीवाटप करण्याचा मोठा निर्णय भाजप सरकारने घेतला. बारामतीला वळवलेले दुष्काळी भागाच्या हक्काचे पाणी पुन्हा एकदा या भागाला मिळणार असल्याने या भागातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळून त्यांची तहान भागणार आहे.

आणखी वाचा

महत्त्वाच्या बातम्या

उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?
Manoj Jarange Patil: 'मराठ्यांपुढे सत्तेचं शहाणपण जमत नाहीत, आता आमच्या बाया चपला काढतील'; मनोज जरांगेंचा इशारा
'मराठ्यांपुढे सत्तेचं शहाणपण जमत नाहीत, आता आमच्या बाया चपला काढतील'; मनोज जरांगेंचा इशारा

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
Embed widget