दक्षिण आफ्रिकेची विमानसेवा रद्द करण्याची गरज, आरोग्यमंत्री टोपेंची केंद्राकडे मागणी
मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळ असल्यानं या नवीन विषाणूचा धोका मुंबईसाठी मोठा असल्याने मुंबई महापालिकेने सावधगिरीची भूमिका घेतली आहे.

मुंबई : ओमिक्रॉन व्हारियंटच्या पार्श्वभूमीवर साऊथ आफ्रिकेतून येणाऱ्या फ्लाईट्स रद्द करण्याची गरज असल्याचं राजेश टोपेंनी म्हटलं आहे. या संदर्भात केंद्राकडे मागणी देखील केली असल्याचं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. तर आज जाहीर केलेल्या नियमावलीत नविन विषाणूच्या पार्श्वभूमीवर लसीकरणावर भर देण्यात आला असून दंडात ही मोठ्या प्रमाणावर वाढवण्यात आली आहे.
राजेश टोपे म्हणाले, ओमिक्रॉन व्हेरिएंट साऊथ आफ्रिकेत आढळला असला तरी महाराष्ट्रात त्याचे तात्काळ परिणाम दिसण्याची शक्यता नाही. राज्यात प्रत्येक जिल्ह्यात दर महिन्याला 100 सॅम्पल घेऊन म्युटेशनची तपासणी करण्यात येते. ओमीक्रोनला घाबरण्याची गरज नसली तरी काळजी घ्यावी लागेल.
शाळा संदर्भात ही चर्चा करून योग्य निर्णय घेण्यात येईल
शाळा उघडण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला असून आरोग्य विभागाने NOC दिली आहे. मात्र उद्या सायंकाळी मुख्यमंत्री यासंदर्भात सर्व विभागाची बैठक घेणार असून त्यात शाळा संदर्भात ही चर्चा करून योग्य निर्णय घेण्यात येईल. ओमीक्रॉन दक्षिण आफ्रिकेत आढळला असला तरी महाराष्ट्रात त्याचे तात्काळ परिणाम दिसण्याची शक्यता नाही. शाळा उघडण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला असून आरोग्य विभागाने NOC दिली आहे. मात्र उद्या सायंकाळी मुख्यमंत्री यासंदर्भात सर्व विभागाची बैठक घेणार असून त्यात शाळा संदर्भात ही चर्चा करून योग्य निर्णय घेण्यात येईल.
मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळ असल्यानं या नवीन विषाणूचा धोका मुंबईसाठी मोठा असल्याने मुंबई महापालिकेने सावधगिरीची भूमिका घेतली आहे. आज आरोग्य विभाग आणि महत्त्वाच्या अधिका-यांची बैठक बोलावली असून नविन काही उपाययोजना यावर निर्णय घेण्याची शक्यता आहे. विमानतळावर येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची कसून तपासणी केली जाणार आहे. तर मुख्यमंत्रच्या उपस्थित राज्याच्या संदर्भात बैठक घेतली जाणार आहे.
दक्षिण आफ्रिकेत आढळलेला नविन विषाणू संदर्भात अद्याप फारशी माहिती उपलब्ध नाही. त्यामुळं या नविन विषाणूला नवीन काही उपाययोजना आहे का? त्याचे परिणाम नेमके काय होतात? यातून काही गंभीर आजार होतात का? सध्या सुरु असलेली लस या नविन विषाणूवर किती परिणामकारक आहे? याची कोणतीच माहिती राज्य सरकारकडे उपलब्ध नसल्यानं चिंतेत आहे. त्यामुळे या संदर्भात माहिती उपलब्ध करून देण्याच्या संदर्भात आरोग्य विभाग केंद्र सरकारशी पत्र व्यवहार करून यासंदर्भात सविस्तर माहिती मागवणार असल्याचे देखील राजेश टोपे म्हणाले.
Omicron COVID19 New Variant: धोका किती,उपाय काय?नव्या व्हेरियंटची ABCD; Raman Gangakhedkar EXCLUSIVE
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
