एक्स्प्लोर
Advertisement
जायकवाडीचे पाणी मांजरा उपखोऱ्यात आणण्याची योजना, सहा तालुक्यांना फायदा
जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडल्याने मराठवाड्याला मोठा दिलासा मिळणार आहे बीड जिल्ह्याच्या गेवराई माजलगाव आणि काही अंशी परळी तालुक्यातील गावांना या पाण्याचा नक्कीच फायदा होणार आहे.
बीड : जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडल्याने मराठवाड्याला मोठा दिलासा मिळणार आहे बीड जिल्ह्याच्या गेवराई माजलगाव आणि काही अंशी परळी तालुक्यातील गावांना या पाण्याचा नक्कीच फायदा होणार आहे.
जायकवाडीतून सोडलेले हे पाणी गोदावरी नदीच्या बंधाऱ्यात साचणार आहेच, शिवाय माजलगाव धरणासाठी पाणी सोडल्याने या धरणावर अवलंबून असलेल्या बीड, गेवराई, माजलगाव या शहरांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठा आधार ठरणार आहे. असे असले तरी बीड जिल्ह्यातील आष्टी, पाटोदा, शिरूर, केज, अंबाजोगाई, परळी, धारूर या तालुक्यांसाठी जायकवाडीचे पाणी समांतर प्रवाही कालव्याद्वारे जोडण्याच्या योजनेची माहिती ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना दिली आहे.
जायकवाडी प्रकल्पात उपलब्ध होणारे पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी समांतर प्रवाही कालव्याद्वारे माजलगाव धरणात आणून त्याद्वारे सिंदफना, कुंडलिका, वाण, मनार व मांजरा उपखोऱ्यात वळवणे. हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.
अशी आहे योजना
जायकवाडी धरण ते सिंदफना नदी यांना जोडणारा 70 किलोमीटर लांब जलदगती प्रवाही कलवा काढणे.
मांजरा, वाण, सरस्वती, गुणवती, बोरणा, मासोळी, व मनार प्रकल्पांचे स्थैर्यकरण करण्यासाठी उपसा सिंचन योजनेद्वारे पाणी उपखोऱ्यात वळवणे.
मराठवाडयातील बीड, केज, धारूर, वडवणी, शिरूर, पाटोदा, माजलगाव, अंबाजोगाई, परळी, अहमदपूर, कंधार, रेणापूर, चाकूर, बिलोली व मुखेड तालुक्यात नवीन सिंचन योजना हाती घेता येतील.
प्रस्तावित योजनेसाठी अंदाजे 6 हजार 700 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
मराठवाडा वॉटर ग्रिड या योजनेच्या पहिल्या टप्प्यात केवळ औरंगाबाद आणि जालना जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे सध्या जायकवाडी धरणामध्ये 90 टक्क्यांपेक्षा जास्त पाणी आहे. अशा परिस्थितीमध्ये समांतर प्रवाही कालव्याद्वारे छोट्या प्रकल्पामध्ये पाणी आले तर निश्चितच त्याचा फायदा मराठवाड्यातील लातूर बीड नांदेड जिल्ह्याला होऊ शकेल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement