एक्स्प्लोर

सयाजी शिंदेंच्या सह्याद्री देवराईकडून नवा उपक्रम, वाढदिवसादिवशी मातीचा केक कापून जनजागृती

सह्याद्री देवराईच्या वतीनं आता सुगंधी गार्डन ही संकल्पना देखील राबवण्यात येणार आहे. यासाठी औषधी वनस्पती, फळ झाडं आणि फुल-झाडं यांचा वापर करण्यात येणार आहे.

मुंबई : सह्याद्री देवराईच्या वतीने आज एका नव्या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. आज पासून सह्याद्री देवराईचे सदस्य अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरे करणार आहेत. वाढदिवसानिमित्त मातीचा केक कापून ती माती झाडं लावण्यासाठी वापरण्यात येणार आहे. या उपक्रमाची माहिती सह्याद्री देवराईचे प्रमुख सयाजी शिंदे आणि सह्याद्री देवराईची टीमने दिली आहे. 

याबाबत अधिक बोलताना अभिनेते सयाजी शिंदे म्हणाले की, "आजपासून सहयाद्री देवराईच्या वतीने वृक्षांच्या सानिध्यात वृक्षरोपण करून आता सर्व सदस्यांचा वाढदिवस साजरा करण्यात येईल. वाढदिवस साजरा करताना जे झाड लावण्यात येईल त्याची जबाबदारी सह्याद्री देवराईचे सदस्य आणि ज्याचा वाढदिवस आहे तो व्यक्ती किंवा त्याचे कुटुंबिय घेतील."

सह्याद्री देवराईच्या वतीनं आता सुगंधी गार्डन ही संकल्पना देखील राबवण्यात येणार आहे. यासाठी औषधी वनस्पती, फळ झाडं आणि फुल-झाडं यांचा वापर करण्यात येणार आहे. हा उपक्रम संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पार पडेल. अशाच प्रकारचा वाढदिवस आपल्या महाराष्ट्रातील जनतेने साजरा करावा आणि जास्तीत जास्त वृक्षारोपण करावं असा संदेश देखील यावेळी सयाजी शिंदे यांनी दिला. 

सह्याद्री देवराईकडून गेल्या वर्षी 'सावलीत वारी' उपक्रमाला सुरुवात करण्यात आली होती. वारीच्या मार्गांवर शेकडो वेगवेगळ्या प्रकारची झाडे लावण्यात आली होती. या झाडांना ज्ञानोबा, तुकोबा, मुक्ताई, पंढरीचा विठोबाराया समजून आपल्याला वाढवायचं आहे. भविष्यात याच झाडांच्या रूपात भगवंत आपल्या डोक्यावर छाया धरणार आहेत असं आवाहन करण्यात आलं होतं.

नागरिकांना आपल्या घरासमोर, रानात, बांधावर झाडे लावण्याचं आवाहन सह्याद्रीकडून करण्यात आलं आहे. 

संबंधित बातम्या : 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बाई नाही, तर लेकराची आई कडाडली; वाहतूक कोंडीने एवढं का संतापली महिला, मंत्र्यांनाही सुनावलं, नेमकं कारण काय?
बाई नाही, तर लेकराची आई कडाडली; वाहतूक कोंडीने एवढं का संतापली महिला, मंत्र्यांनाही सुनावलं, नेमकं कारण काय?
Malegaon Crime News: प्रियकरासाठी आईनेच पोटच्या मुलाचा अपहरणाचा बनाव रचला, पण 'ती' एक चूक अन् प्रकरणाच बिंग फुटलं, मालेगावच्या वडनेरमध्ये गुन्हा दाखल
प्रियकरासाठी आईनेच पोटच्या मुलाचा अपहरणाचा बनाव रचला, पण 'ती' एक चूक अन् प्रकरणाच बिंग फुटलं, मालेगावच्या वडनेरमध्ये गुन्हा दाखल
Maharashtra News Live Updates: मालेगाव 2006च्या स्फोटांप्रकरणी चौघा आरोपींना मोठा दिलासा; मुंबई उच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता
Maharashtra News Live Updates: मालेगाव 2006च्या स्फोटांप्रकरणी चौघा आरोपींना मोठा दिलासा; मुंबई उच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता
होय, महाराष्ट्रात मराठीच; मुंबईत मराठी सक्तीच्या प्रश्नावर रितेश देशमुख रोखठोक, म्हणाला, प्रताप सरनाईकांचा निर्णय योग्य
होय, महाराष्ट्रात मराठीच; मुंबईत मराठी सक्तीच्या प्रश्नावर रितेश देशमुख रोखठोक, म्हणाला, प्रताप सरनाईकांचा निर्णय योग्य

व्हिडीओ

Amol Mitkari On Murlidhar Mohol :ब्लॅक बॉक्स कुठे? विमानाचा CCTV कुठे? मोहोळांनी माफी मागावी-मिटकरी
Nashik TCS Case : निर्लज्जपणाचा कहर नराधमांच्या हाती पदर Special Report
Sanjay Dutt Movie : काँग्रेसच्या भुमिकेमुळे संजय दत्तच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह Special Report
Vidhan Parishad Election 2026: विधानपरिषद निवडणुकीत भाजपच्या वाट्याला 6 जागा, इच्छूकांची फिल्डिंग, ही 12 नावं रेसमध्ये, कोणाला उमेदवारी मिळणार
US- Iran Ceasefire: अमेरिका आणि इराणच्या युद्धविरामात वाढ; पुन्हा पाकिस्तानची मध्यस्थी; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नेपाळचे माजी गृहमंत्री जेलमध्ये असतानाच थेट विद्यमान गृहमंत्र्यांचा राजीनामा पडला! असं नेमकं घडलं तरी काय? अवघ्या 25 दिवसांपूर्वीच नव्या सरकारमध्ये शपथविधी
नेपाळचे माजी गृहमंत्री जेलमध्ये असतानाच थेट विद्यमान गृहमंत्र्यांचा राजीनामा पडला! असं नेमकं घडलं तरी काय? अवघ्या 25 दिवसांपूर्वीच नव्या सरकारमध्ये शपथविधी
RBI : ऑटो डेबिटपूर्वी खातेदारांना माहिती देणं आवश्यक, बँकांच्या मनमानीवर आरबीआयच्या नव्या नियमानं चाप, 24 तासांअगोदर माहित द्यावी लागणार
ऑटो डेबिटपूर्वी खातेदारांना माहिती देणं आवश्यक, बँकांच्या मनमानीवर आरबीआयच्या नव्या नियमानं चाप
Chhatrapati Sambhajinagar: घरात घुसली, आतून कडी लावली; महिलेचा सासू सुनेला संपवण्याचा प्रयत्न, डोक्यावर पिस्तुल रोखलं अन्... घटनेनं संभाजीनगर हादरलं
घरात घुसली, आतून कडी लावली; महिलेचा सासू सुनेला संपवण्याचा प्रयत्न, डोक्यावर पिस्तुल रोखलं अन्... घटनेनं संभाजीनगर हादरलं
बाई नाही, तर लेकराची आई कडाडली; वाहतूक कोंडीने एवढं का संतापली महिला, मंत्र्यांनाही सुनावलं, नेमकं कारण काय?
बाई नाही, तर लेकराची आई कडाडली; वाहतूक कोंडीने एवढं का संतापली महिला, मंत्र्यांनाही सुनावलं, नेमकं कारण काय?
मामाच्या घरी भाचीकडून डल्ला, सोन्याचे दागिने पळवले; पोलिसांनी शौचालयातून काढले, असा केला उलगडा
मामाच्या घरी भाचीकडून डल्ला, सोन्याचे दागिने पळवले; पोलिसांनी शौचालयातून काढले, असा केला उलगडा
कोल्हापुरात व्याजानं पैसे देण्याच्या बहाण्याने खासगी सावकाराचा महिलेवर अत्याचार; आरोपीच्या मोबाईलमध्ये 200 ते 300 अश्लील व्हिडिओ असल्याचा सनसनाटी दावा
कोल्हापुरात व्याजानं पैसे देण्याच्या बहाण्याने खासगी सावकाराचा महिलेवर अत्याचार; आरोपीच्या मोबाईलमध्ये 200 ते 300 अश्लील व्हिडिओ असल्याचा सनसनाटी दावा
'इथून बारात नेऊन दाखवं, तुला जिवंत सोडत नाही' अन् अवघ्या काही तासांतच त्याच मांडवात दुसरं लग्न! पोलीस अधिकाऱ्यानं वधूच्या प्रियकराच्या भीतीनं बारात नेलीच नाही अन् प्रियकरानं धमकीवर डाव साधला!
'इथून बारात नेऊन दाखवं, तुला जिवंत सोडत नाही' अन् अवघ्या काही तासांतच त्याच मांडवात दुसरं लग्न! पोलीस अधिकाऱ्यानं वधूच्या प्रियकराच्या भीतीनं बारात नेलीच नाही अन् प्रियकरानं धमकीवर डाव साधला!
मुनी निलेशचंद्रांचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य; जरांगे पाटलांचं नाव घेतलं, म्हणाले, RSS नसतं तर हिंदूंच्या डोक्यावर भगवी टोपी नसती
मुनी निलेशचंद्रांचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य; जरांगे पाटलांचं नाव घेतलं, म्हणाले, RSS नसतं तर हिंदूंच्या डोक्यावर भगवी टोपी नसती
Embed widget