(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Dhananjay Munde : मी कधीच कुणाचे मन दुखवुन स्वतःचे स्थान निर्माण केले नाही : धनंजय मुंडे
बलात्काराचे आरोप झाल्यानंतर मंत्री धनंजय मुंडे यांनी पहिल्यांदाच आपली प्रतिक्रिया दिली आहे.
बीड : कौटुंबिक कलह आणि तक्रारींमुळे मागच्या काही दिवसांपासून वादात सापडलेले राज्याचे सामाजिक व न्याय न्यायमंत्री आणि बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी पहिल्यांदाच आज छोटेखानी कार्यक्रममध्ये आपलं मन मोकळं केलं आहे. शिरूर कासार तालुक्यातील खोकरमोहा इथल्या ग्रामसचिवालयाचे उद्घाटन आज धनंजय मुंडे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी छोटेखानी कार्यक्रमांमध्ये धनंजय मुंडे बोलत होते.
बऱ्याच दिवसानंतर मी आज माईक हातात घेतला आहे, मला बरंच बोलायचं आहे. पण, पुढे कार्यक्रम असल्यामुळे बोलता येत नाही असं सांगतानाच अनेक विषय दाटून आलेत. मात्र, आता फार काही बोलणार नाही, असं म्हणत धनंजय मुंडे यांनी वादानंतर पहिल्यांदाच मौन सोडले.
..म्हणून मी तक्रार मागे घेतली, धनंजय मुंडे यांच्याविरोधात तक्रार मागे घेण्याचं कारण आलं समोर
अशा कठीण प्रसंगातसुद्धा तुम्ही तुमचे आशीर्वाद माझ्या पाठीशी उभे केले आहे. तुम्ही मला या कठीण काळात साथ दिली तुमचे उपकार मी शब्दात फेडू शकत नाही, हे सांगतानाच आपल्या उपकाराची परतफेड माझ्या कातड्याचे जोडे करून तुम्हाला घातले तरी ती पूर्ण होणार नाही, असे म्हणून उपस्थित समर्थकांचे धनंजय मुंडे यांनी आभार मानले. मी आतापर्यंत अनेक संकटाला सामोरे गेलो पण जीवनामध्ये कधीच कुणाचंही मन दुखवुन मी स्वतःचं स्थान निर्माण केलं नाही असं विधान हे धनंजय मुंडे यांनी यावेळी केलं.
काय आहे प्रकरण? मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा आरोप केला होता. या प्रकरणात मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण धनंजय मुंडे यांच्याविरोधातील बलात्काराची तक्रार मागे घेण्यात आली आहे. कौटुंबिक कारणं आणि या प्रकरणाचं राजकारण होत असल्याने तक्रार मागे घेत असल्याचं ट्वीट रेणू शर्मा या महिलेने केलं आहे. काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा हिने यांनी बलात्काराचा गंभीर आरोप केला होता. रेणू शर्मा यांनी मुंडे यांच्याविरुद्ध ओशिवारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. यानंतर धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्ट लिहीत यावर स्पष्टीकरण दिलं होतं. आपले करुणा शर्मा नावाच्या महिलेसोबत संबंध होते आणि या संबंधातून दोन मुले असल्याचा खुलासा त्यांनी केला होता. दरम्यान, यावर आता रेणू शर्मा यांनी ट्वीट करत तक्रार मागे घेण्याचं कारण सांगितलं आहे.