NEET Paper leak 2024 Update: विद्यार्थी-पालकांशी संभाषण, बँक व्यवहार, ॲडमिट कार्ड; फक्त NEET नव्हे, अनेक परीक्षेत घोळ, धक्कादायक माहिती समोर
NEET Paper leak 2024 Update: नीट पेपर प्रकरणात सीबीआयकडे तपास वर्ग झाल्यानंतर अनेक वेगवान हालचाली घडल्या आहेत.
NEET Paper leak 2024 Update: लातूर: लातूर नीट पेपरफुटीप्रकरणी अटक (NEET Paper leak case) असलेल्या दोन आरोपींना सहा तारखेपर्यंत सीबीआय (CBI) कोठडी देण्यात आली आहे. त्यानंतर सीबीआय पथकाने तपासाचा वेग वाढवला आहे. महाराष्ट्र पोलिसांकडून आजपर्यंत झालेल्या तपासाची सर्व कागदपत्रे आणि तपशील गोळा करण्यात आला आहे. सीबीआय पथकाने तपासाची गती आणि दिशा ठरवून कामाला सुरुवात केली आहे.
नीट पेपर प्रकरणात सीबीआयकडे तपास वर्ग झाल्यानंतर अनेक वेगवान हालचाली घडल्या आहेत. अटक आरोपींना सहा तारखेपर्यंत सीबीआय कोठडी देण्यात आली आहे. सीबीआय पथकाने आता लातूरमध्ये तपासाला सुरुवात केली आहे. यासाठी लातूर पोलिसाचे चार कर्मचारी बंदोबस्तासाठी मागवण्यात आले आहेत. नीट पेपर प्रकरणाचा सर्वप्रथम तपास एटीएस ने केला होता. यामुळे सीबीआय पथकाने एटीएस कडून मोबाईल डाटा आणि मोबाईल मागून घेतले आहेत. हे सर्व साहित्य आता सीबीआयच्या फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात येणार आहे.
सदर प्रकरणातील अटक आरोपी संजय जाधव आणि जलील पठाण याच्या नातेवाईक आणि परिवारातील सदस्य ची बँक खाते तपासण्यात येणार आहेत. यातील आरोपींनी आपल्या पत्नीच्या आणि नातेवाईकांच्या नावे ही काही व्यवहार केले आहेत. काही विद्यार्थ्यांचे पैसे पत्नीच्या नावे घेऊन पुढे पाठवण्याचा व्यवहारही झाला असल्याचे ही उघड झाले आहे. त्या बँक खात्याचा धांडोळा सीबीआय घेताना दिसत आहेत.
नीटच नव्हे, तर अनेक परीक्षेत घोळ...
जलील पठाण ,संजय जाधव आणि इराण्णा कोणगलवार यांनी नीट परीक्षेतील घोळाबरोबरच इतर परीक्षेत ही अशाच पद्धतीचे काम केल्याचं काही अंशी समोर आला आहे. आरोग्य विभागाच्या, शिक्षण विभागाच्या तसेच इतर अनेक विभागाच्या परीक्षेत गुण वाढवणे, प्रश्नपत्रिका फोडणे यासारखी कृती केल्याचं शक्यता पडताळून पाहण्यात येत आहे. नीट व्यतिरिक्त काही परीक्षांच्या यंत्रणेत प्रवेश करत गडबड करण्याच्या मानसिकतेने त्यांनी अनेकांना संपर्क केल्याचं समोर आलं होतं. त्यांनी ज्यांना संपर्क केला आहे अशा लोकांची सीबीआय पथक चौकशी करणार असल्याचे खात्री लायक माहिती आहे.
सीबीआयकडून तपास सुरु-
महाराष्ट्र पोलीस यांनी केलेल्या तपासानंतर आता सीबीआयचे पथक तपास करत आहे. आजपर्यंत केलेल्या तपासात या लोकांचा परराज्यातील परीक्षा सेंटरवरील संबंध... त्यांच्या मोबाईलमधील परराज्यातील ॲडमिट कार्ड... बँक खात्यामध्ये झालेले आर्थिक व्यवहार... अनेक विद्यार्थ्यांची आणि पालकांशी झालेली संभाषण आढळून आले आहेत. सीबीआयचे पथक आता त्यापुढे जाऊन तपास करत आहे. यातून या आरोपींचे देशातील किती राज्यात नेटवर्क काम करत होते याचा तपास ते घेत आहेत. दिवसेंदिवस या नेटवर्कची व्याप्ती वाढताना दिसत आहे.
संबंधित बातमी:
NEET Paper Leak Case: सीबीआयनं खाक्या दाखवताच आरोपींना फुटला घाम, चौकशीत धक्कादायक गोष्टी उघड होणार?