एक्स्प्लोर

राष्ट्रवादीची 'निर्धार परिवर्तनाचा' यात्रा सुरु

रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा आर्शिवाद घेवून आणि राजमाता जिजाऊ यांच्या समाधीचे दर्शन घेवून राष्ट्रवादीची निर्धार परिवर्तन संपर्क यात्रा सुरु झाली. त्यानंतर ऐतिहासिक महाडच्या चवदार तळ्यावर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करुन पहिल्या सभेची सुरुवात करण्यात आली.

रायगड : ज्या शिवछत्रपतींचा आर्शिवाद आणि त्यांच्या नावाचं ब्रॅडींग करुन भाजपाने सत्ता मिळवली. लोकांना अच्छे दिनाचे स्वप्न दाखवत देशातील आणि राज्यातील जनतेची फसवणूक केली आहे. त्या लोकांना धडा शिकवण्यासाठी शिवरायांच्या साक्षीने बळीराजाचे राज्य आणायचे आहे. म्हणून हा निर्धार करण्यात आला असून तशी शपथ रायगडावर घेतल्याचे सांगतानाच जातीयविरोधी, कामगारविरोधी, सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरणाऱ्या सरकारला सत्तेपासून दूर करण्याचा निर्धार समविचारी पक्षांना एकत्र घेवून परिवर्तनाची मुहुर्तमेढ आज रोवली गेली आहे त्याला साथ द्या, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी महाडच्या सभेत केले. रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा आर्शिवाद घेवून आणि राजमाता जिजाऊ यांच्या समाधीचे दर्शन घेवून राष्ट्रवादीची निर्धार परिवर्तन संपर्क यात्रा सुरु झाली. त्यानंतर ऐतिहासिक महाडच्या चवदार तळ्यावर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करुन पहिल्या सभेची सुरुवात करण्यात आली. राष्ट्रवादीची 'निर्धार परिवर्तनाचा' यात्रा सुरु दोन जातींमध्ये दाणे टाकून झुंजवणाऱ्यांच्या विरोधात लढूया : छगन भुजबळ ओबीसी-मराठा या जातीमध्ये आरक्षणाच्या नावावर लढवलं जात आहे. दोन्ही समाजाला सांभाळून रहावे लागणार आहे. तुमची-आमची लढाई ही दाणे टाकून झुंजवणाऱ्यांच्या विरोधात आहे. ही लढाई एकत्रित लढवली पाहिजे असे आवाहन माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले.  भुजबळ यांनी आपल्या भाषणामध्ये नरेंद्र मोदी यांची नक्कल करत तर कधी त्यांच्या घोषणांवर टिप्पणी करत आणि खोट्या आश्वासनांचा समाचार घेत जोरदार हल्ला केला. भाजप सरकारच्या फसव्या घोषणा आणि योजनांचा पाऊस व बिघडलेली कायदा व सुव्यवस्था या विषयांसह राफेल,  मीडियावरील बंदी, युतीतील वाद या सगळ्या विषयांना हात घालत  भुजबळ यांनी सरकारवर तोफ डागली. लाट नाही यांची तर वाट लागली आहे : जयंत पाटील आता लाट वगैरे काही राहिलेली नाही तर यांची वाट लागलेली आहे अशा शब्दात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी सरकारवर हल्लाबोल केला. हा देश व राज्य भाजप सरकारच्या कचाटयातून सोडवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा आर्शिवाद घेत, राजमाता जिजाऊंच्या समाधीचे दर्शन घेवून आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करुन राष्ट्रवादीने ही निर्धार परिवर्तन संपर्क यात्रा सुरु केल्याचेही  पाटील यांनी सांगितले.  आमच्या काळात जी प्रगती करण्यात आली ती सगळी अधोगतीकडे नेल्याचा आरोपही  पाटील यांनी केला. शिवरायांच्या आर्शिवादाने व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा सामाजिक विचार घेवून लोकसभेची जबाबदारी सुनील तटकरे यांच्यावर सोपवली आहे, असे सांगतानाच त्यांना लोकसभेत पाठवण्यासाठी तयारी करुया असे आवाहनही पाटील यांनी केले. भाजपाचा पराभव करण्यासाठी सर्व समविचारी पक्ष सोबत आल्याशिवाय राहणार नाही हे सत्य आहे त्यादृष्टीने तयारी सुरु असून भाजप सरकारचा शेवट केल्याशिवाय ही परिवर्तन यात्रा संपवणार नाही असा निर्धारही  पाटील यांनी व्यक्त केला. रायगडापासून इतिहास रचला जाणार : सुनील तटकरे या रायगडापासून इतिहास रचला जाणार असून वैभवाचे दिवस आणावयाचे असल्यास  आणि धर्मनिरपेक्षतेचे राज्य आणण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी पाठीशी उभे रहा असे आवाहन सुनील तटकरे यांनी केले. या ऐतिहासिक भूमीतून ही निर्धार यात्रा सुरु होत असून आम्ही लोकांची सेवा करण्यासाठी परिवर्तन मागत असल्याचेही  तटकरे म्हणाले. त्यांनी आपल्या भाषणामध्ये रायगड मतदारसंघात शिवसेनेकडून विकास झाला नसल्याचा आरोप करताना मंत्री अनंत गीते यांनी एकही उद्योग आणला नसल्याचेही सांगितले. भाजप सरकारला खड्यासारखं बाजूला करा : धनंजय मुंडे परिवर्तन हा निसर्ग नियम असून जे आपलं सरकार नाही त्या सरकारला खड्यासारखं बाजूला केल्याशिवाय गप्प बसायचं नाही असा निर्धार व्यक्त करतानाच राजा शिवछत्रपतींच्या आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना नतमस्तक होवून या रयतेच्या राजधानीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा खासदार तटकरे यांच्या रुपाने द्यावा असे आवाहन विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले. पहिली लढाई युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी जुलुमाविरोधी केली आणि आमचा निर्धार हुकुमशहाच्या विरोधात असल्याची स्पष्टता करतानाच छत्रपतींच्या नावाने सत्तेत आलेल्या आणि त्यांच्या नावाची बदनामी करणाऱ्या भाजप सरकारवर हल्लाबोल मुंडे यांनी केला. शिवाय शिवसेनेने वाघ हे चिन्ह बदलून आत्ता शेळीचे चित्र लावावे असेही मुंडे यावेळी म्हणाले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 20 January 2025Donald Trump oath Ceremony | अमेरिकेत पुन्हा डोनाल्ड ट्रम्प पर्व, 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून घेतली शपथSpecial Report Akshay Shinde Case | अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरप्रकरणी पोलीस गोत्यातJalgoan Crime News : जळगावात 'सैराट', पूजा-मुकेशच्या लव्हस्टोरीचा रक्तरंजित शेवट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
Embed widget