एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
राष्ट्रवादीचे माजी मंत्री लक्ष्मण ढोबळेंचा भाजपमध्ये प्रवेश
लक्ष्मण ढोबळे हे भाजपकडून सोलापुरातील लोकसभेच्या जागेसाठी इच्छुक आहेत. तसं झाल्यास ढोबळे सुशीलकुमार शिंदेंविरोधात रिंगणात उतरतील.
जालना : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी भाजपचा झेंडा खांद्यावर घेतला आहे. जालन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ढोबळेंनी भाजपमध्ये प्रवेश केला.
लक्ष्मण ढोबळे हे भाजपकडून सोलापुरातील लोकसभेच्या जागेसाठी इच्छुक आहेत. तसं झाल्यास ढोबळे सुशीलकुमार शिंदेंविरोधात रिंगणात उतरतील. लोकसभेचं तिकीट न मिळाल्यास मोहोळ मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवण्याची संधी मिळेल, अशी ढोबळेंना आशा आहे.
लक्ष्मण ढोबळे हे 2009 मध्ये सोलापुरातील मोहोळ-मंगळवेढा मतदारसंघातून विधानसभेचे आमदार होते. त्यांच्याकडे पाणीपुरवठा मंत्रालयाची जबाबदारी होती. ढोबळे पेशाने प्राध्यापक होते. 2014 साली एका महिलेच्या आरोपांनंतर ढोबळेंवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
लक्ष्मण ढोबळे हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पाया पडत असतानाचा एक फोटो वर्षभरापूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर ढोबळे भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उत आला होता. मात्र गुन्ह्यात अडकल्यामुळे त्यांचा भाजपप्रवेश रखडल्याचं म्हटलं जात होतं.
जालन्यात भाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक पार पडली. मुख्यमंत्री फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे, एकनाथ खडसे, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे, आशिष शेलार, बबनराव लोणीकर यांच्या उपस्थितीत कोअर कमिटीची बैठक झाली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जॅाब माझा
राजकारण
करमणूक
राजकारण
Advertisement