एक्स्प्लोर
कोकणात राष्ट्रवादीला भगदाड, सुनील तटकरेंच्या पुतण्याचा सेनेत प्रवेश
मुंबई : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा पुतण्या संदीप तटकरे यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला आहे. संदीप तटकरे हे सुनील तटकरेंचे बंधू अनिल तटकरेंचे सुपुत्र आहेत.
आज दादरच्या शिवसेनाभवनात संदीप तटकरेंनी सेनेत प्रवेश केला आहे. यावेळी केंद्रीय मंत्री अनंत गिते, आमदार भरत गोगावले आणि शिवसेना सचिव आदेश बांदेकर उपस्थित होते. संदीप तटकरेंचा शिवसेना प्रवेश कोकणात राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुनील तटकरेंच स्थान मोठं असल्यानं त्यांच्यासाठी हा फार मोठा धक्का आहे. दरम्यान संदीप तटकरेंच्या प्रवेशावेळी 'घडाळ्याचा काटा अडकला, भगवा झेंडा फडकला'च्या घोषणा शिवसैनिकांकडून देण्यात आल्या.
संदीप तटकरेंचं स्पष्टीकरण
मी नगराध्यक्ष पदासाठी तिकीटाची मागणी केली. पण नगराध्यक्ष पद कोणाला द्यावं हा प्रदेशाध्यक्षांचा अधिकार आहे. असं संदीप तटकरेंनी सांगितलं आहे. तसंच शिवसेना प्रवेश हा वैयक्तीक हा निर्णय असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. राष्ट्रवादीमध्ये आपल्याकडे कोणतंही पद नव्हतं त्यामुळे हे माझं राजकारणातलं पदार्पण आहे, असं मतही त्यांनी व्यक्त केलं. आव्हानं सगळ्यांसमोर असतात. ती पेलण्याची ताकद शिवसेनेत आहे, असा दावाही यावेळी त्यांनी केला.
दरम्यान मला काकांना कोणताही संदेश द्यायचा नाही. मी छोटा कार्यकर्ता आहे, असं सांगायला ते विसरले नाहीत.
केंद्रीय मंत्री अनंत गिते युतीबद्दल आशावादी
केंद्रीय मंत्री आणि शिवसेना नेते अनंत गिते यांनी 'ये तो बस झांकी है, आगे बहोत कुछ बाकी है' असं म्हटलं आहे. तसंच आता युती झालेली आहे, तशीच पुढेही सर्व ठिकाणी युती होईल अशी अपेक्षा असल्याचं स्पष्ट केलं आहे. शेकापचे काही नेते येत्या एक-दोन दिवसात सेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. संदीप तटकरे अपक्ष उमेदवार आहेत, पण त्याला शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा असेल, असंही गितेंनी सांगितलं. नगराध्यक्ष निवडून येतानाच सर्व 17 नगरसेवक देखील निवडून आणायचे आव्हान असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement