राष्ट्रवादी कुणाची? घड्याळ कोणाला मिळणार? नेत्यांची धाकधूक वाढली, निवडणूक आयोगाचा निकाल येणार कुठल्याही क्षणी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) कुणाचा आणि चिन्ह कुणाचं यावर केंद्रीय निवडणूक आयोगात (Election Commission) सुरु असलेली सुनावणी आठ डिसेंबरला पूर्ण झाली आहे.
मुंबई : राष्ट्रवादी (NCP) नेमकी कोणाची तसेच राष्ट्रवादी पक्षाचे चिन्ह नेमकं कोणाला मिळणार याबाबतचा निवडणूक आयोगातील (Election Commission) निकाल कोणत्याही क्षणी येऊ शकतो. राजकीय वर्तुळात अशी चर्चा होती की हा निकाल जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात येऊ शकतो नंतर निकाल अद्याप आलेला नाही. निकाल आल्यानंतर राष्ट्रवादी (NCP Political Crisis) चिन्ह आणि पक्ष नेमका कुणाचा? याबाबत आपल्याला स्पष्टता मिळणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) कुणाचा आणि चिन्ह कुणाचं यावर केंद्रीय निवडणूक आयोगात (Election Commission) सुरु असलेली सुनावणी आठ डिसेंबरला पूर्ण झाली आहे. दोन्ही गटाच्या वकिलांच्या प्रतिवादानंतर केंद्रीय निवडणूक आयोगानं निकाल राखून ठेवला होता. मात्र अद्याप निवडणूक आयोगातील ऑर्डर येणे बाकी आहे. त्यामुळे आता लवकरच राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला मिळणार की शरद पवार गटाला मिळणार हे स्पष्ट होणार आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या राष्ट्रवादी आमदार अपात्रता सुनावणीसंदर्भात लवकरच निकाल येऊ शकतो.
नार्वेकरांचे कामकाजाचे वेळापत्रक खालीलप्रमाणे
6 जानेवारी - राष्ट्रवादीचे दोन्ही गटांमध्ये याचिका आणि त्यावरील उत्तराची कागदपत्रे एकमेकांना सोपविली जातील.
8 जानेवारी - याचिकेसाठी अधिकची, अतिरिक्त माहिती जोडण्यासाठी वेळ.
9 जानेवारी - फाईल्स किंवा अधिकची, अतिरिक्त कागदपत्रे पटलावर आणणे. मात्र, ९ तारखेनंतर ऎनवेळी कोणतीही नवी कागदपत्रे जोडता येणार नाही. अशा मागणीचा विचार केला जाणार नसल्याचे स्पष्टपणे बजावण्यात आले आहे.
11 जानेवारी - याचिकेशी संबंधित कागदपत्रांची पाहणी आणि पडताळणी. पहिल्या दिवशी शरद पवार गट अजित पवार गटाकडून सादर झालेली कागदपत्रे तपासली जातील
12 जानेवारी - याचिकेशी संबंधित कागदपत्रांची पाहणी आणि पडताळणीचा दुसरा दिवस. अजित पवार गटाकडून शरद पवार गटाने सादर केलेल्या कागदपत्रांची पाहणी केली जाईल.
14 जानेवारी - सुनावणीच्या कामकाजात कागदपत्रांचा समावेश करण्यासाठी किंवा एखादे वगळण्यासाठी अर्ज दाखल करण्याचा दिवस.
16 जानेवारी - विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांसमोर पहिली प्रत्यक्ष सुनावणी. सुनावणीचे विषय नक्की केले जातील.
18 जानेवारी - प्रतिज्ञापत्र सादर करणे.
20 जानेवारी - अजित पवार गटाच्या साक्षीदारांच्या उलटतपासणी
20 व 21 जानेवारी अजित पवार गट उलट तपासणी
22 व 23 जानेवारी शरद पवार गट उलट तपासणी
23 जानेवारी - शरद पवार गटाच्या साक्षीदारांच्या उलटतपासणी
25 आणि 27 जानेवारी - राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचे अंतिम युक्तीवाद
हे ही वाचा :