एक्स्प्लोर
Advertisement
गडचिरोलीतील भूसुरुंग स्फोट प्रकरणी राष्ट्रवादीचा पदाधिकारी अटकेत
गडचिरोली जिल्ह्यातील भूसुरुंग स्फोट प्रकरणी अटकेतील आरोपी हा राष्ट्रवादी काँग्रेसचा तालुका पदाधिकारी असल्याची माहिती आहे
गडचिरोली : महाराष्ट्र दिनी गडचिरोली जिल्ह्यात झालेल्या भूसुरुंगस्फोटाच्या तपासादरम्यान अटक करण्यात आलेला एक आरोपी हा राष्ट्रवादी काँग्रेसचा तालुका पदाधिकारी असल्याची माहिती पुढे आली आहे. कैलास रामचंदानी असं आरोपीचं नाव आहे.
30 एप्रिलच्या रात्री नक्षल्यांनी कुरखेडा तालुक्यातील दादापूर (रामगड) येथील रस्त्याच्या कामावरील 27 वाहने आणि अन्य यंत्रसामग्री जाळली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी, म्हणजेच 1 मे रोजी जांभूळखेडा-लवारी गावादरम्यान असलेल्या नाल्याच्या पुलावर नक्षल्यांनी भूसुरुंग स्फोट घडवला. यात 15 पोलिस आणि एक खासगी वाहनचालक शहीद झाले होते.
या घटनेच्या तपासादरम्यान पोलिसांना अचानक मोठे यश मिळाले. सुरुंगस्फोटाच्या घटनेशी संबंधित नक्षल्यांच्या पश्चिम सबझोनल ब्युरोची प्रमुख नर्मदाक्का आणि तिचा पती किरणकुमार यांना अटक करण्यात आली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार आणि अन्य तांत्रिक पुराव्यांवरुन पोलिसांनी वेगवेगळ्या दिवशी दिलीप हिडामी, परसराम तुलावी, सोमनाथ मडावी, किसन हिडामी आणि सुकरु गोटा या पाच जणांना अटक केली होती.
प्रफुल दादा, कुरखेडा मार्गावर आम्ही यशस्वी झालो, गडचिरोलीच्या रस्त्यावर गूढ संदेश
पोलिस कोठडीदरम्यान या पाच जणांची विचारपूस केल्यानंतर पोलिसांना मोठा मासा गवसला तो होता कैलास रामचंदानी. कैलासचे कुरखेडा येथे इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्सचे दुकान असून, गेल्या काही महिन्यांपासून तो राष्ट्रवादी काँग्रेसचा कुरखेडा तालुक्याचा प्रमुख पदाधिकारी आहे. भूसुरुंग स्फोटासारख्या गंभीर गुन्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी अडकल्याने खळबळ उडाली आहे. त्याचा या घटनेत नेमका कसा सहभाग होता, किती दिवसांपासून तो नक्षल्यांच्या संपर्कात होता, याविषयी पोलिस तपास करत आहेत. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर यांना विचारणा केली असता, त्यांनी कैलास रामचंदानी हा राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी असल्याचे कबूल केले आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा बारकाईनं तपास चालवला असून यातून आणखी काही नावे पुढे येण्याची शक्यता आहे.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
निवडणूक
निवडणूक
Advertisement