Supriya Sule on Eknath Shinde : अडीच हजाराची दाढी आणि कटिंग, सत्ता आणि पैशाच्या जोरावर आलेलं हे सरकार; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
Supriya Sule on Eknath Shinde : हे सकार एका विमानातून उतरतंय आणि दुसऱ्या विमानात बसतंय. फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये अडीच हजार रूपयांची दाढी आणि कटिंग करतंय. त्यांना शेतकऱ्यांचं काही देणं-घेणं नाही, असा हल्लाबोल राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे.
मुंबई : राज्यातील सध्याचं सरकार विमानातून फिरतंय, हॉटेलात बसतंय अन् अडीच हजाराची दाढी, कटींग करतंय, असा टोला राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी शिंदे सरकारला लगावला आहे. सुप्रिया सुळे यांनी पुण्यात प्रति पंढरपूर असलेल्या विठ्ठल मंदिराला भेट दिली. यावेळी दर्शनानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, राज्यात सध्या भीषण परिस्थिती आहे. शेतकरी अडचणीत आहे. परंतु, हे सकार एका विमानातून उतरतंय आणि दुसऱ्या विमानात बसतंय. फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये अडीच हजार रूपयांची दाढी आणि कटिंग करतंय. त्यांना शेतकऱ्यांचं काही देणं-घेणं नाही. सर्व सामान्य नागरिक भरडला जात आहे. हे सरकार असंवेदनशील आहे.
"लोक सुरत, गुवाहाटी, गोवा फिरून आले. भारतदर्शन करून आले. बाहेरील राज्यातील पोलीस आपल्या आमदारांना ज्या पद्धतीने हाताळत होते हे अत्यंत दुर्दैवी आहे. जनतेचे सेवक असल्याचे हे सांगत आहेत. परंतु, यांचा स्वार्थ लपून राहिलेला नाही. हे सरकार अस्थिर आहे, परंतु, खरे रुप लपवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा हल्लाबोल सुप्रिया सुळे यांनी यावेळी केला.
उद्धव ठाकरेंना दुखावणे म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांना दुखावणे
सुप्रिया सुळे यांनी यावेळी बंडखोरी वरून देखील शिंदे गटातील आमदारांवर निशाणा साधला. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेचा उत्तराधिकारी ठरवला होता. परंतु, त्यांच्या विरोधात बंडखोरी करून त्यांना दुखावले जात आहे. उद्धव ठाकरे यांना दुखावणे म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांना दुखावण्यासारखे आहे, असा निशाणा यावेळी सुप्रिया सुळे यांनी साधला.
शेटपर्यंत शिवसेनेला साथ
शिवसेना हा आमचा मित्रपक्ष आहे. त्यामुळे या पूर्वी आम्ही शिवसेनेसोबत होतो आणि या पुढे देखील शिवसेनेसोबत कायम राहू, असे सुप्रिया सुळे यांनी यावेळी सांगितले.
हे सकार एका विमानातून उतरतंय आणि दुसऱ्या विमानात बसतंय. फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये अडीच हजार रूपयांची दाढी आणि कटिंग करतंय. त्यांना शेतकऱ्यांचं काही देणं-घेणं नाही. सर्व सामान्य नागरिक भरडला जात आहे. हे सरकार असंवेदनशील आहे.