एक्स्प्लोर

आमदार अनिल भोसलेंच्या भावाचा लॉकडाऊनमध्ये मुंबई-पुणे प्रवास

वाधवान बंधूंसह त्यांच्या कुटुंबीयांना महाबळेश्वरला जाण्याची विशेष परवानगी देण्याचं प्रकरण गाजत असतानाच आता तशाच प्रकारचं आणखी एक प्रकरण समोर आलं आहे.

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार अनिल भोसले यांचा भाऊ नितीन भोसले यांनी लॉकडाऊन असताना मुंबई-पुणे प्रवास केल्याचं समोर आलं आहे. कुटुंबियांना मुंबईहून आणण्यास मावळचे प्रांत अधिकारी संदेश शिर्के यांनी स्वत:च्या सहीचे पत्र दिले असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्या पत्रावर भाजपच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला आहे. मात्र हे पत्र ज्यांच्या सही शिक्यानिशी देण्यात आलंय त्या प्रांताधिकारी संदेश शिर्के यांनी त्यांच्या कार्यालयातील कुणीतरी आधीच सही करुन ठेवलेल्या पत्राचा गैरवापर केल्याचा दावा केला आहे. वाधवान कुटुंबाला कुठेही जाऊ देऊ नका, सीबीआयची सातारा जिल्हाधिकाऱ्यांना सूचना वाधवान बंधूंसह त्यांच्या कुटुंबीयांना महाबळेश्वरला जाण्याची विशेष परवानगी देण्याचं प्रकरण गाजत असतानाच आता तशाच प्रकारचं आणखी एक प्रकरण समोर आलं आहे. आमदार अनिल भोसले यांचा भाऊ नितीन भोसले यांच्यासह चार जणांनी प्रवास केल्याचं समोर आलं आहे. नितीन भोसले यांनी मुंबईतील वांद्रे इथल्या नातेवाईकांना आणण्यासाठी 8 एप्रिलला पुणे-मुंबई असा प्रवास केला. त्यासाठी मावळचे प्रांत संदेश शिर्के यांनी प्रवास करण्यासाठी परवानगीचे पत्र दिल्याचा दावा भोसले यांनी केला आहे. मात्र प्रांताधिकाऱ्यांनी आपण पत्रच दिलं नसल्याचं म्हटलं आहे. शिवाजीराव भोसले सहकारी बँक घोटाळा : आमदार अनिल भोसले यांना अटक आमदार अनिल भोसले जेलमध्ये पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेत कोट्यावधी रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी बॅंकेचे संचालक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषद आमदार अनिल भोसले हे जेलमध्ये आहेत. शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेत 71 कोटी 78 लाख रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. शिवाजीराव सहकारी बॅंकेने नियमबाह्य पद्धतीने कर्जांचं वाटप केल्याचं आणि संचालकांच्या नातेवाईकांनाच कर्ज दिल्याचं उघड झाल्यावर, रिझर्व्ह बँकेने या बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करुन प्रशासकाची नेमणूक केली होती. अनिल भोसले हे राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे विधानपरिदषदेचे आमदार बनले होते. मात्र तीन वर्षांपूर्वी झालेल्या महापालिका निवडणुकीवेळी त्यांनी भारतीय जनता पक्षासोबत घरोबा केला होता. अनिल भोसले यांच्या पत्नी रेश्मा भोसले या भाजपच्या नगरसेविका आहेत. या घोटाळ्या प्रकरणी ज्या 11 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे त्यामध्ये रेश्मा भोसले यांचाही समावेश आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nawab Malik at Ajit Pawar : अजित पवार यांच्या घरी डिनर डिप्लोमसी, नवाब मलिकांची खास उपस्थिती!Deekshabhoomi Underground Parking Issue : नागपूर दीक्षाभूमी आंदोलन कुणी भडकवलं? Spcial ReportTop 25 : रात्रीच्या राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 July 2024 : ABP MajhaVidhan Parishad Election Special Report : घेणार माघार की होणार घोडेबाजार? विधानपरिषदेत कुणाचा गेम?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Embed widget