Rohit Pawar on Pravin Darekar : भाजपच्या उपटसुंभांचा 'छंद' आपल्याला दिसत नाही का? रोहित पवारांचा दरेकरांना सवाल
भाजपचे नेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यात चांगलेच आरोप प्रत्यारोप रंगल्याचे चित्र दिसत आहे.
Rohit Pawar on Pravin Darekar : सध्या विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यात चांगलेच आरोप प्रत्यारोप रंगल्याचे चित्र दिसत आहे. चंद्रकांतदादांवर टीका करण्याइतके रोहित पवार मोठे नसल्याचे वक्तव्य दरेकर यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्याला आज रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. पवार साहेबांच्या राजकीय कारकिर्दीएवढंही वय नसलेल्या भाजपातील काही उपटसुंभांचा साहेब व इतर नेत्यांविषयी खालच्या पातळीवरची भाषा वापरण्याचा 'छंद' आपल्याला दिसत नाही का? असा सवाल रोहित पवारांनी केला आहे.
नेमकं काय म्हणाले रोहित पवार
दरेकर साहेब वयाचा विचार करायचा तर आदरणीय पवार साहेबांच्या राजकीय कारकिर्दीएवढंही वय नसलेल्या भाजपातील काही उपटसुंभांचा साहेब व इतर नेत्यांविषयी खालच्या पातळीवरची भाषा वापरण्याचा 'छंद' आपल्याला दिसत नाही का? अशांना महत्त्व देत नाही, पण ते गरळ ओकताना भाजपचे मोठे नेते का गप्प बसतात? असा सवाल रोहित पवार यांनी प्रविण दरेकर यांना केला आहे.
काय म्हणाले होते प्रविण दरेकर
रोहित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर केलेल्या टीकेवरही दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली होती. चंद्रकांतदादांवर टीका करण्याइतके रोहित पवार मोठे नसल्याचे दरेकर म्हणाले. पवार साहेब किंवा दुसरे पवार आहेत त्यामुळे रोहित पवार यांनी चंद्रकांतदादा यांना सल्ला देऊ नयेत असेही ते म्हणाले. चंद्रकांतदादांनी हे सगळं करायला सांगितलं आहे का? मग टीका कशाला करता. रोहित पवार हे बुजुर्गपणाचा आव आणत आहेत असेही दरेकर म्हणाले होते. मला वाटतं रोहित पवार अजून लहान आहेत. चंद्रकांतदादांवर टीका करायला मोठे पवार आहेत, त्यानंतर दोन नंबरचे पवार आहे. त्यामुळे त्यांनी चंद्रकांतदादांना सल्ला देण्याची घाई करु नये असे दरेकर म्हणाले होते. रोहित पवार हे आपल्यापेक्षा जास्त क्षमता असललेल्या नेत्यांवर टीका करत आहेत असे दरेकर म्हणाले होते.
विविध मुद्यावरुन राजकीय वातावरण तापलं
सध्या विविध मुद्यांवरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. नुकताच केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या पुणे दौऱ्यावर आल्या होत्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने त्यांच्या विरोधात आंदोलन केले होते. यावेळी राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याला भाजपच्या कार्यकर्त्याकडून मारहाण झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आला होता. त्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. यावरुन नेते ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहे.
महत्वाच्या बातम्या: