एक्स्प्लोर

जितेंद्र आव्हाडांनी रोहित पवारांना झापलं, म्हणाले, पहिल्या टर्मचा आमदार, अबूधाबीत बसून बोलणं सोपं!   

प्रभू श्रीरामासंदर्भात केलेल्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा भूमिका स्पष्ट केली. त्यावेळी त्यांनी रोहित पवार यांच्या ट्वीटचाही समाचार घेतला.

Jitendra Awhad On Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad)  यांनी रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या वक्तव्याचा समाचार घेतलाय. प्रभू श्रीरामासंदर्भात केलेल्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी पत्रकार परिषद (Jitendra Awhad Press Conferance) घेत पुन्हा एकदा भूमिका स्पष्ट केली. त्यावेळी त्यांनी रोहित पवार यांच्या ट्वीटचाही समाचार घेतला. रोहित पवार पहिल्या टर्मचा आमदार आहे, त्यांच्याकडे मी फारसं लक्ष देत नाही. अबूधाबीत बसून बोलणं सोपं असतं, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले. जितेंद्र आव्हाड यांनी शिर्डी येथील पक्षाच्या शिबिरात रामाच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याच्या संदर्भात रोहित पवार यांनी ट्विट करत मत व्यक्त केले होते. राज्यातील महत्वाचे मुद्दे सोडून देव आणि धर्म यावर बोलणं सोडल पाहिजे.देव आणि धर्म ही वैयक्तिक भावना असल्याचे रोहित पवार यांनी म्हटले होतं. याला आता जितेंद्र आव्हाड यांनी सडेतोड उत्तर दिलेय. 

रोहित पवारांबद्दल काय म्हणाले आव्हाड ?

रोहित पवार यांच्याबाबत मी बोलणार नाही, रोहित पवार काय बोलतात. याकडे मी लक्ष देत नाही. ते लहान आहेत. त्यांची आमदारकीची पहिली टर्म आहे. अबुधाबी मध्ये जाऊन रोहित पवार यांना तिथून बसून बोलणं सोप्प आहे, असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी लगावला.
 
रोहित पवार काय म्हणाले होते ?

आज नको त्या विषयावर बोलून वाद ओढवून घेण्यापेक्षा राज्यातील वाढती बेरोजगारी, ढासळलेली कायदा व सुव्यवस्था, महिलांची सुरक्षितता, शेतमालाला भाव नसणं, महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये पळवणं, जाती-जातींमध्ये निर्माण केला जाणारा तणाव या ज्वलंत विषयांवर बोलून सरकारला धारेवर धरण्याची अधिक गरज आहे. देव आणि धर्म हा प्रत्येकाचा व्यक्तिगत विषय असून.. याबाबत प्रत्येकाची श्रद्धा असल्याने कुणीही याचं राजकारण करू नये, पण देव धर्माच्या नावावर जे राजकारणाचा बाजार करतात त्यांना ते लखलाभ.. अशा राजकीय व्यापाऱ्यांना जनता चोख उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही.. त्यामुळं देव या विषयावर अनावश्यक बोलून विरोधकांच्या सापळ्यात न अडकण्याचं भान सर्वांनीच ठेवलं पाहिजे, अशी एक नागरिक म्हणून माझी भावना आहे!

मी कुठलंही भाष्य अभ्यासाशिवाय केलेलं नाही : जितेंद्र आव्हाड

"अन्न पुराणी नावाचा पिक्चर आला आहे. 1 डिसेंबर 2023 ला. दक्षिणेतील सुपरस्टार दोघे त्यामध्ये आहेत. त्यामध्ये त्यांनी पाठांतर वाल्मिकींनी लिहिलेल्या रामायणातील श्लोक म्हणून दाखवला आहे. मी कुठलंही भाष्य अभ्यासाशिवाय केलेलं नाही. पण त्याही वरती मी जाऊन सांगतो, आजकाल अभ्यासाला महत्व नाही, भावनांना महत्व आहे. त्यावर मी म्हणेन, माझ्या कालच्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी खेद व्यक्त करतो.", असं आव्हाड म्हणाले. 

महत्त्वाच्या बातम्या

पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
दोन वर्षांपूर्वी लग्न, 2 जुळ्या मुली; ठाण्यातील मृत TDRF जवानाच्या कुटुंबीयांचा आक्रोश, ठाणे महापौरांकडून आश्वासन
दोन वर्षांपूर्वी लग्न, 2 जुळ्या मुली; ठाण्यातील मृत TDRF जवानाच्या कुटुंबीयांचा आक्रोश, ठाणे महापौरांकडून आश्वासन
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Nifty 50 : निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
Prashant Kishor : बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर जिंकत आहेत म्हणजेच भाजप जिंकतंय, लालू प्रसाद यादव यांची लेक मीसा भारती यांचा दावा
जनतेला सत्य माहिती नाही, प्रशांत किशोर हेच भाजपचे उमेदवार, लालू प्रसाद यादव यांची कन्या मीसा भारतींचा दावा
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?

Embed widget