(Source: ECI/ABP News/ABP Majha)
NCP MLA Jitendra Awhad Resignation Live Updates : जितेंद्र आव्हाडांवरील गुन्ह्यानंतर नाशिकमध्ये राष्ट्रवादी आक्रमक, थेट गृहमंत्र्यांना इशारा
NCP MLA Jitendra Awhad Resignation Live Updates : जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.
LIVE
Background
Jitendra Awhad Resignation of MLA : तक्रारदार महिलेनं मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर गुन्हा दाखल केला असल्याचा खळबळजनक दावा राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (NCP MLA Jitendra Awhad) यांनी केला आहे. दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेत असल्याचं ट्वीट केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. अशातच पोलिसांनी 72 तासांत माझ्याविरोधात दोन खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोपही या ट्वीटमधून जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
महाविकास आघाडीच्या सरकारमधले गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत एक मोठा बॉम्ब फोडला आहे. आमदारकीचा राजीनामा देत असल्याचं जितेंद्र आव्हाडांनी ट्वीट केलं आहे. पोलिसांनी 72 तासांत दोन खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केला आहे. लोकशाहीची हत्या उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नाही, असं जितेंद्र आव्हाडांनी ट्वीट केलं आहे. हर हर महादेव सिनेमावरुन विवियाना मॉलमध्ये झालेल्या राड्याप्रकरणी जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याप्रकरणी त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. तर काल कळवा-मुंब्रा नवीन पुल उद्घाटनाच्या कार्यक्रमादरम्यान महिलेनं विनयभंगाचा आरोप केल्यानंतर जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल करण्यात आला. हे दोन गुन्हे दाखल झाल्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी आमदारकीचा राजीनामा देत असल्याचं ट्वीट केलं आहे.
मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतोय, असं ट्वीट राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केलं आहे. पोलिसांनी 72 तासांत माझ्याविरोधात दोन खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोपही या ट्वीटमधून जितेंद्र आव्हाड (NCP MLA Jitendra Awhad) यांनी केला आहे. तसेच, लोकशाहीची हत्या उघड्या डोळ्यांनी बघू शकत नाही, असंही जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
राष्ट्रवादी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट केलं आहे की, "पोलीसांनी माझ्या विरुद्ध 72 तासांत दोन खोटे गुन्हे दाखल केले आणि तेही 354. मी या पोलिसी आत्याचारा विरुद्ध लढणार. मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेत आहे. लोकशाहीची हत्या.. उघड्या डोळ्यांनी नाही बघू शकत."
आव्हाड यांच्याविरोधातील विनयभंगाचे आरोप हा कटाचा एक भाग; अजित पवार यांचा आरोप
Jitendra Awhad: आव्हाड यांच्याविरोधातील विनयभंगाचे आरोप हा कटाचा एक भाग असल्याचा आरोप अजित पवार यांनी केला आहे.
Jitendra Awhad: विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी घेतली जितेंद्र आव्हाड यांची भेट
Jitendra Awhad: राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी घेतली आमदार जितेंद्र आव्हाड यांची भेट घेतली.
जितेंद्र आव्हाड यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्याविरोधात जळगावमध्ये राष्ट्रवादीचे आंदोलन
माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केल्याच्या निषेधार्थ आज जळगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात आले. जितेंद्र आव्हाड यांच्यावर 72 तासांमध्ये दोन गुन्हे दाखल झाले असून सरकारची दडपशाही यातून दिसून येत आहे. यापुढे कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले तर राष्ट्रवादी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल असा इशारा यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांनी दिला आहे.
कोणतीही कारवाई राजकीय सुडापोटी केली जाणार नाही; आव्हाडांवरील कारवाईवर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
मुंबई : जितेंद्र आव्हाड यांनी राजीनामा दिला की नाही हे मला माहित नाही. परंतु, या प्रकरणात पोलिस नियमानुसार चौकशी करतील. संबंधित महिलेच्या तक्रारीत तथ्य असेल तर पोलिस आपले काम करतील. आम्ही कोणत्याही सुडापोटी कारवाई करत नाही, असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
जितेंद्र आव्हाडांवरील गुन्ह्यानंतर नाशिकमध्ये राष्ट्रवादी आक्रमक, थेट गृहमंत्र्यांना इशारा
नाशिक : माजी गृहनिर्माण मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर दाखल केलेल्या गुन्ह्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला. नाशिक मधील हुतात्मा स्मारक येथे राष्ट्रवादी युवकच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन करत आव्हाड यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या विनयभंगाच्या गुन्ह्याचा निषेध केला. जितेंद्र आव्हाड यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केला असल्याचं या कार्यकर्त्यांनी म्हटले आहे. तसेच जर या प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांना अटक झाली किंवा वेगळ्या प्रकारची कारवाई झाली तर कार्यकर्ते आक्रमक होतील. त्यानंतर पुढे जे काही होईल त्याला गृहमंत्री जबाबदार राहतील, असा इशारा या कार्यकर्त्यांनी दिलाय.