एक्स्प्लोर

Supriya Sule : शेतकऱ्यांकडं ना झाडी, ना हॉटेल ना 50 खोके, सुप्रिया सुळेंचा सरकारवर हल्लाबोल

सरकारनं ओला दुष्काळ जाहीर करावा तसेच सरसकट कर्जमाफी करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केली.

Supriya Sule on State Govt : गेल्या काही दिवसात झालेल्या पावसामुळं (Rain) शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकासन झालं आहे. त्यामुळं सरकारनं ओला दुष्काळ जाहीर करावा तसेच सरसकट कर्जमाफी करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केली. शेतकऱ्यांकडं ना झाडी, ना हॉटेल, ना 50 खोके असे म्हणत सुप्रिया सुळेंनी सरकारवर हल्लाबोलही केला. केंद्र आणि राज्य सरकारला सर्व सामन्यांचे घेणं देणं नाही. स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. शेतकऱ्यांच्या बांधावर कुणीही जात नसल्याचेही सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या.

लोकसभेआधीच विधानसभा निवडणूक लागेल अस वाटतंय

खासदार सुप्रिया सुळे या पुरंदरच्या दौऱ्यावर आहेत. पुरंदर तालुक्यात मुसळधार पाऊस झाला आहे.  त्या पावसामुळं शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. पांगारे गावात सुप्रिया सुळेंनी शेतात जाऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेतल्या. राऊतवाडी या ठिकाणी हरणी ते मुरती या रस्त्याचे भूमिपूजन देखील सुळेंनी केलं. सध्या ज्या पद्धतीनं राज्यात राजकारण सुरु आहे, त्यानुसार लोकसभेआधीच विधानसभा निवडणूक लागेल अस वाटतं असल्याचे सुळे म्हणाल्या. 

 माणूस उपाशी राहिला तरी चालेल पण फोटो लागला पाहिजे

सरकारचे दिवाळी गिफ्ट पोहोचले नाही. कारण त्यांना पाहिजे असणारे फोटो त्यावर लागले पाहिजेत. एक वेळ माणूस उपाशी राहिला तरी चालेल पण फोटो लागला पाहिजे, असं म्हणत सुप्रिया सुळेंनी सरकारवर हल्लाबोल केला. केंद्र आणि राज्य सरकारला सर्व सामन्यांचं घेणं-देणं नाही. स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. शेतकऱ्यांच्या बांधावर कुणीही जात नसल्याचे सुळे यावेळी म्हणाल्या. आमच्या शेतकऱ्यांकडे ना झाडी आहेत ना हॉटेल ना 50 खोके असा टोलाही त्यांनी सरकारला लगावला. ही दिवाळी आपल्यासाठी गोड नाही. एवढा पाऊस झाला की, आपली दिवाळी गोड झाली नाही. सरकारला विनंती आहे तुम्ही सगळं बाजूला ठेवा, ओला दुष्काळ आणि सरसकट कर्जमाफी करा अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केलीय.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे मतभेद झाले पण मनभेद कधीच झाले नाहीत

आपण उद्धव ठाकरेंची शिवसेना अस म्हणायचं नाही. कारण बाळासाहेब ठाकरे यांनी पक्ष सुरु केला. त्यांनी त्यांचा उत्तराधिकारी उद्धव ठाकरेंना नेमला. मला सध्या शिवसेनेचे वाईट वाटते. काही जणांनी खुर्चीसाठी सत्ता ओरबाडून घेतली. पण सुडाचे राजकारण जास्त दिवस टिकत नसल्याचे सुळे म्हणाल्या. काँग्रेस आणि आम्ही वेगळे आहोत. आम्ही कधी म्हणतो का सोनिया गांधी आमची मावशी आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे मतभेद झाले पण मनभेद कधीच झाले नाहीत असे सुळे म्हणाल्या. 

महत्त्वाच्या बातम्या:

Sangli Rain : परतीच्या पावसानं टोमॅटोवर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव, सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्याचं मोठं नुकसान

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bhaskar Jadhav : शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
India Open 2025 Badminton : पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
Garbage Free Hour : बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahakumbh Mela 2025 | महाकुंभ मेळाव्यात आज पहिलं अमृत स्थान Special ReportWalmik karad Macoca | वाल्मीक कराडवर मकोका, मुलासाठी आईची तळमळ, परळीत ठिय्या Special ReportRajkiya Shole Sharad pawar vs Amit Shah|अमित शाहांच्या टीकेला शरद पवारांचं तिखट उत्तर Special ReportRajkiya Shole on Walmik Karad | वाल्मीक कराडवर मकोका, आससापोटी गुन्हे वाढवत असल्याचा पत्नीचा आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhaskar Jadhav : शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
India Open 2025 Badminton : पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
Garbage Free Hour : बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
मोठी बातमी! धनंजय मुंडे देवगिरीवर, अजित पवारांशी 10 मिनिटं चर्चा अन् थेट परळीला रवाना
मोठी बातमी! धनंजय मुंडे देवगिरीवर, अजित पवारांशी 10 मिनिटं चर्चा अन् थेट परळीला रवाना
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Embed widget