एक्स्प्लोर

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचारासाठी राज्य महिला आयोग कार्यालयाचा गैरवापर; काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षांचा आरोप

महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर या आयोगाच्या कार्यालयातूनच पक्षाचा प्रचाराचे काम करत असल्याने त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे यांनी केलीय.

Lok Sabha Election : महिलांवर होणार्‍या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी तसेच महिलांच्या हक्कासाठी महिला आयोग काम करत असते. परंतु महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या (State Woman Commission) कार्यालयाचा वापर आता राजकीय कार्यक्रमासाठी केला जात असून महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) या आयोगाच्या कार्यालयातूनच अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) प्रचाराचे काम करत असल्याने त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे (Sandhya Sawalakhe) यांनी केली आहे. तसेच याप्रकरणी वेळीच योग्य ती कारवाई न झाल्यास निवडणूक आयोगाकडेही रितसर तक्रार दाखल करणार असल्याचा इशाराही संध्या सव्वालाखे यांनी दिला आहे. त्यामुळे आता या प्रकरणी नेमकी काय कारवाई केली जाते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.  

राज्य महिला आयोग कार्यालयाचा गैरवापर

महिला आयोगाचे अध्यक्षपद हे संवैधानिक पद आहे. महिला आयोगाच्या कार्यालयातच आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पक्ष प्रचाराचे काम करून पदाची प्रतिष्ठा धुळीस मिळवली आहे. पक्ष प्रचाराचे काम वरिष्ठाच्या दबावाखाली करावे लागत आहे का, हे रुपाली चाकणकर यांनी स्पष्ट केले पाहिजे. तसेच चाकणकर या दडपणाखाली पक्ष प्रचाराचे काम करत असतील तर ते अयोग्य, चुकीचा पायंडा पाडणारे आणि असंवैधानिक असल्याचा आरोप काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे यांनी केली आहे. महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी जे कार्यालय आहे, त्या कार्यालयातून राजकीय प्रचाराचे काम व्हायला नको. याप्रकरणी योग्य ती कारवाई करावी अन्यथा निवडणूक आयोगाकडे या प्रकाराची रितसर तक्रार दाखल केली जाणार असल्याचा इशाराही संध्या सव्वालाखे यांनी दिला आहे.

महिलांना न्याय मिळत नसल्याचा आरोप 

रूपाली चाकणकर यांच्यावर यापूर्वी देखील महिला आयोगाच्या सदस्याच संगीता चव्हाण (Sangeeta Chavan) यांनी आरोप करत, रूपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्ष असल्या तरी त्यांच्या दरबारात महिलांना न्याय मिळत नसल्याचा म्हणाल्या होत्या. त्यावेळी संगीता चव्हाण यांनी रूपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणीही त्यांनी केली होती. विशेष म्हणजे गडचिरोली मधील वन विभागात असलेल्या एका प्रकरणात संबंधित महिलेला महिला आयोगाच्या कार्यालयातून हाकलून लावण्यात आले. त्या महिलेने आतापर्यंत महिला आयोगाकडे  न्याय मागण्यासाठी किती वेळा अर्ज आणि विनवणी केली, याचे पुरावे देखील संगीता चव्हाण यांनी दाखवले होते. महाविकास आघाडीचे सरकार असताना महिला आयोगाच्या माध्यमातून अनेक महिलांना न्याय मिळाला. मात्र रूपाली चाकणकर या फक्त आता आपल्या पक्षाचे काम करत असून महिलांना न्याय मिळत नसल्याचे आरोपही संगीता चव्हाण यांनी केले होते.

इतर महत्वाच्या बातम्या 

Rupali Chakankar: महिला आयोगाच्या सदस्याकडून रुपाली चाकणकरांवर गंभीर आरोप, अध्यक्षपदाच्या राजीनाम्याची मागणी

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

भारतातील टॉप 10 सर्वात श्रीमंत शहरे, मुंबईचा पहिला नंबर; पुणेकर कितव्या स्थानी?
भारतातील टॉप 10 सर्वात श्रीमंत शहरे, मुंबईचा पहिला नंबर; पुणेकर कितव्या स्थानी?
एअर इंडिया संकटात, सुरक्षा प्रमाणपत्राशिवाय विमानाचं उड्डाण करण भोवलं, DGCA नं ठोठावला 1 कोटींचा दंड
एअर इंडिया संकटात, सुरक्षा प्रमाणपत्राशिवाय विमानाचं उड्डाण करण भोवलं, DGCA नं ठोठावला 1 कोटींचा दंड
डंपरच्या धडकेत भाजीपाला घेऊन जाणाऱ्या वृद्धाचा मृत्यू, मोबाईलवर बोलत होता चालक, जमावाकडून तोडफोड
डंपरच्या धडकेत भाजीपाला घेऊन जाणाऱ्या वृद्धाचा मृत्यू, मोबाईलवर बोलत होता चालक, जमावाकडून तोडफोड
तीन दिवसांपासून बेपत्ता अन् वर्गमित्राच्या खोलीत MBA विद्यार्थीनीचा निर्वस्त्र मृतदेह सापडला; कॉलेजच्या ग्रुपमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल
तीन दिवसांपासून बेपत्ता अन् वर्गमित्राच्या खोलीत MBA विद्यार्थीनीचा निर्वस्त्र मृतदेह सापडला; कॉलेजच्या ग्रुपमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल

व्हिडीओ

Amol Mitkari On Ajit Pawar 'व्हॅलेंटाईन डे'च्या निमित्ताने अजित पवारांना अमोल मिटकरांचं भावनिक पत्र
Sunil Tatkare PC : विलिनीकरणासंदर्भात प्रस्ताव आल्यावर पक्षांतर्गत चर्चा करु, तटकरेंची भूमिका
NCP Merger : विलिनीकरणाचा फायदा, तोटा कुणाला? राष्ट्रवादींची गणितं कधी सुटणार?
Sanjay Raut PC : ज्यांनी शेण खाल्ले त्यांना जाब विचारला जाईल,चंद्रपूर महापौर प्रकरणावर राऊतांचा संताप
Shashikant Shinde NCP Merger :दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणानंतर अजितदादांकडेच नेतृत्व देणार होतो

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भारतातील टॉप 10 सर्वात श्रीमंत शहरे, मुंबईचा पहिला नंबर; पुणेकर कितव्या स्थानी?
भारतातील टॉप 10 सर्वात श्रीमंत शहरे, मुंबईचा पहिला नंबर; पुणेकर कितव्या स्थानी?
एअर इंडिया संकटात, सुरक्षा प्रमाणपत्राशिवाय विमानाचं उड्डाण करण भोवलं, DGCA नं ठोठावला 1 कोटींचा दंड
एअर इंडिया संकटात, सुरक्षा प्रमाणपत्राशिवाय विमानाचं उड्डाण करण भोवलं, DGCA नं ठोठावला 1 कोटींचा दंड
डंपरच्या धडकेत भाजीपाला घेऊन जाणाऱ्या वृद्धाचा मृत्यू, मोबाईलवर बोलत होता चालक, जमावाकडून तोडफोड
डंपरच्या धडकेत भाजीपाला घेऊन जाणाऱ्या वृद्धाचा मृत्यू, मोबाईलवर बोलत होता चालक, जमावाकडून तोडफोड
तीन दिवसांपासून बेपत्ता अन् वर्गमित्राच्या खोलीत MBA विद्यार्थीनीचा निर्वस्त्र मृतदेह सापडला; कॉलेजच्या ग्रुपमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल
तीन दिवसांपासून बेपत्ता अन् वर्गमित्राच्या खोलीत MBA विद्यार्थीनीचा निर्वस्त्र मृतदेह सापडला; कॉलेजच्या ग्रुपमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल
IND vs PAK : पाकिस्तान विरुद्ध अर्शदीप सिंगला खेळवू नका, नामिबियाच्या फलंदाजांनी धुलाई केल्यानं सुनील गावस्कर नाराज,  'या' खेळाडूचं नाव सूचवलं 
पाकिस्तान विरुद्ध अर्शदीप सिंगला खेळवू नका, सुनील गावस्कर यांचा सूर्यकुमार यादवला सल्ला, कोणाचं नाव सूचवलं?
मोठी बातमी! रोहित पवारांची मागणी, केंद्रीयमंत्र्यांनी लावली AAIB चौकशी, अजित पवारांच्या विमान अपघाताचे पत्ते उलगडणार
मोठी बातमी! रोहित पवारांची मागणी, केंद्रीयमंत्र्यांनी लावली AAIB चौकशी, अजित पवारांच्या विमान अपघाताचे पत्ते उलगडणार
मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांची 15 दिवसात निवड; सुनेत्रा पवारांच्या नावावरच शिक्कामोर्तब होणार?
मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांची 15 दिवसात निवड; सुनेत्रा पवारांच्या नावावरच शिक्कामोर्तब होणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 फेब्रुवारी 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 फेब्रुवारी 2026 | शुक्रवार
Embed widget