(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Eknath Khadse : एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका, मुख्यमंत्र्यांकडून तातडीने एअर अॅम्बुलन्सची व्यवस्था
Ekanth Khadse : राष्ट्रवादीचे काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. त्यांच्यावर सध्या जळगावमध्ये उपचार सुरू आहेत.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे वृत्त आहे. एकनाथ खडसे यांच्या उपचारासाठी तातडीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी एअर अॅम्बुलन्सची व्यवस्था केली आहे. एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी मुख्यमंत्र्यांसोबत संपर्क साधला होता.त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तातडीने एअर अॅम्बुलन्सची व्यवस्था केली. खडसे यांना उपचारासाठी जळगावहून मुंबईला दाखल करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या साताऱ्यातील त्यांच्या दरे या गावी आहेत. खडसे यांच्या प्रकृतीबाबतची माहिती समजताच त्यांनी तातडीने एअर अॅम्बुलन्सची व्यवस्था केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती समोर येत आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याबाबत फोन येताच त्यांनी एकनाथ खडसे यांच्यासाठी एअर एम्ब्युलन्सची व्यवस्था करण्याचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या साताऱ्यातील त्यांच्या गावी आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या गावी शेतात फेरफटका मारत असतानाच त्यांना एकनाथ खडसे यांच्या प्रकृतीबाबत माहिती समजली. फोन येताच मुख्यमंत्री शिंदे यांनी तात्काळ एअर एम्ब्युलन्सची व्यवस्था करण्याबाबत आदेश दिले. दरम्यान, एकनाथ खडसे यांच्यावर जळगावच्या गजानन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. आज संध्याकाळी 7.30 वाजता खडसेंना पुढील उपचारासाठी जळगावहून मुंबईसाठी उड्डाण करणार आहेत.
खडसे यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी काय सांगितले?
जळगाव येथे एकनाथ खडसे यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर विवेक चौधरी यांनी सांगितले की, एकनाथ खडसे यांना दोन दिवसांपासून अस्वस्थ वाटत होते. छातीत दुखणे आणि खोकला सुरू होता. त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. मधुमेह आणि इतर जुने आजार आहेत. सध्या त्यांच्यावर प्राथमिक उपचार सुरू आहेत. संध्याकाळी पुढील उपचारासाठी त्यांना मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.