एक्स्प्लोर

Jitendra Awhad : शरद पवारांवरील वक्तव्याप्रकरणी वळसे पाटील ठाम; जितेंद्र आव्हाडांचे आव्हान, म्हणाले....

Jitendra Awhad On Dilip Walse Patil : वळसे पाटलांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असताना शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीदेखील प्रतिआव्हान दिले आहे.

मुंबई शरद पवार (Sharad Pawar) हे महाराष्ट्राचे उत्तुंग नेते असले तरी त्यांना एकहाती सत्ता आणता आली नसल्याचे वक्तव्य दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी केले. आपल्या वक्तव्यावर वळसे पाटील ठाम राहिले. इतकंच नाही तर अजित पवार गटानेदेखील वळसे पाटील यांची पाठराखण केली. वळसे पाटलांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असताना शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीदेखील प्रतिआव्हान दिले आहे. शरद पवार यांच्यावर टीका करण्याआधी स्वत:चा नवीन पक्ष स्थापन करावा आणि स्वबळावर दोन राज्यात सत्ता स्थापन करावा असे आव्हान आव्हाड यांनी दिले. 

जितेंद्र आव्हाड यांनी आज पत्रकार परिषद घेत, अजित पवार गटावर आणि दिलीप वळसे पाटील गटावर हल्लाबोल केला. जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले की, शरद पवार यांचा इतिहास पाहणं गरजेचं आहे. पवार यांनी 40 व्या वर्षी इंदिरा गांधी यांच्या विरोधात संघर्ष केला आणि त्यांनी 60 आमदार निवडून आणले. वयाच्या 40 व्या वर्षी इंदिरा गांधी यांच्या विरोधात संघर्ष केला. याचे साक्षीदार स्वतः दिलीप वळसे पाटील आहेत. कायम ते सत्तेत सहभागी झालेले आहेत. दिलीप वळसे पाटील असं म्हणाले की आपण शरद पवारांना मोठा नेता म्हणतो... म्हणतो याचाच अर्थ ते मोठे नाहीत असं म्हणतात. तुम्ही तुमचा शेजारच्या तालुक्यातील बेनके शेट यांना किती त्रास दिला हे जगजाहीर आहे. आम्ही कडक भूमिका घेऊ शकतो कारण आमचे मतदारसंघ स्वतः बांधले आहेत. माझ्याकडे तुमच्या सारखे कारखाने, बँक नाही. तुम्ही काल माफी मागितली आणि आज पुन्हा मतावर ठाम आहे असं म्हणता, असे आव्हाड यांनी म्हटले.

तुम्ही एवढं शरद पवारांवर बोलतं असाल तर एवढं बोलण्याआधी राजीनामा तरी द्यायचा. शिवाजी महाराज यांनी तोरणा घेतला तेव्हासोबत काही मोजके सरदार होते आणि तुमच्या सारखे सरदार तलवार म्यान करुन बसले होते. असा टोला आव्हाड यांनी लगावला.

शरद पवार यांनी बनवलेला पक्ष चोरून न्यायचा प्रयत्न का करताय, असा प्रश्न उपस्थित करत आता स्वत: चा पक्ष तयार करा आणि दोनदा राज्यांत निवडून आणा, असे आव्हान आव्हाड यांनी दिले.  दिलीप वळसे पाटील तुमच्याकडून ही अपेक्षा नाही. तुम्ही पक्षातून जात आहात हे सांगायला गेला होतात. त्यावेळी त्यांच्या पोटात काय कलवा कालव झाली हे मी त्यांच्या तोंडातून ऐकलं आहे असेही आव्हाड यांनी म्हटले. 

वळसे पाटील यांनी काय स्पष्टीकरण दिले?

मी शरद पवारांविषयी असे उद्गार काढलेले नाहीत. माझं म्हणणं असं होतं की गेली ४० ते ५० वर्षे शरद पवारांनी या राज्यासाठी, देशासाठी काम केलं आहे. देशात अनेक प्रादेशिक पक्ष आहेत. त्यातले अनेक पक्ष स्वतःच्या हिंमतीवर बहुमत मिळवून सत्तेवर बसले आहेत. मात्र महाराष्ट्रातल्या जनतेने अशी शक्ती शरद पवार यांच्या मागे उभी केली नाही याची मला खंत आहे. मी खंत व्यक्त करत होतो, त्यात शरद पवारांना कमी लेखण्याचा किंना काही चुकीचं बोलण्याचा प्रश्न उद्भवत नाही, असे दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले. 

अजित पवार गटाकडून समर्थन 

शरद पवारांच्या राजकीय सामर्थ्याबाबत प्रश्न उपस्थित केल्यानंतर दिलीप वळसे पाटील यांच्यावर टीकेची झोड उठू लागली. मात्र, अजित पवार गटाने आपल्या नेत्याच्या वक्तव्याचे समर्थन केले. दिलीप वळसे पाटील यांनी गैरसमजाबद्दल दिलगिरी व्यक्त केली. विधानाबद्दल नाही. विधानावर ते ठाम आहेत. शरद पवार यांना महाराष्ट्रात एकमुखाने पाठिंबा मिळून आजपर्यंत बहुमताने सत्ता स्थापन करता आलेली नाही. त्यामागच्या कारणांची चर्चा आजही अनुत्तरीत असल्याचे ट्वीट अजित पवार गटांकडून करण्यात आले आहे. त्याशिवाय, बंडापूर्वी राष्ट्रवादीच्या एका कार्यक्रमात अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्याची क्लिपही ट्वीट करण्यात आली आहे. 

इतर संबंधित बातमी :

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime News: शाळा सुटताच मुलीला दुचाकीवर बसवले, निर्जनस्थळी नेऊन हात-पाय बांधून नको नको ते केले; मुंबईच्या माहिममधील हादरवणारी घटना, पीडितेसह आरोपीही अल्पवयीन
शाळा सुटताच मुलीला दुचाकीवर बसवले, निर्जनस्थळी नेऊन हात-पाय बांधून नको नको ते केले; मुंबईच्या माहिममधील हादरवणारी घटना, पीडितेसह आरोपीही अल्पवयीन
Maharashtra Live News Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर
Maharashtra Live News Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर
Mumbai High Court On FDA: तुम्ही डास मारण्यासाठी तलवारीचा वापर करताय; मुंबई उच्च न्यायालयाच्या FDAला कानपिचक्या, पुन्हा काय घडलं?
तुम्ही डास मारण्यासाठी तलवारीचा वापर करताय; मुंबई उच्च न्यायालयाच्या FDAला कानपिचक्या, पुन्हा काय घडलं?
Maratha Reservation: अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mecca Defence Pact: पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?
पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?
Maratha Reservation: अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
Mumbai High Court On FDA: तुम्ही डास मारण्यासाठी तलवारीचा वापर करताय; मुंबई उच्च न्यायालयाच्या FDAला कानपिचक्या, पुन्हा काय घडलं?
तुम्ही डास मारण्यासाठी तलवारीचा वापर करताय; मुंबई उच्च न्यायालयाच्या FDAला कानपिचक्या, पुन्हा काय घडलं?
Thailand Crime: नववीच्या विद्यार्थ्याचे भयंकर कृत्य, आधी घरात आजी-आजोबा, नंतर शाळेत अंदाधुंद गोळीबार; 8 जणांचा दुर्दैवी अंत, 15 जखमी
नववीच्या विद्यार्थ्याचे भयंकर कृत्य, आधी घरात आजी-आजोबा, नंतर शाळेत अंदाधुंद गोळीबार; 8 जणांचा दुर्दैवी अंत, 15 जखमी
Ramandeep Singh Married to Charlie Chauhan : भारतीय क्रिकेटरने गुपचूप केलं लग्न, 7 वर्षांनी मोठ्या अभिनेत्रीशी बांधली लग्नगाठ; अर्शदीप सिंगने शेअर केला फोटो, कोण आहे 'ती'?
भारतीय क्रिकेटरने गुपचूप केलं लग्न, 7 वर्षांनी मोठ्या अभिनेत्रीशी बांधली लग्नगाठ; अर्शदीप सिंगने शेअर केला फोटो, कोण आहे 'ती'?
Prashant Kishor On Sunil Tatkare Sunetra Pawar NCP Politics: प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला दिल्याच्या चर्चेनं राष्ट्रवादीत खळबळ; सुनेत्रा पवारांसोबतच्या बैठकीत काय काय घडलं?
प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला दिल्याच्या चर्चेनं राष्ट्रवादीत खळबळ; सुनेत्रा पवारांसोबतच्या बैठकीत काय काय घडलं?
Rishabh Pant News : 3 वर्षांपासून इकडेतिकडे भटकतोय... ऋषभ पंत भावूक, मध्यरात्री 1 वाजता मुख्यमंत्र्यांना मागितली मदत, नेमकं प्रकरण काय?
3 वर्षांपासून इकडेतिकडे भटकतोय... ऋषभ पंत भावूक, मध्यरात्री 1 वाजता मुख्यमंत्र्यांना मागितली मदत, नेमकं प्रकरण काय?
सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर तैनात पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू; नेमकं घडलं काय?
सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर तैनात पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू; नेमकं घडलं काय?
Embed widget