एक्स्प्लोर

भाजपचं खरंच कौतुक, त्यांच्या पक्षातील नेते सोडून त्यांनी आमच्या पक्षातील लोकांना संधी दिली; जयंत पाटलांचा टोला

मंत्रिमंडळ विस्तारात बऱ्याच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची पदं काढून घेतली गेली आहे आहेत.  कदाचित त्यांचा उपयोग पूर्ण झाला असेल, त्यामुळे त्यांना बाजूला केलं आहे, असं जयंत पाटलांनी म्हटलं.

मुंबई : भारतीय जनता पक्षाचं कौतुक आहे. त्यांना त्यांच्या पक्षातील कार्यकर्ते दिसत नाहीत. त्यामुळेच त्यांनी आमच्या पक्षातून गेलेल्यांना संधी दिली. याचा अर्थ भाजप पक्ष मूळचा किती कमकुवत आहे हे सिद्ध होतं, अशा शब्दात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा समाचार घेतला. राष्ट्रवादी कार्यालयात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना जयंत पाटील बोलत होते. 

याबाबत अधिक बोलताना जयंत पाटील म्हणाले की, विरोधकांना नामोहरम करण्यासाठी दिल्लीतील सरकार सगळ्या मार्गांचा अवलंब करत आहे. झोटींग समितीने अहवाल दिला आहे की, एकनाथ खडसे यांनी कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार केलेला नाही. तरीदेखील ही कारवाई सुरू आहे. तरीदेखील खोटेनाटे आरोप करून खडसे यांच्या जावयाला अडकवण्याचा प्रकार सुरू आहे. खडसेंची तब्येत ठीक नाही परंतु प्रकृती अस्वस्थेचं कारण देऊन चौकशीला येणं एकनाथ खडसेंनी टाळलं अशी चर्चा होऊ नये म्ह्णून आजारी असताना सुद्धा ते ईडीच्या चौकशीसाठी गेले आहेत. सकाळपासून आत्तापर्यंत चौकशी चालू आहे. एका जेष्ठ नेत्याला असं वागवन अतिशय चुकीचं आहे, असं जयंत पाटील यांनी म्हटलं. 

मागे यांनी दीड दोन वर्षे छगन भुजबळ यांना देखील जेलमध्ये टाकलं होतं. माझी भारतीय जनता पक्षाच्या म्होरक्यांना विनंती आहे की सुडाचं राजकारण करू नका. गुन्हा झाला असेल तर कोर्टात जा, कोर्टानं सांगितलं तर शिक्षा ही व्हायलाच हवी. दरम्यान नारायण राणे यांना मंत्रिमंडळ विस्तारात संधी मिळाली या प्रश्नाला उत्तर देताना जयंत पाटील म्हणाले की, नारायण राणेंकडे मायक्रो कंपनीची जबाबदारी दिली आहे. आम्ही अवजड उद्योग समजत होतो. परंतु हा नवीन विभाग त्यांना दिला आहे. त्यामुळे मायक्रो उद्योग विभागातून ते कसा न्याय देतील हे पाहायचं आहे. मंत्रिमंडळ विस्तारात बऱ्याच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची पदं काढून घेतली गेली आहे आहेत.  कदाचित त्यांचा उपयोग पूर्ण झाला असेल. त्यामुळे त्यांना बाजूला केलं आहे. नुकतेच  लोकल सुरू करण्याबाबत रावसाहेब दानवे जरी बोलले असले तरी कोविड कमी झाला की लोकल सुरू होईल, असं जयंत पाटील यांनी म्हटलं. 
  
विरोधकांनी लक्षात ठेवावं आमच्याकडे देखील सक्षम यंत्रणा आहे, संजय राऊत यांनी दिलेल्या इशाऱ्याबाबत बोलताना जयंत पाटील म्हणाले की, आम्ही टीट फॉर टॅट या म्हणी प्रमाणे वागणार नाही. परंतु जर कोणी सापडलं तर कारवाई नक्की होईल. मात्र हे नक्की आहे की भाजपचं अति होत आहे. काही वर्षांपूर्वी जनता दलाचं सरकार होतं. त्यावेळी त्यांनी इंदिराजींना अटक केली होती. परंतु लोक ही बाब पाहत होते. नंतरच्या निवडणुकीत मात्र लोकांनी इंदिरा गांधींना निवडून दिलं. सुडाचं राजकारण यांनी सध्या सुरू केलं आहे. सरकार पाडण्यासाठी यांचे पूर्ण प्रयत्न सुरू आहेत. मात्र लोक हुशार असतात. सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून लोकं निर्णय घेतात. लोकं त्यांना नक्कीच नाकारतील. 

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा
मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिलवकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिलवकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
Ladki Bahin Yojana: 'लाडक्या बहिणीं'ची संख्या 92 लाखांनी घटली, बेकायदेशीर लाभाच्या वसुलीचे काम रखडले; RTI मधून खुलासा
'लाडक्या बहिणीं'ची संख्या 92 लाखांनी घटली, बेकायदेशीर लाभाच्या वसुलीचे काम रखडले; RTI मधून खुलासा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिलवकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिलवकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
Embed widget