एक्स्प्लोर

Eknath Khadse : लव्ह जिहाद आणि हिंदुत्ववादाच्या मुद्दावरुन मते मिळवण्यासाठी काही पक्षांचे प्रयत्न; खडसे यांचे टीकास्त्र

Eknath khadse : काही विशिष्ट पक्ष किंवा गट निवडणुका जवळ आल्या की हिंदुत्व, लव्ह जिहाद असे काहीतरी मुद्दे काढतात अशी टीका राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजप आणि शिंदे गटावर केली आहे.

ठाणे : लव्ह जिहादबद्दल (love jihad) राज्यात किंवा देशात जनाक्रोश मोर्चा काढला जातोय. लव्ह जिहादला विरोध हा समाजात असला पाहिजे. परंतु काही विशिष्ट पक्ष किंवा गट निवडणुका जवळ आल्या की असं काहीतरी करतात. हिंदुत्ववादाच्या माध्यमातून मतदान होण्याच्या दृष्टीने राजकीय पक्षाचे हे प्रयत्न असू शकतात असा टोला राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी भाजप आणि शिंदे गटाला लगावला आहे. ते कल्याण शहरात एका सामाजिक संघटनेच्या कार्यक्रमाला आज आले होते. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना भाजपसह शिंदे गटावर टीका केली.  

एकनाथ खडसे यांनी यावेळी सी व्होटर सर्व्हेवरूनही भाजप आणि शिंदे गटावर हल्लाबोल केला. "महाविकास आघाडीला लोकसभेत चांगल्या जागा म्हणजे चाळीत ते चौवेचाळीस जागा मिळतील असं समोर आलंय. राज्यात ती सद्यपरिस्थिती आहे. त्यावर आधिरीत असा हा सर्व्हे आहे. सध्याचं राज्य सरकार अस्थिर असून सुप्रीम कोर्टाचा काय निर्णय येतो? त्यावर सरकार अवलंबून आहे. हे सरकार  केवळ नाममात्र असून  त्यांच्यात समन्वय नाही. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार उत्तम काम करत असताना केवळ सत्तेच्या लालसेसाठी पक्ष  फोडणे सर्वांना  एकत्र  करणं हा खटाटोप करण्यात आला, अशी टीका खडसे यांनी केली.  

राज्यावर 6 लाख 66 हजार कोटी रुपयांचं कर्ज 

एकनाथ खडसे म्हणाले, "राज्यात सध्या बेरोजगारी आणि महागाई असून उद्योग राज्याबाहेर चालले आहेत. कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. राज्यावर 6 लाख 66 हजार कोटी रुपयांचं कर्ज आहे. सामान्य माणसाला याचा काही लाभ होत नाही म्हणून या सर्व्हेच्या माध्यमातून लोक या सरकारला मदत करणार नाही असंच दिसून येतंय. उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या युतीमध्ये सामील होणार की नाही? याबाबत बोलताना एकनाथ खडसे म्हणाले, या युतीबाबतचा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेसपर्यंत आला नाही किंवा तस बोलणंही झालं नाही असं शरद पवार यांनी स्पष्ट केलंय. तसा प्रस्ताव आला तर वरिष्ठ योग्य तो निर्णय घेतील.

पेच असल्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार नाही

सरकार  स्थापन होऊन 7 महिन्याचा कालावधी झाला. मात्र अद्याप मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकलेला नाही. 18 मंत्री कारभार या राज्याचा पाहताहेत योग्य ते निर्यण घेऊ शकत नाहीत. जनसंपर्क कमी पडत आहे, शिंदे गटाचे सर्व आमदार मंत्रिमंडळात येण्यास इच्छुक आहेत. कोणाला घ्यावे हा पेच असल्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार होत नाही. एकदा विस्तार होऊ द्या, यातील असंतोष आपोआप उफाळून येईल, मला का डावललं या असंतोषाला तोंड देणे कठीण होईल. त्यामुळेच मंत्रिमंडळाचा विस्तार लंबल्याची टीका यावेळी एकनाथ खडसे यांनी केली.  

"डॉक्युमेंटरीमध्ये माझ्या वडिलांचं नाव वापरू नका हा उद्धव ठाकरे यांचे स्वत:चे मत आहे. वस्तुस्थिती आहे ते बाळासाहेबांचे चिरंजीव आहेत. डॉक्युमेंटरीमध्ये बाळासाहेबांचे नाव वापरू नये हे त्यांचं व्यक्तिगत मत आहे. त्यांच्या व्यक्तिगत मतावर मी प्रतिक्रिया व्यक्त करणार नाही, असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe FDA : तुकाराम मुंढेंचा औषध कंपन्यांवर हातोडा! 'या' 10 आयुर्वेदिक कंपन्यांचा परवाना कायमस्वरुपी रद्द
तुकाराम मुंढेंचा औषध कंपन्यांवर हातोडा! 'या' 10 आयुर्वेदिक कंपन्यांचा परवाना कायमस्वरुपी रद्द
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही, कोणाचंही प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, जरांगे पाटलांच्या टिकेनंतर मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही, कोणाचंही प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, जरांगे पाटलांच्या टिकेनंतर मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget