एक्स्प्लोर
सरकारने लोकशाहीची थट्टा लावलीय : अजित पवार
अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलायचे असतानाही सरकारने अंतिम आठवडा प्रस्ताव घेतलाच नाही याबाबतही तीव्र नाराजी अजित पवार यांनी व्यक्त केली.

मुंबई : राज्यातील भीषण दुष्काळावर सभागृहामध्ये बोलायचे होते मात्र त्यावर बोलू दिले नाही.या सरकारने लोकशाहीची अक्षरश: थट्टा लावली आहे अशा शब्दात विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलायचे असतानाही सरकारने अंतिम आठवडा प्रस्ताव घेतलाच नाही याबाबतही तीव्र नाराजी अजित पवार यांनी व्यक्त केली. दुष्काळ प्रश्नावर सरकारने योग्य असे उत्तर दिले नाही.सरकारने दुष्काळग्रस्त भागांसाठी अक्षरश: भोपळा दिला आहे. आम्ही सभागृहामध्ये फळबागांसाठी १ लाख रुपये आणि इतर पिकांसाठी 50 हजार रुपये हेक्टरी मागत असताना मुख्यमंत्री मात्र नेहमीसारखा मागचा पाढा वाचत होते अशी जोरदार टिकाही पवार यांनी मुख्यमंत्र्यांवर केली. आरक्षणाबाबत आम्ही सामंजस्याची भूमिका घेतली होती. सभागृहात मदत करायची ही आमची भूमिका होती. परंतु मुख्यमंत्री म्हणतात आरक्षण दिले तर जल्लोष करा. पण या आरक्षणासाठी अनेक लोकांचा जीव गेला,अनेकांनी आपल्या जवळच्या माणसांना गमावले त्याचं सोयरसुतक या सरकारला नाही असा गंभीर आरोप करतानाच आरक्षणाचे विधेयक मंजुर झाल्यावर सरकारमधील मंत्री मात्र फेटे घालून जल्लोष करत होते याबाबत पवार यांनी संताप व्यक्त केला.
Before You Go
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र






















