SBI: स्टेट बँक ऑफ इंडियाचा ग्राहकांना धक्का, रेपो रेट वाढताच व्याज दर वाढवले, EMI महागणार, काय बदल झाले? जाणून घ्या
SBI : स्टेट बँक ऑफ इंडियानं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं रेपो रेटमध्ये वाढ केल्यानंतर व्याज दरांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळं ग्राहकांना EMI वर अधिक खर्च करावा लागणार आहे.

नवी दिल्ली: अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्षावर तोडगा निघालेला नाही. क्रूड ऑईलचे दर वाढल्यानं अखेर अमेरिकेनं रशियाकडून डिझेल खरेदीचा निर्णय घेतला आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्षामुळं जागतिक बाजारात अस्थिरतेचं वातावरण आहे. क्रूड ऑईलचे दर वाढल्यानं चा परिणाम होऊन महागाई देखील वाढली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर रेपो रेटमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला. आरबीआयनं रेपो रेटमध्ये 0.25 बेसिस पॉईंटमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला. यामुळं रेपो रेट 5.50 टक्क्यांवर पोहोचला आहे. आरबीआयच्या रेपो रेटच्या दरांमधील वाढीच्या निर्णयानंतर स्टेट बँक ऑफ इंडियानं देखील व्याज दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळं ग्राहकांना मोठा धक्का बसणार आहे.स्टेट बँक ऑफ इंडियानं काही कर्जांच्या व्याज दरात वाढ केली आहे. एसबीआयनं व्याज दरांमध्ये केलेल्या बदलांमुळं अधिक ईएमआय भरावे लागू शकतात.
RLLR मध्ये वाढ
रेपो लिंक्ड लेंडिंग रेट (RLLR) 7.50 टक्क्यांवरुन वाढवून 7.75 टक्के केला आहे. म्हणजेच एसबीआयनं रेपो लिंक्ड लेंडिंग रेटमध्ये 0.25 टक्क्यांची वाढ केली आहे. याचा परिणाम CRP वर देखील होईल. व्याज दरात वाढ झाल्यानं कर्जदारांच्या ईएमआयमध्ये वाढ होऊ शकते.
MCLR मध्ये वाढ
महत्त्वाची बाब म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियानं MCLR मध्ये वाढ केली आहे. एका वर्षाच्या MCLR च्या दर 8.70 टक्क्यांवरुन वाढवून 8.85 टक्के करण्यात आला आहे. तीन महिन्याचा व्याज दर 8.25 टक्क्यांवरुन वाढून 8.40 टक्के करण्यात आला आहे. याशिवाय सहा महिन्यांच्या MCLR चा दर 8.75 टक्के करण्यात आला आहे. तर, तीन वर्षांच्या कालावधीचा दर 8.95 टक्के झाला आहे. महत्त्वाचं म्हणजे एक महिना किंवा ओवरनाईट MCLR चा दर 7.85 टक्के आहे.
EBLR मध्ये किती वाढ?
SBI नं एक्सटर्नल बेंचमार्क लिंक्ड लेंडिंग रेट (EBLR) 7.90 टक्क्यांवरुन वाढवून 8.15 टक्के केला आहे. यामध्ये 0.25 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. यामध्ये CRP आणि BSP चा समावेश असेल. म्हणजेच ज्यांचं कर्ज या व्याज दरांशी संबंधित असेल त्यांना पहिल्यापेक्षा अधिक रक्कम ईएमआय भरावा लागेल.
नवे दर कधीपासून लागू होणार?
स्टेट बँक ऑफ इंडियानं नव्या व्याज दरांची अंमलबजावणी 15 ऑक्टोबर 2026 पासून लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. एसबीआयनं नव्या व्याज दरांबाबत अधिकृत नोटिफिकेशन जारी केलं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे व्याज दर आजपासून लागू होतील. या निर्णयाचा परिणाम ईएमआयवर कधी पाहायला मिळणार हे तुमचं कर्ज कोणत्या बेंचमार्कचं आहे त्यावर ते अवलंबून असेल.
महत्त्वाच्या बातम्या























