Jalgaon Accident : काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
Jalgaon Jamner Road Accident : जळगाव जिल्ह्यातील जामनेर-बोदवड रस्त्यावरील मालदाभाडी गावाजवळ भरधाव ट्रकने दुचाकीला चिरडले. त्यामध्ये 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा जागीच मृत्यू झाला.

जळगाव : जळगाव जिल्ह्यातून काळीज पिळवटून टाकणारी आणि संपूर्ण परिसर सुन्न करणारी एक अत्यंत भीषण दुर्घटना समोर आली आहे. जामनेर ते बोदवड मार्गावरील मालदाभाडी गावाजवळ एका भरधाव ट्रकने दुचाकीला भीषण धडक दिली. या हृदयद्रावक अपघातात दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या एकाच कुटुंबातील सहा जणांचा दुर्दैवी अंत झाला आहे.
अपघाताचे वृत्त समजताच मालदाभाडी परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या दुर्घटनेमुळे संपूर्ण जळगाव जिल्ह्यावर शोककळा पसरली असून एकाच क्षणात पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
Jalgaon Jamner Road Accident : 3 महिन्यांची चिमुकली, 2 मुले अन् महिलेचा करुण अंत
या अपघाताचे स्वरूप इतके भीषण होते की, धडक बसल्यानंतर दुचाकीवरील सर्वजण रस्त्यावर फेकले गेले. मृतांमध्ये अवघ्या तीन महिन्यांच्या चिमुकल्या बाळासह दोन लहान मुले, दोन पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. एकाच कुटुंबातील सहा जणांचा अशा प्रकारे अचानक मृत्यू झाल्याने नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
Jalgaon Accident Police Investigation : अपघाताच्या कारणाचा तपास सुरू
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने अपघातस्थळी धाव घेतली आणि ग्रामस्थांच्या मदतीने मदतकार्य सुरू केले. अपघातातील सर्व मृतदेह रुग्णवाहिकेतून पुढील वैद्यकीय आणि कायदेशीर कार्यवाहीसाठी जामनेर येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहेत. मृतांची अधिकृत नावे शोधण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.
दरम्यान, हा अपघात नेमका कसा घडला? ट्रकचा वेग किती होता आणि अपघाताला नेमका कोणाचा निष्काळजीपणा कारणीभूत ठरला, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत.
वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन आणि भरधाव वेगामुळे अशा धोकादायक घटना घडत असल्याचे समोर येत असून, या दुर्दैवी घटनेने रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा एरणीवर आणला आहे.
ही बातमी वाचा:






















