NCP Crisis LIVE Updates : अजित पवारांचा जुना व्हिडीओ मनसेने बाहेर काढला, शिंदेंच्या बंडावेळी दादा काय म्हणाले? पाहा व्हिडीओ
NCP Breaking News : निवडणूक आयोगाने शरद पवार (Sharad Pawar) गटाला धक्का दिला असून पक्ष आणि चिन्हाचा निकाल अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या बाजूने दिला आहे.
LIVE
Background
Maharashtra Politics Live Updates : शरद पवारांना मोठा धक्का बसला आहे. निवडणूक आयोगाने जो न्याय शिवसेनेच्या शिंदे गटाला तोच न्याय आता राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला दिला आहे. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवारांचं असल्याचं निर्णय निवडणूक आयोगाने दिला आहे. राष्ट्रवादीचे चिन्ह आणि पक्षाचा निकाल हा अजित पवार गटाच्या बाजूने लागला असून हा शरद पवार गटाला मोठा धक्का असल्याचं मानलं जातंय. त्यामुळे येत्या निवडणुकीत शरद पवार गटाला वेगळ्या चिन्हावर आणि नावावर निवडणूक लढवावी लागेल हे स्पष्ट झालंय.
निवडणूक आयोगाच्या या निकालाने येणाऱ्या राज्यसभेच्या निवडणुकीत मात्र शरद पवार गटाचा कस लागणार असून त्यांना अजित पवार गटाच्या अनिल पाटलांचा व्हिप पाळावा लागेल असं चित्र दिसतंय.
MNS on Ajit Pawar : अजित पवारांचा जुना व्हिडीओ मनसेने बाहेर काढला, शिंदेंच्या बंडावेळी दादा काय म्हणाले? पाहा व्हिडीओ
MNS on NCP Crisis LIVE Updates : अजित पवारांचा जुना व्हिडीओ मनसेने बाहेर काढला, शिंदेंना शिवसेना मिळाली तेव्हा अजित पवार काय म्हणाले होते? पाहा व्हिडीओ
'भुजां'मध्ये कितीही 'बळ' आहे असं म्हटलं तरी नीतिमत्तेचे 'तट' फोडून सत्तेसाठी घातलेला हा 'वळसा' महाराष्ट्राला 'पटेल' का?
— MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) February 7, 2024
वाह रे पट्ठ्या...! 🤨 pic.twitter.com/ZXcOk6y6oy
Rahul Narwekar : राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणात निवडणूक आयोगाच्या निकालाचा संबंध नाही
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रप्रकरणी (NCP MLA disqualification case) मेरिटनुसारच निकाल दिला जाईल. निवडणूक आयोगाने (Election Commission of India) दिलेल्या निकालाचा कुठलाही संबंध या निकालाशी जोडला जाणार नाही, असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी सांगितलं. राष्ट्रवादी पक्षाबाबत विधान भावनाकडून कोणतीही कागदपत्रे निवडणूक आयोगाकडून मागवण्यात आलेली नाहीत, असं राहुल नार्वेकर म्हणाले. निवडणूक आयोगाने 6 फेब्रुवारीला राष्ट्रवादी काँग्रेसचं (NCP) पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांना दिलं आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. अशा परिस्थितीत आता राष्ट्रवादीचे कोणते आमदार पात्र आणि अपात्र होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Maharashtra Political News : अजित पवारांचा जुना व्हिडीओ मनसेकडून ट्वीट
NCP Crisis LIVE Updates : मागील दोन वर्षांमध्ये महाराष्ट्राचं राजकारण (maharashtra politics) ढवळून निघालेय. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यानंतर अजित पवारांनीही (Ajit Pawar) बंड केले. पक्षावर आणि चिन्हावर दावा केला, ते त्यांना मिळालेही. मंगळवारी निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांनं दिलं. यावरुन मनसेनं (MNS) आपल्या खास शैलीत टीकास्त्र सोडलेय. अजित पवारांवर (Ajit Pawar Video) निशाणा साधलाय. दरम्यान, त्याआधी वर्षभरापूर्वी एकनाथ शिंदे यांना शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह मिळालं होतं. त्यावेळी विरोधीपक्षात असणाऱ्या अजित पवारांनी खणखणीत भाषण करत टीका केली होती. अजित पवारांच्या भाषणातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. तोच व्हिडीओ पोस्ट करत मनसेनं निशाणा साधलाय. वाचा सविस्तर...
Maharashtra NCP News Updates : राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांची तटस्थ भूमिका
Maharashtra NCP Crisis LIVE Updates : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांना मिळाल्यानंतर आता विविध राज्यातील प्रदेशाध्यक्ष यांनी तटस्थ भूमिका घेतल्याचं समोर आलं आहे. राष्ट्रवादीचे गुजरातचे प्रदेशाध्यक्ष जयंत पटेल आणि कर्नाटकचे प्रदेशाध्यक्ष आर हरी यांनी सध्या तरी कोणतीही भूमिका घेणार नसल्याची एबीपी माझाला माहिती दिली आहे. सध्या दोन्ही गटाच्या वतीने संपर्क करण्यात येत आहे, मात्र आम्ही भूमिका सध्या जाहीर करणार नसल्याची माहिती दोन्ही प्रदेशाध्यक्षांनी दिली आहे.
Sharad Pawar Party New Name and Symbol : शरद पवार गटाकडून नवे नाव, चिन्हासाठी चाचपणी सुरु
Sharad Pawar New Party Name and Symbol : राज्याच्या राजकारणातली मोठी बातमी समोर आली आहे. पक्षाचं चिन्ह आणि पक्ष अजित पवारांकडे सोपवल्यावर आता शरद पवार गटाकडून नव्या नावांचा विचार सुरू आहे. शरद पवार काँग्रेस, मी राष्ट्रवादी, शरद स्वाभिमानी पक्ष या नावांचा पर्याय सध्या चाचपून पाहिला जातोय. तर कपबशी, सूर्यफूल, चष्मा, उगवता सूर्य या चिन्हांचा विचार सुरू आहे.