एक्स्प्लोर
नगर SP ऑफिस तोडफोड : अटकेतील नगरसेवकाचा मृत्यू
कैलास गिरवले राष्ट्रवादीचे आमदार अरुण जगताप आणि आमदार संग्राम जगताप यांचे समर्थक, राष्ट्रवादीकडून मनपाचे स्वीकृत नगरसेवक होते. गिरवले हे कपिलेश्वर मंडळाचे संस्थापक अध्यक्ष होते. त्याचबरोबर अहमदनगर शहर फटाका असोसिएशनचे अध्यक्षही होते.
पुणे : अहमदनगरमधील राष्ट्रवादी काँग्रेसचा नगरसेवक कैलास गिरवले यांचा मृत्यू झाला. पुण्यातील ससून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. गिरवले हे अहमदनगर पोलीस अधीक्षक कार्यालय तोडफोड प्रकरणातील आरोपी होते. तसेच, ते संग्राम जगताप यांचे कट्टर समर्नथक मानले जात.
कैलास गिरवले यांना अहमदनगर पोलिस अधीक्षक कार्यालय तोडफोड प्रकरणात अटक करण्यात आली होती. काही दिवसांनंतर त्यांची तब्येत खालावली आणि त्यांना श्वसनाचा त्रास होऊ लागला. त्यामुळे आधी अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तिथल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर त्यांना पुण्यातील ससून रुग्णालयात हलवण्यात आले होते.
कैलास गिरवलेच्या मृत्यूनंतर बाबासाहेब गिरवले यांनी पुण्यातील बंडगार्डन पोलिस स्टेशनमध्ये अहमदनगर पोलिसांच्या विरोधात तक्रार दिली आहे. कैलास गिरवलेंच्या मृत्यूला अहमदनगर पोलिस कारणीभूत असून, त्यांना पोलिसांनी कोठडीत मारहाण केली, असा आरोप बाबासाहेब गिरवले यांनी केला आहे.
कैलास गिरवले कोण होते?
कैलास गिरवले राष्ट्रवादीचे आमदार अरुण जगताप आणि आमदार संग्राम जगताप यांचे समर्थक, राष्ट्रवादीकडून मनपाचे स्वीकृत नगरसेवक होते. गिरवले हे कपिलेश्वर मंडळाचे संस्थापक अध्यक्ष होते. त्याचबरोबर अहमदनगर शहर फटाका असोसिएशनचे अध्यक्षही होते.
काय आहे प्रकरण?
बिहारलाही लाजवेल असा प्रकार अहमदनगरमधल्या पोटनिवडणुकीदरम्यान घडला. राजकीय वैमनस्यातून दोन शिवसैनिकांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. शिवसेनेचे उपशहर प्रमुख संजय कोतकर आणि कार्यकर्ते वसंत ठुबे शनिवारी सुवर्णनगर परिसरात एकत्र होते. यावेळी त्यांच्यावर गोळीबार करुन गुप्तीनेही वार करण्यात आले.
या प्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्यासह चौघांना अटक करण्यात आली आहे. शनिवारी 7 एप्रिलला हे हत्याकांड झालं.
एसपी कार्यालयातील तोडफोड प्रकरणी गुन्हे
भाजप आमदार शिवाजी कर्डिले, राष्ट्रवादीचे माजी आमदार दादाभाऊ कळमकर, राष्ट्रवादीचे माजी महापौर अभिजीत कळमकर, आमदार संग्राम जगताप यांचे भाऊ, झेडपी सदस्य सचिन जगताप, नगरसेवक कैलास गिरवले यांच्यासह चार नगरसेवक आणि अडीचशे ते तीनशे कार्यकर्त्यांवर एसपी कार्यालयात तोडफोड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यातील अनेकांना अटक करण्यात आली होती.
संबंधित बातम्या :
अहमदनगर हत्याकांड : 600 शिवसैनिकांवर गुन्हे
UPSC ते शिवसैनिकांच्या हत्येचा आरोपी - संदीप गुंजाळ
शिवसैनिकांची हत्या : राष्ट्रवादीच्या बदनामीचं षडयंत्र : अजित पवार
शिवसैनिकांची हत्या: भाजप आमदार शिवाजी कर्डिले अटकेत
नगरमध्ये तणाव, पालकमंत्री राम शिंदे थीम पार्कच्या उद्घाटनाला
शिवसैनिकांची दुहेरी हत्या, आमदार संग्राम जगतापांना पोलिस कोठडी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement