एक्स्प्लोर

Maharashtra: देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि शरद पवार भेटणार, डिनर डिप्लोमसीमध्ये महाचर्चा?

MCA Election : राज्यातील सत्तांतरानंतर तिन्ही नेते पहिल्यांदाच एकत्र येणार आहेत. निवडणुकीच्या रिंगणातील कट्टर राजकीय विरोधक एकाच व्यासपीठावर येणार असल्यामुळे चर्चेला उधाण आले आहे.

Mumbai Cricket Association Election : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ( NCP Sharad Pawar)  आज संध्याकाळी (बुधवार, 19 ऑक्टोबर) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यांची भेट घेणार आहेत. वानखेडे स्टेडिअमवर या नेत्यांची भेट होणार आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनची (Mumbai Cricket Association Election) त्रैवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या नेत्यांची भेट होणार आहे. राज्यातील सत्तांतरानंतर तिन्ही नेते पहिल्यांदाच एकत्र येणार आहेत. निवडणुकीच्या रिंगणातील कट्टर राजकीय विरोधक एकाच व्यासपीठावर येणार असल्यामुळे चर्चेला उधाण आले आहे. तिन्ही नेते एकाच ठिकाणी येणार असल्यामुळे या डिनर डिल्पोमसीला महत्व प्राप्त झाले आहे.

20 ऑक्टोबरला एमसीएची निवडणूक (Mumbai Cricket Association Election) पार पडणार आहे. शरद पवार आणि शेलार पॅनलचे अमोल काळे विरुद्ध माजी कसोटीवीर संदिप पाटील यांच्यात थेट लढत आहे. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड, शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर आणि शिवसेना वाहतूक संघटनेचे निलेश भोसले हेही पवार-शेलार पॅनेलकडून कार्यकारिणीसाठी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. 

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी वानखेडे मैदानावर प्रितीभोजनचं आयोजन केलं आहे. याला शरद पवार उपस्थित राहणार असल्यामुळे याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. पण ही राजकीय भेट नसल्याचं दोन्ही गटाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे नेते क्रिकेटसाठी एकत्र येत आहेत. यामध्ये कोणताही राजकीय चर्चा होणार नाही, असे सांगितलं जात आहे. भाजपमधील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार अन्य राजकीय नेते आणि स्पर्धकांसोबत नावखेडे स्टेडिअमच्या गरवारे क्लबमध्ये जेवणाचा अस्वाद घेणार आहेत. 

शरद पवार, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये होणारी भेट एमसीए निवडणुकीच्या संदर्भात आहे. ही भेट फक्त एमसीएच्या निवडणुकीच्या चर्चेसाठी आहे. यामध्ये कोणताही राजकीय चर्चा होण्याची शक्यात नाही, असे भाजपच्या सुत्रांनी सांगितलं. अमोल काळे यांचा विजय निश्चित करण्यासाठी हे तिन्ही नेते भेटणार असल्याचेही सुत्रांनी सांगितलं. 

अमोल काळे हे एमसीएचे विद्यमान उपाध्यक्ष असले तरी मुंबई क्रिकेट आणि त्यांचा संबंध अगदी अलीकडचा आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय अशी काळेंची ओळख असली तरी एमसीएत आशिष शेलारांनी त्यांची पाठराखण केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनीही एमसीएच्या मतदारांची खास बैठक घेऊन काळेंच्या पंखात नवं बळ भरलंय. एमसीएच्या या निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड, शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर आणि शिवसेनेच्या वाहतूक संघटनेचे निलेश भोसले हेही पवार-शेलार पॅनेलकडूनच कार्यकारिणीसाठी आपलं नशीब आजमावतायत. त्या तिघांच्या उमेदवारीनं कार्यकारिणीच्या नऊ जागांसाठी तब्बल २३ जणांमधली शर्यत आणखी चुरशीची बनवलीय. एकनाथ शिंदे समर्थक आमदार प्रताप सरनाईक यांचे चिरंजीव विहंग सरनाईक हेही पवार-शेलार पॅनेलकडून मुंबई ट्वेन्टी ट्वेन्टी लीगच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवडून आले आहेत.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Britain Election Result 2024 : भारतात राज्यसभेत सासूबाई सुधा मूर्तींचं खणखणीत भाषण, तिकडे जावई ऋषी सुनक यांच्या पक्षाचा पराभव, ब्रिटनमध्ये लेबर पार्टीची सत्ता येणार  
ऋषी सुनक यांच्या हुजूर पक्षाचा पराभव, ब्रिटनमध्ये सत्तांतर, लेबर पार्टी 14 वर्षानंतर सत्तेत
Kolhapur Rain Update : कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून पुढील पाच दिवस मुसळधार; धरण क्षेत्रात धुवाधार बरसात
कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून पुढील पाच दिवस मुसळधार; धरण क्षेत्रात धुवाधार बरसात
राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
Mirzapur Season 3 OTT Release :  'मिर्झापूर 3'  प्राईम व्हिडीओवर मोफत कसे पाहाल? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप
'मिर्झापूर 3' प्राईम व्हिडीओवर मोफत कसे पाहाल? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Hingoli Manoj Jarange : मनोज जरांगे मराठवाड्याचा दौऱ्यावर, हिंगोलीतून शांतता रॅलीने दौऱ्याची सुरुवातTop News in 9 Seconds | 9 सेकंदात 9 बातम्या | 05 July 2024 | ABP MajhaRahul gandhi at Hathras : राहुल गांधी हाथरसमध्ये पीडितांच्या कुटुंबीयांच्या भेटीलाPandharpur : विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील गाभाऱ्यात बसवली चांदीची मेघडंबरी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Britain Election Result 2024 : भारतात राज्यसभेत सासूबाई सुधा मूर्तींचं खणखणीत भाषण, तिकडे जावई ऋषी सुनक यांच्या पक्षाचा पराभव, ब्रिटनमध्ये लेबर पार्टीची सत्ता येणार  
ऋषी सुनक यांच्या हुजूर पक्षाचा पराभव, ब्रिटनमध्ये सत्तांतर, लेबर पार्टी 14 वर्षानंतर सत्तेत
Kolhapur Rain Update : कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून पुढील पाच दिवस मुसळधार; धरण क्षेत्रात धुवाधार बरसात
कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून पुढील पाच दिवस मुसळधार; धरण क्षेत्रात धुवाधार बरसात
राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
Mirzapur Season 3 OTT Release :  'मिर्झापूर 3'  प्राईम व्हिडीओवर मोफत कसे पाहाल? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप
'मिर्झापूर 3' प्राईम व्हिडीओवर मोफत कसे पाहाल? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप
Mukesh Khanna On Kalki 2898 AD : 'कल्की 2898 एडी'वर  छोट्या पडद्यावरील 'भीष्म' संतापले; मुकेश खन्ना म्हणाले,  हिंदूंनी आता...
'कल्की 2898 एडी'वर छोट्या पडद्यावरील 'भीष्म' संतापले; मुकेश खन्ना म्हणाले, हिंदूंनी आता...
Nashik Dengue : नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
Vasant More: मी प्रकाश आंबेडकरांना मेसेज टाकला, 'साहेब मला माफ करा'; वसंत मोरेंनी वंचित का सोडली?
मी प्रकाश आंबेडकरांना मेसेज टाकला, 'साहेब मला माफ करा'; वसंत मोरेंनी वंचित का सोडली?
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
Embed widget