एक्स्प्लोर

महाराष्ट्राची मदत करणारा केंद्रातील एकमेव नेता, शरद पवारांनी गडकरीचं केलं कौतुक 

Nitin Gadakari : महाराष्ट्रात ऊसाच्या संबंधित अथवा साखरेसंदर्भात कोणताही प्रश्न निर्माण झाला की जी व्यक्ती शेतकऱ्यांच्या मागे ठामपणे उभी राहते, ती म्हणजे नितीन गडकरी...

Sharad Pawar on Nitin Gadakari : महाराष्ट्रात ऊसाच्या संबंधित अथवा साखरेसंदर्भात कोणताही प्रश्न निर्माण झाला की जी व्यक्ती शेतकऱ्यांच्या मागे ठामपणे उभी राहते, ती म्हणजे नितीन गडकरी... असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी नितीन गडकरी यांच्या कामाचं कौतुक केले. ते पुण्यात साखर परिषदेत बोलत होते. यावेळी नितीन गडकरीही उपस्थित होते. राज्यात सध्या राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. असं असतानाही शरद पवार यांनी गडकरीचं कौतुक केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 
 
पुण्यात वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वतीने राज्यस्तरीय साखर परिषद 2022 चं उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि शरद पवार यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, साखर उद्योगासमोर असलेले प्रश्न अनेक आहेत,  या प्रश्नांवर चर्चा करून विधायक, अनुकूल, शाश्वत आणि पर्यावरण पूरक उपाययोजना हाती घेऊन त्यावर मार्ग काढणे गरजेचे आहे. त्यासाठी काळ सुसंगत असे सर्वस्पर्शी व्यापक सूक्ष्मनियोजन महत्वाचे आहे. दूरगामी दृष्टी, दृढनिश्चयी धोरणात्मक संकल्प आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाधिष्ठीत उपायोजना या त्रिसुत्रीच्या बळावर साखर उद्योगाला चांगली दिशा देण्यासाठी साखर परिषद महत्वाचे योगदान देईल, असे त्यांनी सांगितले.

केंद्र सरकारमध्ये महाराष्ट्रातील ऊसाचा, साखरेचा, इथेनॉलचा किंवा कोणताही प्रश्न आला तर एक व्यक्ती भक्कमपणे ऊस उत्पादकांच्या आणि महाराष्ट्राच्या मागे उभी असते आणि त्या व्यक्तीचं नाव नितीन गडकरी आहे. ते आज या ठिकाणी आहे, याचा मला मनापासून आनंद आहे, असे शरद पवार म्हणाले. 
 
ऊस तोडणी आणि वाहतूकीचा प्रश्न  - 
पुढे बोलताना शरद पवार म्हणाले,  भविष्यात ऊसाचे क्षेत्र आणखी वाढणार आहे. त्यामुळे येत्या हंगामात ऊस तोडणीचे नियोजन हंगाम सुरू होण्याआधी करावे लागेल. ऊस तोडणी आणि वाहतूकीचा प्रश्न गंभीर होत आहे. साखर आयुक्तालय आणि साखर कारखान्यांनी योग्य नियोजन करून त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. 

वीज निर्मितीवर काय म्हणाले शरद पवार ?
देशात कोळसा टंचाईमुळे वीज निर्मिती कमी होत आहे. याचा परिणाम उद्योग आणि शेतीवर होत आहे. ऊसाच्या बगॅसच्या माध्यमातून 3 हजार 600 मेगावॅट वीज निर्मिती होऊ शकते. सध्या महाराष्ट्रामध्ये २४७० मेगावॅट स्थापित क्षमतेचे सहवीज निर्मिती प्रकल्प आहेत. त्यापैकी आपण 65 ते 70 टक्के वीज महावितरणला दिली तरी अंदाजे 1660 मेगावॅट वीज राज्य सरकारला मिळू शकते. यासाठी बगॅस आधारीत प्रकल्पाची उभारणीसाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे. त्याचसोबत सौर ऊर्जेचा उपयोग करणेही आवश्यक आहे. राज्यात सौरऊर्जा निर्मितीसाठी भरपूर वाव आहे,मात्र त्यासाठी निधीची उपलब्धता होणे गरजेचे आहे. केंद्र सरकारने धोरणात्मक निर्णय घेऊन इथेनॉल साठवणूकीची क्षमता वाढविणे आणि त्यासाठी गुंतवणूक, रेल्वेने वाहतूक करण्याची योजना आणि  इथेनॉल खरेदी याबाबत तेल कंपन्यांचे धोरण अधिक अनुकूल होण्याची गरज आहे, असेही शरद पवार म्हणाले. 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष, चिन्हावर आज सलग पाचव्या दिवशी सुनावणी
Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष, चिन्हावर आज सलग पाचव्या दिवशी सुनावणी
Tukaram Mundhe: डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंगसह प्रमुख आस्थापनांची FDA कडून तपासणी; 2 व्यावसाय तात्काळ बंद, 5 परवाने निलंबित, 95 जणांना सुधारणा नोटिसा
डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंगसह प्रमुख आस्थापनांची FDA कडून तपासणी; 2 व्यावसाय तात्काळ बंद, 5 परवाने निलंबित, 95 जणांना सुधारणा नोटिसा
Amravati News : अमरावतीच्या मेळघाटातील निवासी आश्रम शाळेमध्ये भुतांची अफवा; 600 विद्यार्थ्यांनींनी शाळा सोडून थेट घर गाठलं; डोमा गावात नेमकं काय घडलं?
अमरावतीच्या मेळघाटातील निवासी आश्रम शाळेमध्ये भुतांची अफवा; 600 विद्यार्थ्यांनींनी शाळा सोडून थेट घर गाठलं; डोमा गावात नेमकं काय घडलं?
Raigad Crime News: प्रसूतीकळांनी विव्हळणाऱ्या महिलेकडे दुर्लक्ष, डॉक्टरकडून नर्सला छत्रीने मारहाण; पेण उपजिल्हा रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
प्रसूतीकळांनी विव्हळणाऱ्या महिलेकडे दुर्लक्ष, डॉक्टरकडून नर्सला छत्रीने मारहाण; पेण उपजिल्हा रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Amravati News : अमरावतीच्या मेळघाटातील निवासी आश्रम शाळेमध्ये भुतांची अफवा; 600 विद्यार्थ्यांनींनी शाळा सोडून थेट घर गाठलं; डोमा गावात नेमकं काय घडलं?
अमरावतीच्या मेळघाटातील निवासी आश्रम शाळेमध्ये भुतांची अफवा; 600 विद्यार्थ्यांनींनी शाळा सोडून थेट घर गाठलं; डोमा गावात नेमकं काय घडलं?
Supriya Sule Vinod Tawde Meet: सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंचा एकाच गाडीतून प्रवास; जलजीवन मिशनची बैठक सोडून दोघेही निघून गेले, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंचा एकाच गाडीतून प्रवास; जलजीवन मिशनची बैठक सोडून दोघेही निघून गेले, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Riddhi Thakkar Mumbai Biker Death: मुंबईतील 24 वर्षीय बायकरचा छत्तीसगडमध्ये दुर्दैवी अंत; बस्तरच्या सफरीदरम्यान भीषण अपघात, नेमकं काय घडलं?
मुंबईतील 24 वर्षीय बायकरचा छत्तीसगडमध्ये दुर्दैवी अंत; बस्तरच्या सफरीदरम्यान भीषण अपघात, नेमकं काय घडलं?
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
Embed widget