एक्स्प्लोर
पुतण्याची काकांना धोबीपछाड, बीड नगरपालिका पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचा विजय
बीड शहरातील प्रभाग क्र.11 अ मधील पोटनिवडणुकीत एका जागेसाठी सात उमेदवार रिंगणात होते.

बीड : बीड नगरपालिकेच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक पार पडली, ज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा विजय झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोमीन खमरुनिस्सा शरीफोद्दीन यांना 1039 मतं मिळाली तर अपक्ष उमेदवार शेख समीरा बेगम खमर यांना 754 मतं मिळाली.
बीड शहरातील प्रभाग क्र.11 अ मधील पोटनिवडणुकीत एका जागेसाठी सात उमेदवार रिंगणात होते. याठिकाणी प्रमुख लढत ही संदीप क्षीरसागर यांच्या गटाविरोधात जयदत्त क्षीरसागर यांच्या उमेदवारांमध्ये होती. या निवडणुकीत संदीप क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारासाठी आपली पूर्ण ताकद उभी केली होती, तर विरोधात काका जयदत्त क्षीरसागर यांचा उमेदवार होता.
राष्ट्रवादीकडून मोमीन खमरुनिस्सा शरीफोद्दीन या उमेदवार होत्या तर जयदत्त क्षीरसागर यांनी अपक्ष उमेदवार उभा केला होता. शिवणयंत्र चिन्हावर शेख समीरा बेगम खमर निवडणुकीच्या रिंगणात उभ्या होत्या.
ही निवडणूक एका छोट्या जागेसाठी झालेली असली तरी राष्ट्रवादी काँग्रेसने या निवडणुकीची सगळी जबाबदारी संदीप क्षीरसागर यांच्याकडे दिली होती. म्हणूनच जयदत्त क्षीरसागर यांना अपक्ष उमेदवार उभा करावा लागला. पण या निवडणुकीत पुतण्याने काकांना चांगलीच धोबीपछाड दिली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्रिकेट
व्यापार-उद्योग
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
