एक्स्प्लोर

Chhagan Bhujbal : विठ्ठला सांभाळून घे रे!  छगन भुजबळ शरद पवारांच्या पडले पाया 

Chhagan Bhujbal : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) नवनिर्वाचित मंत्र्यांसह  शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली.

Ajit Pawar Camp Meet Sharad Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) नवनिर्वाचित मंत्र्यांसह  शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. यावेळी सर्वच नऊ मंत्र्यांनी शरद पवार यांचे आशिर्वाद घेतल्याचे समजतेय. शरद पवारांना वाय.बी. चव्हाण सेंटरवर अजित पवारांचा गट भेटला, यातील ईनसाईड स्टोरी माझाच्या हाती लागली.  छगन भुजबळ पवारांच्या समोर आले आणि विठ्ठला सांभाळून घे रे आम्हाला, असं म्हणत थेट पवारांच्या पाया पडले. त्यानंतर जवळपास सर्वच नेत्यांनी पवारांच्या पाया पडत हात जोडले, अशी माहिती मिळाली. 

विठ्ठला सांभाळून घे रे असे उद्गार काढत छगन भुजबळ शरद पवारांच्या पाया पडले. वाय बी चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी येऊन शरद पवारांची भेट घेतली. याभेटी दरम्यान जवळपास सर्वच मंत्र्यांनी  शरद पवारांच्या पाया पडत हात जोडले. मंत्री आणि शरद पवार यांच्यामध्ये जवळपास तासभर चर्चा झाल्याचे समजतेय. अजित पवार यांच्या गटाने शरद पवार यांची भेट घेतली. यात सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ, आदिती तटकरे, धनंजय मुंडे, संजय बनसोडे आदींचा सहभाग होता. ही माहिती मिळताच जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड देखीलही तातडीने वाय.बी. चव्हाण सेंटरवर दाखल झाले. मला सुप्रिया सुळेंचा फोन आला म्हणून मी लवकर निघालोय. शरद पवारांनी बोलवलंय, लवकर या असं मला सांगितलं, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली.

शरद पवार आमचे दैवत, राष्ट्रवादी एकसंध राहिल यावर विचार करुन मार्गदर्शन करण्याची विनंती : पटेल

शरद पवार यांच्यासोबतच्या भेटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि भेटीविषयी माहिती दिली. प्रफुल्ल पटेल म्हणाले की, "आम्हा सर्वांचे दैवत आदरणीय शरद पवार यांची आज भेट घेतली. त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी भेट घेतली. शरद पवार हे बैठकीच्या निमित्ताने यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये असल्याचं समजलं. त्यामुळे वेळ न मागता आम्ही इथे आलो आणि त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतला. राष्ट्रवादी काँग्रेस एकसंध कसा राहिल याचाही विचार करुन त्यांनी येत्या काही दिवसात मार्गदर्शन करावा अशी विनंती केली. शरद पवारांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यांनी आमचं म्हणणं शांतपणे ऐकून घेतलं."

शरद पवार यांनी आमच्याशी काहीच भाष्य केलं नाही

अजित पवार गटातल्या मंत्र्यांनी  आज अचानक शरद पवार यांची भेट घेतली. या नेत्यांनी एक तास शरद पवार यांच्याशी चर्चा केली. मात्र, या भेटीत शरद पवार यांनी आमच्याशी काहीच भाष्य केलं नसल्याचं प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं. 

आपल्या ज्येष्ठ नेत्याकडे जाण्यात वावगं काही नाही : आशिष शेलार 

अजित पवार गट आजही शरद पवारांना आपला नेता मानतात. आपल्या ज्येष्ठ नेत्याकडे जाण्यात वावगं काही नाही, अशी प्रतिक्रिया भाजप नेते आशिष शेलार यांनी दिली आहे.  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
Rahul Gandhi : सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतंAjit Pawar Akole Speech : तिजोरीची चावी माझ्या हातात.. अकोल्यात अजितदादांची टोलेबाजीABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 15 November 2024Abdul Sattar On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या टीकेवर अब्दुल सत्तार यांचं प्रत्युत्तर काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
Rahul Gandhi : सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
BKC Metro Fire : आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
Embed widget