एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
गडचिरोलीत 150 सशस्त्र नक्षलवाद्यांचा हल्ला, रस्त्याच्या कामावरील तब्बल 27 वाहने पेटवली
राज्यभरात महाराष्ट्र दिनाचा उत्साह असताना गडचिरोलीत मात्र काल मध्यरात्री सशस्त्र नक्षलवाद्यांनी रस्त्याच्या कामावरील तब्बल 27 वाहने पेटवल्याची घटना घडली आहे.
गडचिरोली : राज्यभरात महाराष्ट्र दिनाचा उत्साह असताना गडचिरोलीत मात्र काल मध्यरात्री सशस्त्र नक्षलवाद्यांनी रस्त्याच्या कामावरील तब्बल 27 वाहने पेटवल्याची घटना घडली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील दादापूर येथे ही घटना घडली असून त्यात 5 ते 10 कोटींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
पुराडा-मालेवाडा-येरकड या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 136 चे काम सध्या सुरु आहे. हे काम छत्तीसगड राज्यातील दुर्ग येथील अमर इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीद्वारे करण्यात येत आहे. या कंपनीचा गडचिरोलीतील दादापूर येथे गावाशेजारीच डांबर प्लांट असून, दोन कार्यालयेही आहेत. काल मध्यरात्री दीडशेहून अधिक सशस्त्र नक्षलवादी या परिसरात शिरले. त्यांनी संपूर्ण गावभर शासनाविरोधी मजकूर लिहिलेले बॅनर लावले आणि नंतर जवळपास असलेली वाहनं व अन्य यंत्रसामग्री पेटवली.
या आगीत एक कंटेनर लॅब, हायवा ट्रक, डांबर पसरविणारी मशिन, डिझेल व पेट्रोल टँकर अशी एकूण 27 वाहने, जनरेटर व दोन कार्यालये जळाली आहेत. या आगीत 5 ते 10 कोटींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे.
22 एप्रिल रोजी 'कसनासुर कांड'ला एक वर्षे पूर्ण झाले. त्यानिमित्त 22 ते 28 एप्रिल नक्षवाद्यांनी शहीद सप्ताहाचं आव्हान केलं होतं. त्या दरम्यान जिल्ह्यात होणाऱ्या विकास कामाच्या विरोधात ही जाळपोळ करण्यात आली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
निवडणूक
महाराष्ट्र
निवडणूक
Advertisement