Navratri 2022, Day 1 LIVE: सप्तश्रृंगी गडावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात, भाविकांच्या वाहनांना गडावर परवानगी नाही - वाचा ठिकठिकाणचे महत्वाचे अपडेट्स
Maharashtra Navratri Utsav 2022 LIVE : आजपासून राज्यासह देशभरात नवरात्र उत्सवाचा उत्साह आहे. कोरोनामुळं गेले दोन वर्ष उत्सवावर निर्बंध आले होते. सर्व ठिकाणचे अपडेट्स या LIVE BLOG मध्ये..
LIVE
Background
Maharashtra Navratri Utsav 2022 LIVE : आजपासून राज्यासह देशभरात नवरात्र उत्सवाचा उत्साह आहे. कोरोनामुळं गेले दोन वर्ष उत्सवावर निर्बंध आले होते. सर्व ठिकाणचे अपडेट्स या LIVE BLOG मध्ये..
Navratri 2022 : शारदीय नवरात्रोत्सवाच्या घटस्थापनेसाठी (Ghatstahapana) आज (26 सप्टेंबर) पासून सुरुवात होत आहे. नवरात्रीच्या या पहिल्या दिवशी कलश स्थापनेनंतर दुर्गा देवीच्या पहिल्या रूपाचे म्हणजेच देवी शैलपुत्रीचे (Devi Shailpiutri) पूजन केले जाते. शारदीय नवरात्रीत दुर्गा अष्टमी व्रत, अष्टमी तिथीला कन्यापूजन, नवमी तिथीला महानवमी आणि दशमी तिथीला दसरा किंवा विजयादशमी हे सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. प्रतिपदेच्या दिवशी घटस्थापना किंवा कलश स्थापनेने दुर्गा देवीच्या विविध रूपांची पूजा सुरू होते. 26 सप्टेंबरपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे. पंचांगानुसार अश्विन शुक्ल प्रतिपदा तिथी 26 सप्टेंबर रोजी पहाटे 03:23 ते 27 सप्टेंबर रोजी पहाटे 03:08 पर्यंत आहे.
घटस्थापना स्थापना शुभ मुहूर्त 2022
दाते पंचागानुसार, नवरात्रीच्या घटस्थापना मुहूर्ताबद्दल माहिती दिली आहे. शारदीय नवरात्रीच्या घटस्थापना किंवा कलश स्थापनेचा शुभ मुहूर्त पंचांगानुसार अश्विन शुक्ल प्रतिपदा तिथी 26 सप्टेंबर रोजी पहाटे 03:23 ते 27 सप्टेंबर रोजी पहाटे 03:08 पर्यंत आहे. दुपारी 1.45 वाजेपर्यंत घटस्थापनेचा मुहूर्त आहे. सोमवारी ब्राह्म मुहूर्तापासून म्हणजे पहाटे पाच वाजल्यापासून दुपारी 1.45 वाजेपर्यंत घटस्थापना करून पूजन करता येईल. जर काही कारणास्तव तुम्हाला सकाळी कलशाची स्थापना करता येत नसेल, तर तुम्ही ती अभिजीत मुहूर्तावर दुपारी 11.48 ते 12.36 या वेळेत करू शकता. अभिजीत मुहूर्त हा कलशाची स्थापना करण्यासाठी सर्वोत्तम काळ मानला जातो.
सकाळी आहे सर्वोत्तम वेळ
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी 26 सप्टेंबर रोजी सकाळी 06.11 ते 07.42 पर्यंत चोघड्याचा अमृत मुहूर्त आहे. त्यामुळे सकाळी कलशाची स्थापना करणे खूप शुभ राहील.
नवरात्रीत घटस्थापनेला महत्व
हिंदू धर्मानुसार, नवरात्रीतील नवदुर्गेच्या पूजेचा भाग म्हणून घटस्थापना केली जाते. घटस्थापनेसाठी शुभ मुहूर्त निवडणे महत्त्वाचे आहे. कलश हे गणेशाचे रूप आहे, तर या कलश आणि त्यामध्ये आमंत्रण केलेल्या देवतांची गणेशाच्या रूपात पूजा केली जाते. म्हणूनच नवरात्रीमध्ये घटस्थापनेला म्हणजेच कलशाच्या स्थापनेला खूप महत्त्व आहे. घटस्थापनेचा कलश उत्तर किंवा ईशान्य दिशेला ठेवा. स्थापनेच्या ठिकाणी प्रथम गंगाजल शिंपडून ती जागा पवित्र करा. या ठिकाणी दोन इंच मातीत वाळू आणि सप्तामृत मिसळून पसरवून घ्या. कलशावर स्वस्तिक चिन्ह काढा आणि कुंकू लावा. कलशाला धागा बांधा.
नवरात्री घटस्थापना मंत्र
ज्या ठिकाणी कलश स्थापना करत असाल त्या जागेला उजव्या हाताने स्पर्श करून म्हणा - ऊॅं भूरसि भूमिरस्यदितिरसि विश्वधाया विश्वस्य भुवनस्य धर्त्रीं। पृथिवीं यच्छ पृथिवीं दृग्वंग ह पृथिवीं मा हि ग्वंग सीः।।
सप्तधान्य मांडतानाचा मंत्र - ऊॅं धान्यमसि धिनुहि देवान् प्राणाय त्यो दानाय त्वा व्यानाय त्वा। दीर्घामनु प्रसितिमायुषे धां देवो वः सविता हिरण्यपाणिः प्रति गृभ्णात्वच्छिद्रेण पाणिना चक्षुषे त्वा महीनां पयोऽसि।।
कलश स्थापनेचा मंत्र - ऊॅं आ जिघ्र कलशं मह्या त्वा विशन्त्विन्दव:। पुनरूर्जा नि वर्तस्व सा नः सहस्रं धुक्ष्वोरुधारा पयस्वती पुनर्मा विशतादयिः।।
कलशात जल भरण्याचा मंत्र - ऊॅं वरुणस्योत्तम्भनमसि वरुणस्य स्काभसर्जनी स्थो वरुणस्य ऋतसदन्यसि वरुणस्य ऋतसदनमसि वरुणस्य ऋतसदनमा सीद।।
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
संबंधित बातम्या
Navratri 2022 : नवरात्रीत 'या' गोष्टींची घ्या विशेष काळजी
Navratri 2022: नवरात्रीत लग्नासाठी वधू किंवा वर पाहत असाल, तर शुभ मुहूर्त जाणून घ्या
अहमदनगरच्या श्री क्षेत्र मोहटा देवस्थान येथे जयघोषात शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त घटस्थापना
अहमदनगरच्या श्री क्षेत्र मोहटा देवस्थान येथे पारंपरिक पद्धतीने देवीच्या जयघोषात शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त घटस्थापना करण्यात आली.... देवस्थान समिती अध्यक्ष आणि जिल्हा न्यायाधीश सुनिल गोसावी यांच्या हस्ते सपत्नीक मुख्य धार्मिकविधी पार पडला...यावेळी दिवाणी न्यायाधीश अश्विनी बिराजदार उपस्थित होत्या...मोहटे गावात विश्वस्त डॉ ज्ञानेश्वर दराडे पदाधिकाऱ्यांच्या हस्ते महाआरती केल्यानंतर सुवर्ण अलंकाराने सजलेल्या देवीच्या मुखवट्याची गाजत मिरवणूक काढण्यात आली. साडेतीन शक्ती श्री क्षेत्र माहुरचे उपपीठ म्हणून मोहटा देवस्थानची ख्याती आहे.
Sant Muktai mandir: संत मुक्ताई समाधीस्थळी हजारो भाविक,मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळीमध्ये भाविकांची गर्दी
Jejuri News Updates: जेजुरीगडावर श्री खंडोबा व म्हाळसादेवीच्या उत्सवमूर्तींची घटस्थापना
Nashik Vani Navratri: 9 दिवस गडावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात, भाविकांच्या वाहनांना गडावर परवानगी नाही
अहमदनगर : महिलांनी दांडिया खेळून केला नवरात्रोत्सवाचा आरंभ
जिजाऊ ग्रूपने सर्व वयोगटातील महिलांना एकत्र आणून नवरात्राची सुरुवात आज दांडिया खेळून केली.नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी शैलपुत्रीची पूजा केली जाते. या दिवशी घटस्थापना करून आणि पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करून शक्ती, ज्ञान, तपस्या आणि शांती यांची आराधना जिजाऊ ग्रुपच्या महिलांनी केली. नवरात्रीचे नऊ दिवस सर्व स्तरातील आणि वयोगटातील महिलांसाठी जिजाऊ ग्रुपने विविध सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केले असल्याचे संस्थापिका मनीषा संजय गुगळे यांनी सांगितले.