एक्स्प्लोर

Navneet Rana: देवेंद्र फडणवीस हेच आमच्यासाठी मुख्यमंत्री, नवनीत राणांच्या वक्तव्यानं राजकारण तापलं

Devendra Fadanvis : राष्ट्रवादी काँग्रेसनं पुन्हा एकदा शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. तर भाजपनं नवनीत राणा यांना पक्षात येण्याची ऑफर दिली आहे. 

Navneet Rana on Devendra Fadanvis : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत एक मोठं वक्तव्य केलं आहे. देवेंद्र फडणवीस हेच आमच्यासाठी मुख्यमंत्री असून महाराष्ट्राच विकास देवेंद्र फडणवीसच करू शकतात, असं वक्तव्य नवनीत राणा यांनी केलं आहे.  नवनीत राणा यांच्या वक्तव्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय चर्चेला पुन्हा एकदा उधाण आलेय. राष्ट्रवादी काँग्रेसनं पुन्हा एकदा शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. तर भाजपनं नवनीत राणा यांना पक्षात येण्याची ऑफर दिली आहे. 

काय म्हणाल्या नवनीत राणा?

देवेंद्र फडणवीस हेच आमच्यासाठी मुख्यमंत्री आहेत. या राज्याचा जर कुणी विकास करू शकतो तर तो फक्त देवेंद्र फडणवीस हेच आहेत. येणाऱ्या काळात अमरावती लोकसभा मतदार संघात सहा विधानसभा मतदार संघ येतात. येणाऱ्या निवडणुकीत सुद्धा फक्त बडनेरा सोडून भाजपचे उमेदवार निवडून आले पाहिजेत. जिथे जिथे फडणवीस यांचे पाऊल पडले तिथं विकासच होणार..आणि आमच्यासाठी फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत, असे नवनीत राणा म्हणाल्या. बडनेरा इथून रवी राणा आमदार असल्याने ती जागा सोडून इतर ठिकाणी भाजपचे आमदार निवडून आले पाहिजे हे बोलताच सभेत एकच हश्या उडाला..

नवनीत राणांनी भाजपात यावं - बावनकुळेंची ऑफर

नवनीत राणा यांनी राष्ट्रीय पक्षात यावं. त्या राष्ट्रीय पक्षात काम करण्यायोग्य आहेत. त्यांनी भाजप पक्ष स्वीकारावा ते पक्षात आले तर खऱ्या अर्थाने त्यांचा मानसन्मान केला जाईल. 2024 मध्ये आम्ही एकत्रित निवडणूक लढवणार आहेत...बडनेरा मतदारसंघात खासदार आणि आमदार भाजपचे यावे, यासाठी आम्ही युवा स्वाभिमानला विनंती करणार आहोत.. त्यांना ही विनंती करू की त्यांनी राष्ट्रीय पक्षात काम करावं. 2024 पर्यत त्यांचं मनपरिवर्तन होईल...कोण मुख्यमंत्री आणि कोण उपमुख्यमंत्री यापेक्षा महाराष्ट्रच्या जनेतला विकास महत्वाचा आहे. खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवावी, असे बावनकुळे म्हणाले. 

शिंदे गटाची प्रतिक्रिया काय?

नवनीत राणा यांच्या वक्तव्यानंतर शिंदे गटाकडून शंभूराजे देसाई यांनी प्रतिक्रिया दिली. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि फडणवीस उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळे नवनीत राणा काय म्हणतात यावर बोलायचं नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हातात हात घालून राम लक्ष्मणासारखे काम करत आहेत, असे देसाई म्हणाले. 

अमोल मिटकरींची टीका -  

राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी खासदार नवनीत राणांच्या देवेंद्र फडणवीस हेच आमचे मुख्यमंत्री असल्याच्या विधानावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी टीका केली. ते म्हणाले की, महाविकास आघाडी ही सातत्याने सांगते आहे की एकनाथ शिंदे हे जरी मुख्यमंत्री असले तरी ते भाजपचे मुख्यमंत्री नाहीत. भाजपला न पचलेले मुख्यमंत्री आहेत. हे नवनीत राणा पहिल्यांदा बोलल्यात असं नाही. चंद्रकांतदादा पाटील, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यानंतर आज त्यावर नवनीत राणांनी कळस चढविला आहे. एकनाथ शिंदे जरी मुख्यमंत्री असले तरी आपण देवेंद्र फडणवीसांनाच मुख्यमंत्री मानतो. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनीच देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री असल्याचं म्हटलं होतं. विधानानंतर नवनीत राणांचं विधान खरं सत्ताधारी कोण हे सांगणारं.  या सरकारमध्ये धुसफूस आणि अंतर्विरोध आहे. एकनाथ शिंदेंना भाजपचा कोणताच नेता गांभिर्याने घेत नाही. शिंदेसोबत गेलेल्या 40 लोकांनीच भाजप कसं संपवतंय याचे हे सुचक विधान. हे 40 आमदार भाजपात सहभागी केल्याशिवाय शिंदेंकडे मार्ग नाही. ज्या दिवशी असं होईल त्या दिवशी यांचं अस्तित्व संपलेलं असेल.  एकनाथ शिंदेंनी आता तरी जागं व्हावं. भाजपाची खेळी ओळखावी, असे अमोल मिटकरी म्हणाले. 

महत्त्वाच्या बातम्या

महिला ही देशाची सर्वात मोठी ताकद, त्यांनी कधीच स्वतंत्र राहू नये हा मनुस्मृतीचा डाव, पुण्यात राहुल गांधी कडाडले
महिला ही देशाची सर्वात मोठी ताकद, त्यांनी कधीच स्वतंत्र राहू नये हा मनुस्मृतीचा डाव, पुण्यात राहुल गांधी कडाडले
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
Nitin Nabin : सार्वजनिक जीवनात संयम आणि शिस्त पाळा, भाजप अध्यक्ष नितीन नवीन यांचा नव्या टीमला थेट संदेश 
सार्वजनिक जीवनात संयम आणि शिस्त पाळा,नितीन नवीन यांचा नव्या टीमला थेट संदेश
Rahul Gandhi In Pune : राहुल गांधी पुण्यात; प्रदेशाध्यक्षांसह बडे नेते स्वागताला, सतेज पाटील, प्रणिती शिंदेंसह विद्यार्थ्यांकडूनही 'वेलकम'
राहुल गांधी पुण्यात; प्रदेशाध्यक्षांसह बडे नेते स्वागताला, सतेज पाटील, प्रणिती शिंदेंसह विद्यार्थ्यांकडूनही 'वेलकम'
TikTok : अमेरिकेचा टिकटॉकला दणका, तब्बल 3300 कोटींचा दंड ठोठावला, नेमकं काय घडलं?
अमेरिकेचा टिकटॉकला दणका, तब्बल 3300 कोटींचा दंड ठोठावला, नेमकं काय घडलं?
Embed widget