एक्स्प्लोर

ट्रॅव्हल एजन्सीने हात वर केले, रायगडचे भाविक नेपाळमध्ये अडकले, फडणवीसांच्या एका मेसेजने 58 प्रवासी सुखरुप परतले!

सहा लाख रुपये दिले नाहीत तर सोडणार नाही, असे या ट्रॅव्हल्सचा मालक अंकीत जायस्वाल आणि त्याच्या साथीदारांनी धमकावयला सुरूवात केली. परक्या गावात उद‌्भवलेल्या या प्रसंगामुळे काय करायचे हा प्रश्न या भाविकांसमोर उभा राहिला.

मुंबई : पैसे नाहीत, पर्यटन कंपनीने हात वर करून नेपाळमध्ये अडकवून ठेवलेले. अनेक नेत्यांना आणि त्यांच्या पीएला फोन करून मदत मागितली. पण प्रतिसाद मिळेना. शेवटी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मेसेज केला आणि त्यांनी सर्व यंत्रणा हलविली. नेपाळपासून ते उत्तर प्रदेशापर्यंत अक्षरश: व्हीआयपी ट्रिटमेंट मिळून हे भाविक रायगड जिल्ह्यातील आपल्या गावी पोहोचले. काठमांडूमध्ये देवेंद्र फडणवीस आमच्या मदतीला धावून आले, अशी भावना पर्यटकांनी व्यक्त केली. 

नेपाळमध्ये अडकलेला एक भाविक संजू म्हात्रे यांनी सांगितले की, आम्ही  रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील कामोठे गावातील 58 भाविक नेपाळमध्ये धार्मिक पर्यटनासाठी गेलो होतो. 35 महिला आणि 23 पुरुष त्यामध्ये होते. गोरखपूरहून नेपाळपर्यंत सगळे व्यवस्थित पोहोचले. लुंबीनी, पोखरा, जनकपुरी, मनोकामना या ठिकाणी दर्शन घेतले. मात्र, काठमांडूला आल्यावर त्यांना राधाकृष्ण ट्रॅव्हल्सच्या एका बसमध्ये कोंबण्यात आले. भाविकांनी गावाहून निघतानाच सर्व पैसे भरलेले होते. मात्र, त्यांची फसवणूक झाली होती.  तुमच्या पर्यटन कंपनीकडून पैसे आले नाहीत. सहा लाख रुपये दिले नाहीत तर सोडणार नाही, असे या ट्रॅव्हल्सचा मालक अंकीत जायस्वाल आणि त्याच्या साथीदारांनी धमकावयला सुरूवात केली. परक्या गावात उद‌्भवलेल्या या प्रसंगामुळे काय करायचे हा प्रश्न या भाविकांसमोर उभा राहिला. त्यांनी ओळखीच्या लोकांमार्फत नेत्यांना आणि त्यांच्या पीएला फोन करायला सुरुवात केली. पण त्यांच्याकडून प्रतिसाद मिळेना. शेवटी संजू म्हात्रे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मेसेज करून सर्व प्रसंग सांगितला. त्यांचा तातडीने प्रतिसाद आला. त्यांनी माहिती घेतली. लगेचच फडणवीस यांचे खासगी सचिव दिलीप राजूरकर आणि  दिल्लीतील स्वीय सहायक मनोज मुंडे यांनी या भाविकांशी संपर्क साधला.

ट्रॅव्हल एजन्सीने हात वर केले, रायगडचे भाविक नेपाळमध्ये अडकले, फडणवीसांच्या एका मेसेजने 58 प्रवासी सुखरुप परतले!

उत्तर प्रदेशमधून खास बोगीने मुंबईत दाखल - 

देवेंद्र फडणवीस यांच्या टीमने संदीप राणा यांना याबाबत कळवले. राणा यांनी स्वत: या भाविकांची भेट घेतली व  सर्व भाविकांची व्यवस्था करून विशेष बसने त्यांना गोरखपूरला पोहोचवले. देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी संपर्क साधला होता. त्यामुळे भाविक गोरखपूरला पोहोचल्यावर तेथील जिल्हाधिकारी स्वत: भेटीला आले. त्यांनी दोन दिवस भाविकांची निवासाची आणि भोजनाची व्यवस्था केली. त्यांना मुंबईपर्यंत कसे न्यायचे प्रश्न होता. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहून गोरखपूरपासून मुंबईपर्यंत खास बोगी जोडण्याची विनंती केली. रेल्वेने त्याप्रमाणे भाविकांसाठी गोरखपूरहून मुंबईपर्यंत रेल्वेची एक बोगी आरक्षित करून दिली. दोन दिवस प्रवास करून सर्व जण सुखरुपपणे मुंबईला पोहोचले. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vinod Tawde : अमित शाह यांची तडीपारी देशभक्तीचे लक्षण; सावरकर मंत्री झाले असते तर शरद पवार असंच बोलले असते का? विनोद तावडेंचा पलटवार
अमित शाह यांची तडीपारी देशभक्तीचे लक्षण; सावरकर मंत्री झाले असते तर शरद पवार असंच बोलले असते का? विनोद तावडेंचा पलटवार
‘Succession’ Mansion Destroyed : 18 बेडरुम, 10 हजार कोटींचा सर्वात महागडा आलिशान महाल कॅलिफोर्निया जंगलात जळून खाक! व्हिडिओ पाहून अंगावर शहारे
Video : 18 बेडरुम, 10 हजार कोटींचा सर्वात महागडा आलिशान महाल कॅलिफोर्निया जंगलात जळून खाक! व्हिडिओ पाहून अंगावर शहारे
Manjali Karad: ‘मराठा, मराठा काय करतो, मीही 96 कुळी मराठा…’, वाल्मिक कराडच्या पत्नीने मनोज जरांगे पाटलांना खडसावलं
‘मराठा, मराठा काय करतो, मीही 96 कुळी मराठा…’, वाल्मिक कराडच्या पत्नीने मनोज जरांगे पाटलांना खडसावलं
Beed Crime: संतोष देशमुखांचे मारेकरी कोणाच्या घरात लपले, 'ती' स्विफ्ट कार कोणाची? तपासात सगळं बाहेर येणार; बजरंग सोनावणेंचा इशारा
संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना घरात लपवणाऱ्यांचाही हिशेब होणार; बजरंग सोनावणेंचा इशारा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Walmik Karad Pimpari Chinchwad Flat : वाल्मिक कराडचा पिंपरी-चिंचवडमधील फ्लॅट सील करुन लिलाव करणारDhananjay Deshmukh On Walmik Karad : गरज भासल्यास वाल्मीक कराडांची आम्ही प्रत्यक्षात भेट घेऊ- देशमुखNagpur Crime News : चिंताजनक! मानसोपचार तज्ज्ञाकडून शंभरावर मुली-महिलांचे लैंगिक शोषणWalmik Karad Flat In Pimpari : पिंपरी-चिंचवडमध्ये वाल्मिक कराडचा उच्चभ्रू सोसायटीत फ्लॅट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vinod Tawde : अमित शाह यांची तडीपारी देशभक्तीचे लक्षण; सावरकर मंत्री झाले असते तर शरद पवार असंच बोलले असते का? विनोद तावडेंचा पलटवार
अमित शाह यांची तडीपारी देशभक्तीचे लक्षण; सावरकर मंत्री झाले असते तर शरद पवार असंच बोलले असते का? विनोद तावडेंचा पलटवार
‘Succession’ Mansion Destroyed : 18 बेडरुम, 10 हजार कोटींचा सर्वात महागडा आलिशान महाल कॅलिफोर्निया जंगलात जळून खाक! व्हिडिओ पाहून अंगावर शहारे
Video : 18 बेडरुम, 10 हजार कोटींचा सर्वात महागडा आलिशान महाल कॅलिफोर्निया जंगलात जळून खाक! व्हिडिओ पाहून अंगावर शहारे
Manjali Karad: ‘मराठा, मराठा काय करतो, मीही 96 कुळी मराठा…’, वाल्मिक कराडच्या पत्नीने मनोज जरांगे पाटलांना खडसावलं
‘मराठा, मराठा काय करतो, मीही 96 कुळी मराठा…’, वाल्मिक कराडच्या पत्नीने मनोज जरांगे पाटलांना खडसावलं
Beed Crime: संतोष देशमुखांचे मारेकरी कोणाच्या घरात लपले, 'ती' स्विफ्ट कार कोणाची? तपासात सगळं बाहेर येणार; बजरंग सोनावणेंचा इशारा
संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना घरात लपवणाऱ्यांचाही हिशेब होणार; बजरंग सोनावणेंचा इशारा
Nashik News: नाशिकमध्ये काँग्रेसला मोठा झटका! महापालिका निवडणुकीपूर्वी बडा मोहरा साथ सोडणार, पोस्ट शेअर करत भावना केल्या व्यक्त
नाशिकमध्ये काँग्रेसला मोठा झटका! महापालिका निवडणुकीपूर्वी बडा मोहरा साथ सोडणार, पोस्ट शेअर करत भावना केल्या व्यक्त
अमित शाहांना अरुण जेटलींच्या कार्यालयाबाहेर बसलेलं पाहिलंय, संजय राऊत म्हणाले...काही गोष्टी सांगायच्या नसतात...
अमित शाह त्यावेळी गुजरातचे बरखास्त गृहराज्यमंत्री होते, खटला दाखल होता तेव्हा अनेकांचे दरवाजे... संजय राऊत
Beed News: परळीनंतर केजमध्ये वातावरण तापलं, वकील पोलिसांवर संतापले, म्हणाले, 'वातावरण वेगळं होईल'
वाल्मिक कराडला मकोका, बीड जिल्ह्यात अशांततेचा वणवा पसरला, केज कोर्टात पोलीस-वकिलांमध्ये बाचाबाची
Buldhana : खळबळजनक! समर्थांनी स्थापन केलेल्या वारी हनुमान मंदिरात धाडसी दरोडा; पुजाऱ्याला बांधून मूर्तीवरील आभूषणे लुटली
खळबळजनक! समर्थांनी स्थापन केलेल्या वारी हनुमान मंदिरात धाडसी दरोडा; पुजाऱ्याला बांधून मूर्तीवरील आभूषणे लुटली
Embed widget