एक्स्प्लोर
नाशिककरांवर जलसंकट... नाशिक शहरात पाणी कपात लागू करण्याचे महापौरांचे आदेश
नाशिकच्या महापौर आणि मनपा पदाधिकाऱ्यांनी गंगापूर धरणाची सकाळी पाहाणी केली. गंगापूर धरणाची पाहाणी केल्यानंतर धरणाने तळ गाठला असल्याने पाणी कपात लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे नाशिककारांवर पाणी टंचाईचे सावट आले आहे.

नाशिक : नाशिक शहरात पाणी कपात लागू करण्याचे आदेश महापौर रंजना भानसी यांनी दिले आहेत. नाशिक शहरात पाणी पुरवठ्याचे नियोजन करण्याच्या अधिकाऱ्यांना महापौर रंजना भानसी यांनी या संदर्भात सूचना दिल्या आहेत. गंगापूर धरणाची पाहाणी केल्यानंतर महापौरांनी हा निर्णय घेतला गेला आहे. यापुढे फक्त एक वेळ पाणीपुरवठा केला जाणार आहे. तसेच जिथे एकवेळ पाणीपुरवठा आहे तिथेही कपात केली जाणार आहे. पाऊस लांबल्याने महापालिकेने हा निर्णय घेतला आहे. गंगापूर धरणात अत्यल्प पाणीसाठा शिल्लक राहिल्याने पाणी कपात लागू केली आहे. नाशिकच्या महापौर आणि मनपा पदाधिकाऱ्यांनी गंगापूर धरणाची सकाळी पाहाणी केली. गंगापूर धरणाची पाहाणी केल्यानंतर धरणाने तळ गाठला असल्याने पाणी कपात लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे नाशिककारांवर पाणी टंचाईचे सावट आले आहे. यंदा पावसाळा लांबल्यामुळे महापालिका प्रशासनाला पाणीकपात करावी लागली आहे. दारणा धरणातून पाणी उचल बंद झाली आहे. गंगापूर आणि मुकणे धरणावर नाशिकची तहान भागत आहे. जूनअखेर पाऊस पडला नाही, तर जुलैमध्ये दोन दिवस शटडाऊन करण्याची वेळ येऊ शकते. गंगापूर धरणासाठी साठ्याचे काम करणाऱ्या दोन धरणांत पाणी असूनही केवळ वीस वर्षांपासून निम्नपातळीवरील पाणी एका खडकामुळे जलविहिरीत येऊ शकत नाही. गंगापूर धरणातून चारी खोदण्याचे काम गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित होते. धरणात शुक्रवारपासून ही चोरी खोदण्याचे काम सुरू झाले आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
महाराष्ट्र
सोलापूर























