एक्स्प्लोर

Nashik Air Service : नाशिक ते बेळगाव विमानसेवा जानेवारी 2023 पासून? सिंधीयांचे भुजबळांना पत्र

Nashik Air Service : छगन भुजबळ यांनी विमान कंपन्यांना उडान अंतर्गत किमान 02 वर्षे मुदतवाढ द्यावी अशी मागणी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य एम. सिंधिया यांच्याकडे पत्राद्वारे केली होती.

Nashik Air Service : नाशिक (Nashik) ते बेळगाव विमानसेवा (air Service) जानेवारी 2023 पासून सुरु होणे अपेक्षित असून कोविडमुळे उडान योजनेचा कार्यकाळ पूर्ण न करू न शकलेल्या अलायन्स एअरला उडान योजनेअंतर्गत कालावधी वाढवून देणे विचाराधीन असल्याची माहिती केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य एम. शिंदे यांनी राज्याचे माजी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना पत्राद्वारे दिली अशी माहिती आयमाचे पदाधिकारी मनीष रावल यांनी दिली आहे.

राज्याचे माजी मंत्री छगन भुजबळ यांनी विमान कंपन्यांना उडान अंतर्गत किमान 02 वर्षे मुदतवाढ द्यावी अशी मागणी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य एम. शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. याबाबत केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य एम. शिंदे यांनी छगन भुजबळ यांना पत्र पाठवून नाशिक विमानसेवा पूर्ववत करण्याबाबत माहिती दिली आहे.

माजी मंत्री छगन भुजबळ यांनी दिलेल्या पत्रात म्हटले होते की, भारत सरकारने टियर वन आणि टियर टू शहरांमधील हवाई संपर्क वाढवण्यासाठी उडान योजना सुरू केली आहे. रिजनल कनेक्टिव्हिटी स्कीम अंतर्गत विविध क्षेत्रांच्या बोलीमध्ये नाशिक एचएएल विमानतळाचाही समावेश करण्यात आला होता. त्यानुसार विविध विमान कंपन्यांकडून नाशिक विमानतळाला ९ शहरांचा पुरस्कार देण्यात आला. परंतु 03 वर्षांनंतरही विमान कंपन्यांनी आरसीएस उडान 01, उडान 02, उडान 03  मधील बिडिंग दरम्यान प्रदान केलेल्या सेक्टर्समध्ये सेवा सुरू केल्या नाहीत, म्हणून विविध कारणांमुळे उडान योजनेच्या उद्देशाला बगल दिली असल्याचे म्हटले आहे.

त्यांनी पुढे म्हटले आहे की, अहमदाबाद आणि पुण्यासाठी एअर अलायन्स, अहमदाबादसाठी ट्रूजेट आणि बेळगावसाठी स्टार एअरने या सेवा सुरू केल्या होत्या.  परंतु ट्रूजेटने ऑपरेशन बंद केले होते. तसेच स्टार एअर नाशिकमधून ऑपरेशन्स स्थगित करत आहेत. यामुळे उडान योजनेच्या उद्देशाला आणखी धक्का बसणार आहे. त्यामुळे या विमान कंपन्यांना उडान अंतर्गत किमान 02 वर्षे मुदतवाढ द्यावी अशी मागणी त्यांनी पत्रात केली होती.

याबाबत केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य एम. शिंदे यांनी छगन भुजबळ यांना पत्र पाठविले आहे. त्यात म्हटले आहे की, नाशिक विमानतळ अहमदाबाद, बंगलोरशी जोडणारे आरसीएस मार्ग बेळगाव, भोपाळ, गोवा, हैदराबाद आणि पुणे या निवडकांना पुरस्कार देण्यात आला. आरसीएस-उडान अंतर्गत एअरलाइन ऑपरेटर मेसर्स घोडावत यांनी आरसीएस उड्डाणे सुरू केली. मात्र नाशिक ते बेळगाव प्रवासी वाहतूक सेवा मागणी आणि कमी प्रवाशांमुळे बंद करण्यात आलेली आहे. ही सेवा सुरु करण्याचे निर्देश देण्यात आले असून जानेवारी 2023 पासून नाशिक ते बेळगाव विमानसेवा पुन्हा सुरु होणे अपेक्षित असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

सेवा पुन्हा सुरू करण्याचा विचार...
आरसीएस मार्ग स्पाइसजेटद्वारे नाशिक ते हैदराबादला सेवा सुरू आहे. व्हीजीएफ शिवाय 31 डिसेंबर 2021 रोजी किंवा त्यापूर्वी कार्यकाळ पूर्ण करण्यासह सर्व उडान मार्गांसाठी आरसीएस मार्ग किंवा नेटवर्कच्या सुरुवातीच्या तीन वर्षांच्या कालावधीचा अतिरिक्त एक वर्षाचा विस्तार, आधीच अनुकूल मानले गेले होते. मे.अलायन्स एअर ने 01 फेब्रुवारी 2019 रोजी नाशिक ते अहमदाबाद आणि हैदराबाद आणि 27 ऑक्टोबर 2019 रोजी नाशिक ते पुणे आरसीएस उड्डाणे सुरू केली आणि त्यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. मात्र कोविड-19 साथीच्या आजारामुळे ते ऑपरेट करू शकले नाहीत. त्यामुळे ही सेवा पुन्हा सुरु करण्याचे विचाराधीन असल्याची माहिती मंत्री ज्योतिरादित्य एम, शिंदे यांनी पत्राद्वारे छगन भुजबळ यांना दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

पाऊस पडणार की नाही? 'या' 27 जिल्ह्यांसाठी पुढचे पाच दिवस अत्यंत महत्वाचे, मुंबईसह कोकण विदर्भ ते मराठवाडा कसं असणार हवामान? 
पाऊस पडणार की नाही? 'या' 27 जिल्ह्यांसाठी पुढचे पाच दिवस अत्यंत महत्वाचे, मुंबईसह कोकण विदर्भ ते मराठवाडा कसं असणार हवामान? 
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Beed Crime News: ‘पप्पा, मम्मीला मारू नका...’; मुलाची विनवणी ऐकली नाही, पतीने पेट्रोल ओतून पत्नीला पेटवलं; बीडमधील मन सुन्न करणारी घटना
‘पप्पा, मम्मीला मारू नका...’; मुलाची विनवणी ऐकली नाही, पतीने पेट्रोल ओतून पत्नीला पेटवलं; बीडमधील मन सुन्न करणारी घटना
Panjabrao Dakh On Maharashtra Weather Rain Updates: परतीचा पाऊस बॅकलॉग भरणार, विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचीही चिंता मिटणार; ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाब डख यांचा अंदाज
परतीचा पाऊस बॅकलॉग भरणार, विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचीही चिंता मिटणार; ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज

व्हिडीओ

Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?
Embed widget