एक्स्प्लोर
Advertisement
नाशिकमध्ये विमानसेवेचा बोजवारा, स्पाईस जेट दिल्लीत पोहोचले, पण प्रवाशांचे लगेज पोहोचलेच नाही!
Nashik Plane Issue: दोन तास उशिराने झेपावलेले विमान दिल्लीत पोहोचल्यानंतर लक्षात आले की, प्रवाशांचे लगेज आले नसल्याचा धक्कादायक प्रकार घडला.
Nashik News Updates: गेल्या काही दिवसांपासून नाशिककरांना चालू बंद विमानसेवेमुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अशातच नाशिकहून उड्डाण करणाऱ्या स्पाईस जेट विमानसेवेमुळे ऐन दिवाळीत त्रासाला सामोरे जावे लागले आहे. दोन तास उशिराने झेपावलेले विमान दिल्लीत पोहचल्यानंतर लक्षात आले की, प्रवाशांचे लगेज आले नसल्याचा धक्कादायक प्रकार घडला. नंतर ते स्वतंत्र विमानाने पाठवण्यात येणार असल्याचे प्रवाशांना सांगण्यात आल्याने आणखीनच प्रवाशांचा गोंधळ उडाला.
काही दिवसांपूर्वी एअर अलाइन्स आणि स्टार विमानसेवा कंपनीने नाशिकमधून काढता पाय घेतल्यानंतर नाशिक विमानसेवा बारगळली आहे. आता उरलीसुरल्या स्पाईस जेट संदर्भांतही प्रवाशांची तारांबळ उडवणारा प्रकार घडला आहे. काल दुपारी दोन तास उशिराने दिल्लीसाठी विमान झेपावले. मात्र दिल्लीत पोहचल्यानंतर प्रवाशांचे लगेज विमानसोबत आलेच नसल्याचे निदर्शनास आले.
दरम्यान रात्री उशिरा प्रवाशांनी ही बाब निदर्शनास अलयानंतर एकच गोंधळ उडाला. प्रवाशांचा संताप अनावर झाल्यानंतर त्यांनी विमान पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांकडे तक्रार करण्यात आल्यानंतर एअरपोर्टवर गोंधळ निस्तरणाचे प्रयत्न झाले तर दुसरीकडे कंपनीचे प्रवाशांना दीड हजार रुपयांची नाममात्र मदत दिली. नाशिकची विमानसेवा सध्या अडथळत सुरू आहे. सद्यस्थितीत दिल्ली-हैदराबाद विमानसेवा सुरू असून मंगळवारी हा गोंधळ कारभार प्रवाशांना अनुभवला आला. ओझर विमानतळावरून दुपारी पावणे एकच्या सुमारास स्पाइट जेटचे विमान झेपवणार होते, मात्र त्याला दोन तास उशीर होऊन सुमारे सव्वा दोन वाजता ते झेपावले.
नाशिकहून दिल्लीकडे जाणारे विमान स्पाईस जेटचे नव्हते, तर कोरडेन एअरलाईनचे हायर केलेले खासगी विमान होते. दिल्लीत साडेतीन वाजता पोहोचल्यानंतर लगेजसाठी आठ क्रमांकाच्या बेल्टवर जाण्याची सूचना करण्यात आली. त्यानुसार प्रवासी तेथे गेले, मात्र लगेज त्या ठिकाणी दिसून आले नाही, चौकशीअंती लक्षात आले की प्रवाशांचे लगेज या विमानाने आलेच नसल्याचे समजताच प्रवासी संतप्त झाले.
अनेक प्रवाशांना कनेक्टिंग फ्लाईटने डेहराडून, दिल्ली, ऋषिकेश येथे जायचे होते मात्र सामानच आले नसल्याने त्यांचा संताप वाढला. कंपनीकडून लगेज रात्री तीन वाजता येईल, असे सांगण्यात आले. अनेकांकडून विमान प्रवासातील कपडे आणि हॅन्डबॅगस होत्या, त्यामुळे त्यांना कुठेही जाणे शक्य नव्हते. याबाबत प्रवाशांनी एअरपोर्ट पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी चौकशी केली. त्यानंतर मध्यरात्री सामान पोहोचेल. तोपर्यंत प्रवासी जिथे जात असेल तिथे त्यांना जाता येईल, तेथे असतील. त्या ठिकाणी त्यांना सामान पोहोचवण्यात येईल विमानतळ प्रशासनाकडून सांगण्यात आले.
दीड हजारांची मदत देण्याचे आश्वासन...
स्पाइट जेटच्या विमानाबरोबर लगेज ना आल्याने बऱ्याच काळानंतर प्रवाशांना समजतात त्यांचा संताप अनावर झाला. कोणताही उपाय नसल्याने त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली. विमान विमान कंपनीकडून अशा प्रकारचा काही गोंधळ झाला. तर कंपनी तात्पुरत्या निवास आणि भोजन व्यवस्था करतात मात्र असे काहीच करण्यात आले नाही. केवळ प्रत्येक प्रवाशाला दीड हजार रुपये देऊ असे सांगण्यात आल्याचे प्रवाशांनी सांगितले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement