एक्स्प्लोर
अकोल्यात अवैध गर्भपाताचा गोरखधंदा, बोगस डॉक्टरसह नर्सिंग होमवरही कारवाई
रुषी होम नर्सिंग केअरमध्ये राजरोसपणे अवैध गर्भपातही केले जात असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. या प्रकरणी रामदासपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, नर्सिंग होमचालक रुपेश तेलगोटे या बोगस डॉक्टरसह तिघांना अटक केली आहे.
![अकोल्यात अवैध गर्भपाताचा गोरखधंदा, बोगस डॉक्टरसह नर्सिंग होमवरही कारवाई Nashik PCPNDT action on illegal abortion nursing center in akola अकोल्यात अवैध गर्भपाताचा गोरखधंदा, बोगस डॉक्टरसह नर्सिंग होमवरही कारवाई](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/07/22130226/web-akola.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
अकोला : अवैध गर्भपाताच्या गोरखधंद्य़ाचा धक्कादायक प्रकार अकोल्यात समोर आला आहे. विशेष म्हणजे हे संपूर्ण नर्सिंग होम आणि चालवणारे तिन डॉक्टर बोगस असल्याचं उघडकीस आलं आहे. या अवैधपणे नर्सिंग होमवर कारवाई करण्यात आली आहे.
अकोला शहरातील दुर्गा चौकानजीकच्या रुषी होम नर्सिंग केअर असं या कारवाई झालेल्या दवाखान्याचं नाव आहे. महानगरपालिकेच्या पीसीपीएनडीटी पथकाने मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.फारुख शेख यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली आहे. रविवारी रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरु होतीय. गर्भ लिंग निदान विरोधी कायद्याच्या अंमलबजावणी अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.
VIDEO | स्मार्ट बुलेटिन | 22 जुलै 2019 | सोमवार | एबीपी माझा
शासनाने घालून दिलेल्या नियम व अटींचे उल्लंघन आणि कागदपत्रांमधील त्रुटींसाठी या दवाखान्याला सील करण्यात आलं आहे. येथे राजरोसपणे अवैध गर्भपातही केले जात असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. या प्रकरणी रामदासपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, नर्सिंग होमचालक रुपेश तेलगोटे या बोगस डॉक्टरसह तिघांना अटक केली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)