Nashik MSEB : नाशिककर, पुढील दोन दिवस खरंच लाईट नसणार का? महावितरणकडून सुधारित निवेदन जारी...
Nashik News : नाशिक महावितरणकडून विद्युत पुरवठ्याच्या संदर्भात सुधारित निवेदन जारी करण्यात आले आहे.
नाशिक : आज सकाळपासून नाशिक (Nashik) शहरातील प्रत्येक मोबाईलवर नाशिककरांना धक्का देणारे महावितरणचे (Mahavitaran) निवेदन फिरत होते. पुढील दोन दिवस नाशिकसह जिल्ह्यातील काही भागातील वीज पुरवठा बंद (Power Supply)) राहणार असल्याचे या निवेदनाद्वारे सांगण्यात आले होते. हे निवेदन काही तासांतच प्रत्येकाच्या व्हाट्सपवर जाऊन धडकले. मात्र यात बदल करण्यात आला असून नाशिक महावितरणकडून याबाबत सुधारित निवेदन जारी करण्यात आले आहे. त्यामुळे नाशिककरांनी सुधारित निवेदनाचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून नाशिक (Nashik) शहरासह जिल्ह्यातील काही भागात वीज पुरवठा खंडित होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. अनेक भागात रात्रीच्या सुमारास तसेच दिवसा देखील बत्ती गुल होत आहेत. हे सर्व प्रकार सुरु असताना आज अचानक व्हाटसअपवर महावितरणचे निवेदन आले, ज्यात म्हटले होते की, एका कामानिमित्त पुढील दोन दिवस शहरासह जिल्ह्यातील काही भागात लाईट बंद असणार आहे. हे निवेदन संपूर्ण शहरात व्हायरल झाले. मात्र आता या निवेदनात बदल करण्यात आला असून महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, काही अत्यंत तातडीच्या मनोरा उभारणीचे काम हाती घेतले जाणार आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील काही भागातील विद्युत पुरवठा बंद ठेवला जाणार आहे. त्यामुळे नाशिककरांनी महावितरणला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीने (MSEB) दिलेल्या सुधारित निवेदनानुसार, काही अत्यंत तातडीच्या मनोरा उभारणीच्या कामाकरिता नाशिक जिल्हा व नाशिक जिल्हयातील इतर तालुक्यांना विद्युत पुरवठा करत असलेल्या 220 के. व्ही. बाभळेश्वर-एकलहरे नाशिक दोन्ही वाहिन्या बंद करणे गरजेचे आहे. तथापि सदर काळात विदयुत पुरवठा सुरळीत ठेवण्याकरिता विदयुत निर्मिती विभाग एकलहरे व नाशिक नवसारी वीजवाहिनी व्दारे पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली आहे. तथापि, सदर पर्यायी व्यवस्थेमध्ये काही आकस्मित तांत्रीक बिघाड झाल्यास, गरज पडल्यास खालील उपकेंद्रातून विदयुत पुरवठा केल्या जाणाऱ्या भागात अंशत: वीज पुरवठा बंद राहु शकतो. दिलेल्या वेळेपूर्वी काम पूर्ण झाल्यास विद्युत पुरवठा पूर्ववत करण्यात येईल अथवा वेळेत काम पुर्ण न झाल्यास वीज पुरवठा सुरु करण्यास विलंब होऊ शकतो याची कृपया वीज ग्राहकांनी नोंद घ्यावी, असेही सांगण्यात आले आहे.
इथं विद्युत पुरवठा बंद होऊ शकतो....
दरम्यान शनिवार सकाळी पाच वाजेपासून ते रात्री आठ वाजेपर्यंत तर रविवारी सकाळी आठ वाजेपासून ते 5 वाजेपर्यंत विद्युत पुरवठा बंद असणार आहे. यात जिल्ह्यातील 132 के.व्ही. ओझर, आंडगांव, म्हसरुळ, सिन्नर, अंबड, पिंपळस, टाकळी या उपकेंद्रातून विदुयत पुरवठा केल्या जाणाऱ्या 33 के.व्ही. वाहीन्यांचा अंशत: विदयुत पुरवठा खंडित होऊ शकतो, अशी माहिती महावितरणकडून देण्यात आली आहे.
इतर महत्वाची बातमी :