एक्स्प्लोर

काय सांगता! डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन सर्वच भाषांत वाचता येणार, नाशिकच्या हॅकेथॉनमधील विद्यार्थ्यांचं इनोव्हेशन

ऑडिओच्या माध्यमातून देखील प्रिस्क्रिप्शन ऐकता येणार असल्याची सोय या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या अँपवर केली आहे. त्यामुळे अनेकांना आता प्रिस्क्रिप्शन वाचता येणार आहे. 

Nashik news:  रुग्णांना डॉक्टरांकडून मिळालेले प्रिस्क्रिप्शन आजही अनेकांना उमजत नाही. मेडिकल वाला आणि दुसरा डॉक्टर ही दोनच लोक प्रिस्क्रिप्शन वाचून औषधे देतात. मात्र आता भारतातील सर्वच भाषांतून हे प्रिस्क्रिप्शन वाचता येणार आहे. हा अभिनव उपक्रम नाशिकच्या हॅकेथॉन सहभागी विद्यार्थ्यानी प्रत्यक्षात साकारला आहे. शिवाय ऑडिओच्या माध्यमातून देखील प्रिस्क्रिप्शन ऐकता येणार असल्याची सोय या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या अँपवर केली आहे. त्यामुळे अनेकांना आता प्रिस्क्रिप्शन वाचता येणार आहे. 

नाशिकच्या संदीप यूनिव्हर्सिटीमध्ये सध्या सनहॅक्स 2022  या तीन दिवशीय आंतरराष्ट्रीय हॅकेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे आहे. यातील सहभागी विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या समस्येवर त्यांनी हे संशोधन केले आहे. पुण्यातील एमआयटी एडिटी युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांनी हा नवोपक्रम केला आहे. त्यामुळे लवकरच डॉक्टरांनी लिहलेले प्रिस्क्रिप्शन सर्वसामान्य नागरिकांना वाचता येणार आहे. पुण्यातून सहभागी झालेल्या या विद्यार्थ्यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. 

पुण्यातील सहभागी झालेल्या कॉम्प्युटर सायन्समध्ये शिकत असलेल्या ऋषिकेश नळे, आदित्य पाटील, किरण पाटील आदी विद्यार्थ्यांनी तयार केले आहे. हॅकेथॉन मध्ये 36 तास यावर काम करून त्यांनी हे अॅप विकसित केले आहे. आगामी काळात विद्यापीठाकडून अनुदान मिळाल्यानंतर हे अँप पूर्णत्वास येणार आहे. 

संदीप यूनिव्हर्सिटीमध्ये  आंतराष्ट्रीय हॅकेथॉनचे आयोजन केले असून 26 राज्यांसह सहा देशांतील 2 हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना वेब डिझाईन, फिन टेक, हेल्थ टेक आणि मशीन लर्निंग या विषयांवर विविध परीक्षकांकडून समस्या देण्यात आल्या होत्या. यातील हेल्थ टेक या विषयावर 'डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन'  या विषयावर सर्वसामान्य नागरिकांना समजेल या भाषेत विकसित करण्यास सांगितले होते. यासाठी जवळपास 36 तास विद्यार्थ्यांना देण्यात आले होते. या अनुषंगाने काम करीत असताना पुणे येथील एमआयटी एडिटी यूनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांनी हा नवोपक्रम केला आहे.

सर्व भाषांत विकसित
डॉक्टरांचे पिस्क्रिप्शन या विषयांवर या विद्यार्थ्यांनी काम करताना अनेक बाजूनी विचार करत 'चुझ लाईफ' या अॅपची निर्मितीच्या प्रक्रियेत आहे. या अॅपमध्ये हे प्रिस्क्रिप्शन भारतातील सर्वच भाषांत वाचता येणार आहे. त्यामुळे डॉक्टर, मेडिकल चालकासोबत सर्वसामान्यांना प्रिस्क्रिप्शन वाचता येणार आहे. 

जीपीएस, अलार्मसह ऑडिओ प्रिस्क्रिप्शन
अनेकदा रुग्णांना मेडिकल किंवा हॉस्पिटल शोधण्यास अडचणी येतात. या अॅपच्या माध्यमातून सोपे होणार आहे. शिवाय रुग्णांना औषधे घेण्यासाठी वेळच्यावेळी अलार्म व्यवस्था कार्यान्वित केली जाणार आहे. महत्वाचे म्हणजे कर्णबधीर रुग्णांना देखील ऑडिओ च्या माध्यमातून प्रिस्क्रिप्शन ऐकण्याची सोयही या अँपमध्ये असणार आहे. त्यामुळे एकूणच सर्वांनाच उपयुक्त असणार आहे. सद्यस्थितीत हे अँप प्रगतीपथावर असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Munde : तुकाराम मुंढेंची डॉमिनोज पिझ्झावर धाड, व्हेज- नॉन व्हेजसाठी एकच प्लॅटफॉर्म, मुंबईतील तीन आउटलेट्सचे परवाने निलंबित
तुकाराम मुंढेंची डॉमिनोज पिझ्झावर धाड, व्हेज- नॉन व्हेजसाठी एकच प्लॅटफॉर्म, मुंबईतील तीन आउटलेट्सचे परवाने निलंबित
व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
पवारांची साथ मोदींचा हात! फणसकिंगने घेतली पंतप्रधानांची भेट, 12 मिनीटांच्या भेटीत नेमकी काय झाली चर्चा? 
पवारांची साथ मोदींचा हात! फणसकिंगने घेतली पंतप्रधानांची भेट, 12 मिनीटांच्या भेटीत नेमकी काय झाली चर्चा? 

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
Embed widget