एक्स्प्लोर

Nana Patole : सुधीर तांबेंनी पक्षाला फसवलं, सत्यजीतला अजिबात पाठिंबा देणार नाही; नाना पटोलेंनी थेटच सांगितलं

नाशिक पदवीधर मतदारसंघात (Nashik Graduate Constituency)  काँग्रेस सत्यजीत तांबेंना (Satyajeet Tambe) पाठिंबा देणार नसल्याची स्पष्ट भूमिका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी घेतली.

Nana Patole on Satyajeet Tambe  : सुधीर तांबे (Sudhir Tambe) यांनी पक्षाला फसवलं आहे. त्यामुळं नाशिक पदवीधर मतदारसंघात (Nashik Graduate Constituency)  काँग्रेस सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांना पाठिंबा देणार नसल्याची स्पष्ट भूमिका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी घेतली आहे. काल झालेल्या घडामोडींचा अहवाल हायकमांडला दिला आहे. याबाबतचा पुढील निर्णय हायकमांड घेईल. मात्र, काँग्रेस बंडखोर उमेदवाराला पाठिंबा देणार नसल्याचे नाना पटोले म्हणाले. नाना पटोले यांनी सकाळी नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.   

भाजपकडून दुसऱ्याची घरं फोडण्याचं काम 

काँग्रेस पक्षाच्या वतीनं सुधीर तांबे यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. सुधीर तांबे यांनी काँग्रेस पक्षाला फसवलं असल्याचे नाना पटोले म्हणाले. सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. त्यामुळं काँग्रेस त्यांना पाठिंबा देणार नसल्याचे पटोले म्हणाले. यावेळी बोलताना नाना पटोले यांनी भाजपवरही टीका केली. भाजप भय दाखवून घरं फोडण्याचं काम करत असल्याची टीका पटोले यांनी केली. भाजप आज दुसऱ्याची घरं फोडून आनंद घेत आहे. पण ज्यादिवशी भाजपचे घर फुटेल त्यादिवशी त्यांना घरं फोडण्याचे दु:ख काय असते ते कळेल असे पटोले म्हणाले.

पाहा व्हिडीओ : Nana Patole on Satyajeet Tambe : Sudhir Tambe यांनी Congress ला फसवलं, सत्यजीत तांबेंना पाठिंबा नाही

बाळासाहेब थोरात काल संपर्कात होते, मात्र आज संपर्कात नाहीत

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यासोबत कालपर्यंत संपर्क होता. आता ते संपर्कात नाहीत असे नाना पटोले म्हणाले. काँग्रेस पक्षाला धोका देणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असेही पटोले म्हणाले. नागपूर शिक्षक मतदार संघाचा अंतिम निर्णय 15 जानेवारी पर्यंत घेतला जाईल असेही ते म्हणाले. 

डॉ. सुधीर तांबे आणि सत्यजित तांबे यांच्यावर कारवाई होणार का?

नाशिक प्रकरणावरून डॉ. सुधीर तांबे आणि सत्यजित तांबे यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात दिल्लीतील हाय कमांडकडे महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशची मागणी केल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. नाशिक निवडणुकीत नेमकं काय घडलं याची सविस्तर माहिती हायकंमाडला देण्यात आली आहे. सत्यजित तांबे यांना उमेदवारी काँग्रेसकडून पाहिजे अशी कोणतीही मागणी केली नव्हती. सुधीर तांबे यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर पक्षाने उमेदवारी फॉर्म हा कोरा दिलेला होता. त्यामुळं सुधीर तांबे यांना निवडणूक लढवायची नव्हती तर सत्यजित तांबे यांचेही नाव टाकण्यास पक्षाची हरकत नव्हती असं काँग्रेसच्या एका मोठ्या नेत्यानं म्हटलं आहे. तांबे कुटुंबीयांनी अंधारात ठेवून हा निर्णय घेतल्याचे काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याचा आरोप आहे. त्यामुळं सुधीर तांबे आणि सत्यजित तांबे यांच्यावर पक्षाकडून कारवाई करण्यात यावी अशी मागणी दिल्लीतील हाय कमांडकडे करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

Nashik MLC Election:  नाशिक पदवीधर विधान परिषद निवडणुकीत मोठा ट्वीस्ट; सत्यजीत तांबे मविआचे उमेदवार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

दिल्लीचा निकाल धक्कादायक! शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात डोंगराएवढं काम करुनही पराभव, रोहित पवारांनी व्यक्त केली खंत  
दिल्लीचा निकाल धक्कादायक! शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात डोंगराएवढं काम करुनही पराभव, रोहित पवारांनी व्यक्त केली खंत  
हरियाणा, महाराष्ट्रानंतर दिल्लीतही अहंकाराने माती केली; दिल्लीत भाजपचा वनवास संपवण्यास काँग्रेसचा 'हात'भार; केजरीवाल, सिसोदियांसह 'आप'च्या 12 जागांवर पराभवाचे कारण काँग्रेस
हरियाणा, महाराष्ट्रानंतर दिल्लीतही अहंकाराने माती केली; दिल्लीत भाजपचा वनवास संपवण्यास काँग्रेसचा 'हात'भार; केजरीवाल, सिसोदियांसह 'आप'च्या 12 जागांवर पराभवाचे कारण काँग्रेस
हिंमत असेल तर राहुल गांधींनी माझ्याविरोधात लढावं, त्यांना चितपट केल्याशिवाय राहणार नाही चंद्रशेखर बावनकुळेचं खुलं आव्हान
हिंमत असेल तर राहुल गांधींनी माझ्याविरोधात लढावं, त्यांना चितपट केल्याशिवाय राहणार नाही चंद्रशेखर बावनकुळेचं खुलं आव्हान
Kiran Samant : मोठी बातमी : राजन साळवींना पक्षप्रवेश देताना एकनाथ शिंदे मला आणि उदय सामंताना विश्वासात घेतील : किरण सामंत
मोठी बातमी : राजन साळवींना पक्षप्रवेश देताना एकनाथ शिंदे मला आणि उदय सामंताना विश्वासात घेतील : किरण सामंत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

BJP Win Delhi Assembly Election 2025:27 वर्षानंतर भाजपनं दिल्ली कशी केली काबीज?विजयाचं श्रेय मोदींनाPM Modi Win Delhi Election Uncut Speech : आप, केजरीवाल ते अण्णा हजारे, दिल्ली विजयावर मोदींचं भाषण!Narendra Modi on Delhi Election | नारी शक्तीने दिल्लीत भाजपला आशीर्वाद दिला, मोदींची प्रतिक्रियाNarendra Modi on Delhi Election | आपने मेट्रोचं काम रखडून ठेवलं, नरेंद्र मोदींची केजरीवालांवर टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिल्लीचा निकाल धक्कादायक! शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात डोंगराएवढं काम करुनही पराभव, रोहित पवारांनी व्यक्त केली खंत  
दिल्लीचा निकाल धक्कादायक! शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात डोंगराएवढं काम करुनही पराभव, रोहित पवारांनी व्यक्त केली खंत  
हरियाणा, महाराष्ट्रानंतर दिल्लीतही अहंकाराने माती केली; दिल्लीत भाजपचा वनवास संपवण्यास काँग्रेसचा 'हात'भार; केजरीवाल, सिसोदियांसह 'आप'च्या 12 जागांवर पराभवाचे कारण काँग्रेस
हरियाणा, महाराष्ट्रानंतर दिल्लीतही अहंकाराने माती केली; दिल्लीत भाजपचा वनवास संपवण्यास काँग्रेसचा 'हात'भार; केजरीवाल, सिसोदियांसह 'आप'च्या 12 जागांवर पराभवाचे कारण काँग्रेस
हिंमत असेल तर राहुल गांधींनी माझ्याविरोधात लढावं, त्यांना चितपट केल्याशिवाय राहणार नाही चंद्रशेखर बावनकुळेचं खुलं आव्हान
हिंमत असेल तर राहुल गांधींनी माझ्याविरोधात लढावं, त्यांना चितपट केल्याशिवाय राहणार नाही चंद्रशेखर बावनकुळेचं खुलं आव्हान
Kiran Samant : मोठी बातमी : राजन साळवींना पक्षप्रवेश देताना एकनाथ शिंदे मला आणि उदय सामंताना विश्वासात घेतील : किरण सामंत
मोठी बातमी : राजन साळवींना पक्षप्रवेश देताना एकनाथ शिंदे मला आणि उदय सामंताना विश्वासात घेतील : किरण सामंत
Delhi Election : 'गर्व आणि अहंकाराचा चक्काचूर झाला, केजरीवाल रागाच्या भरात वस्तू फोडतात, शिवीगाळ करतात, मला हाकलून लावण्याचा प्रयत्न, पण..' सत्ता जाताच 'आप' खासदाराचा गंभीर आरोप
'गर्व आणि अहंकाराचा चक्काचूर झाला, केजरीवाल रागाच्या भरात वस्तू फोडतात, शिवीगाळ करतात, मला हाकलून लावण्याचा प्रयत्न, पण..' सत्ता जाताच 'आप' खासदाराचा गंभीर आरोप
Delhi Election Result 2025 : कुंभमेळ्याला न मानणाऱ्या काँग्रेसचं खातंही उघडलं नाही; नवनीत राणांचा प्रहार, केजरीवालांवरही हल्लाबोल
कुंभमेळ्याला न मानणाऱ्या काँग्रेसचं खातंही उघडलं नाही; नवनीत राणांचा प्रहार, केजरीवालांवरही हल्लाबोल
Delhi Assembly Election 2025: दिल्लीत भाजपची तोफ वाजली पण तिकडे अजित पवारांचे सर्व 30उमेदवार आपटले, सगळ्यांचे डिपॉझिट जप्त
दिल्लीत भाजपची तोफ वाजली पण तिकडे अजित पवारांचे सर्व 30 उमेदवार आपटले, सगळ्यांचे डिपॉझिट जप्त
Rohit Pawar on Delhi Election : तर भाजप 20 जागांवर देखील गेली नसती; आमदार रोहित पवारांनी दिल्लीचे 'गणित' समजावून सांगितलं!
तर भाजप 20 जागांवर देखील गेली नसती; आमदार रोहित पवारांनी दिल्लीचे 'गणित' समजावून सांगितलं!
Embed widget