एक्स्प्लोर
अमरावती पदवीधर मतदारसंघात रणजीत पाटलांची प्रतिष्ठा पणाला
![अमरावती पदवीधर मतदारसंघात रणजीत पाटलांची प्रतिष्ठा पणाला Nashik And Amravati Graduate Constituency Election Results अमरावती पदवीधर मतदारसंघात रणजीत पाटलांची प्रतिष्ठा पणाला](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/02/06075858/Ranjit-Patil.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नाशिक/अमरावती : अमरावती आणि नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीची आज मतमोजणी होणार आहे. नाशिक आणि अमरावती पदवीधर मतदारसंघासाठी 3 फेब्रुवारीला मतदान झालं होतं.
अमरावतीत गृहराज्यमंत्री आणि भाजपचे उमेदवार रणजीत पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यांच्या विरोधात काँग्रेसचे उमेदवार संजय खोडके उभे आहेत. त्यामुळे अमरावतीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.
नाशिकमध्ये भाजपकडून डॉ. प्रशांत पाटील तर काँग्रेसकडून विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे मैदानात आहेत. प्रशांत पाटील हे संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांचे जावई आहेत, तर सुधीर तांबे हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे मेव्हणे आहेत.
नाशिक आणि अमरावती पदवीधर मतदारसंघासाठी 3 फेब्रुवारीला मतदान झालं होतं. नाशकात केवळ 54.38 टक्के, तर अमरावतीत 63.5 टक्के मतदानाची नोंद झाली. नागपूर विभागात शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठीही मतदान झालं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
महाराष्ट्र
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)