एक्स्प्लोर

भुजबळांकडून नरेंद्र मोदींची नथुराम गोडसेशी तुलना

नथुराम गोडसेने नमस्कार करुन एक महात्मा संपवला तसं मोदींनी संसदेत जाताना पाया पडून लोकशाही संपवण्याचा विडा उचलला. आज तीच ठोकशाही देशात पाहायला मिळत आहे

पंढरपूर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवर्तन यात्रेत अकलूज येथील सभेत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना नथुराम गोडसेशी केली. दिल्ली आणि राज्यातील सरकार लोकशाहीचा खात्मा करत आहे. नथुराम गोडसेने नमस्कार करुन एक महात्मा संपवला तसं मोदींनी संसदेत जाताना पाया पडून लोकशाही संपवण्याचा विडा उचलला. आज तीच ठोकशाही देशात पाहायला मिळत आहे, अशा शब्दात भुजबळ यांनी मोदींची तुलना नथुरामशी केली. या देशात काय बोलायचं. काय दाखवायचं. काय लिहायचं. काय खायचं यावर बंधनं घातली जात आहेत. दोन कोटी लोकांना नोकर्‍या देतो म्हटले परंतु दोन कोटी नोकर्‍या मिळण्याऐवजी त्या नोकर्‍याच गेल्या आहेत असेही आमदार छगन भुजबळ म्हणाले. 100 कोटींचे महाराष्ट्र सदन आणि 850 कोटी मला दिले असा आरोप माझ्यावर करण्यात आला. एवढं सुंदर महाराष्ट्र सदन बांधले, त्या ठेकेदाराला एक फुटकी कवडी राज्य शासनाने दिली नाही. जास्त बोलणार्‍याला आत टाकण्याची भूमिका सरकारने घेतली आणि मी जास्त बोललो तर मला टाकले जेलमध्ये. आणि आता जास्त कोण बोलले तर तुमचा भुजबळ करु अशा धमक्या सरकार देत आहे. यांनी माझं सगळं जप्त केलं परंतु जनतेचे प्रेम जप्त करु शकत नाहीत, असेही ते म्हणाले. सत्तेचा माज कशाला अनेक सिंकदर येवून गेले. आता त्याठिकाणी समाध्या उभ्या राहिल्या आहेत हे लक्षात ठेवा, असा टोलाही आमदार छगन भुजबळ यांनी लगावला. हे सरकार आहे की भिताड आहे : अजित पवार शेतकऱ्यांवर अवकाळी पाऊस, गारपीठ, दुष्काळ अशी संकटे आल्यावर पवारसाहेब मदत करत होते. परंतु आज नुसत्या घोषणा केल्या जात आहेत. हे सरकार आहे की भिताड आहे अशी टीका अजित पवार यांनी यावेळी केली. आधी राममंदिर बांधणार मग सरकार असे उध्दव ठाकरे सांगत आहेत. अरे चार वर्षे झोपला होतात का? असा सवाल करतानाच अरे उध्दवा अजब तुझे सरकार असा टोलाही  पवार यांनी लगावला. महात्मा गांधी यांची आज पुण्यतिथी आहे परंतु त्यांच्या फोटोला गोळ्या झाडताना आणि तो पुतळा जाळतानाची क्लीप सगळीकडे फिरत आहे.  देशात एका महात्म्याचा अपमान केला जातोय आणि  मारेकरी नथुराम गोडसेला महात्मा अशी पदवी देवून घोषणा देत आहेत, हे देशात काय चाललयं? असा सवालही पवार यांनी केला.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde: मुंबईचा महापौर शिवसेनेचा होणार का? एकनाथ शिंदेंनी दोन वेळा उत्तर दिलं, म्हणाले मुंबईचा महापौर....
हॉटेलमध्ये नगरसेवक का ठेवले? शिवसेना घाबरणारी पार्टी आहे का? म्हणत एकनाथ शिंदेंनी कारण सांगून टाकलं
आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल सामन्यात नातू झळकला, शरद पवारांनी टीव्हीवर 'सामना' बघितला; आजी, आजोबांना अत्यानंद

मोठी बातमी! मुख्यमंत्री दावोसला, इकडे एकनाथ शिंदे अन् रवींद्र चव्हाणांची गुप्त बैठक; सत्तास्थापनेची चर्चा

मुंबईत भाजपचा स्ट्राईक रेट नंबर 1, ठाकरेंचाही भारी, राष्ट्रवादीचा सर्वात कमी, शिंदेंच्या शिवसेनेचा किती?

व्हिडीओ

PM Narendra Modi On BJP Mumbai Win : मुंबईत भाजपला रेकॉर्डब्रेक जनमत, नरेंद्र मोदींकडून कौतुक
Mumbai bmc election result politics :  शिंदेंनी नगरसेवक का लपवले? महापौर पदासाठी शिंदेंचा अट्टाहास?
Sanjay Raut On Mumbai Mayor : नगरसेवकांना लपवावं लागत असेल तर कायदा-व्यवस्था ढासललीय, एकनाथ शिंदेंना टोला
Girish Mahajan Majha Katta : सुधाकर बडगुजर प्रकरण ते नाशिकचं तपोवन, गिरीश महाजन 'माझा कट्टा'वर
PMC Election : पुण्याची 22 वर्षीय सई थोपटे सर्वात तरुण नगरसेवक Exclusive

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde: मुंबईचा महापौर शिवसेनेचा होणार का? एकनाथ शिंदेंनी दोन वेळा उत्तर दिलं, म्हणाले मुंबईचा महापौर....
हॉटेलमध्ये नगरसेवक का ठेवले? शिवसेना घाबरणारी पार्टी आहे का? म्हणत एकनाथ शिंदेंनी कारण सांगून टाकलं
आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल सामन्यात नातू झळकला, शरद पवारांनी टीव्हीवर 'सामना' बघितला; आजी, आजोबांना अत्यानंद
आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल सामन्यात नातू झळकला, शरद पवारांनी टीव्हीवर 'सामना' बघितला; आजी, आजोबांना अत्यानंद
मोठी बातमी! मुख्यमंत्री दावोसला, इकडे एकनाथ शिंदे अन् रवींद्र चव्हाणांची गुप्त बैठक; सत्तास्थापनेची चर्चा
मोठी बातमी! मुख्यमंत्री दावोसला, इकडे एकनाथ शिंदे अन् रवींद्र चव्हाणांची गुप्त बैठक; सत्तास्थापनेची चर्चा
मुंबईत भाजपचा स्ट्राईक रेट नंबर 1, ठाकरेंचाही भारी, राष्ट्रवादीचा सर्वात कमी, शिंदेंच्या शिवसेनेचा किती?
मुंबईत भाजपचा स्ट्राईक रेट नंबर 1, ठाकरेंचाही भारी, राष्ट्रवादीचा सर्वात कमी, शिंदेंच्या शिवसेनेचा किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 जानेवारी 2025 | बुधवार

सोनम वांगचुक तुरुंगात जमिनीवर झोपत आहेत, बॅरेकमध्ये चालण्यासाठी पुरेशी जागाही नाही; केसमध्ये दम नसल्याने सॉलिसिटर जनरल तारीख पर तारीख मागत आहेत; पत्नी गीतांजलींचा आरोप

Video: एकनाथ शिंदेंकडून अडीच वर्षे महापौरपदाची मागणी; भाजपची पहिली प्रतिक्रिया, चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...

भाजपच्या 84 मध्ये पाचने वाढ, त्यात 35 बाहेरून आलेले 37 अमराठी आणि 10-12 आमदार खासदारांच्या नात्यागोत्यातील; सुषमा अंधारेंनी मुंबईतील भाजप नगरसेवकांची कुंडलीच मांडली

Embed widget